वाह क्या बात है! मराठमोळ्या वडापावची जगालाही भूरळ; बेस्ट सँडविचच्या यादीत कितव्या क्रमांकावर माहित्ये का?

| Updated on: Mar 05, 2023 | 9:30 AM

वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. अशोक वैद्य नावाच्या एका स्ट्रीट वेंडरने वडापाव पहिल्यांदा तयार केला आणि विकला. 1960 ते 1970च्या दशकात दादर रेल्वे स्टेशनजवळ अशोक वैद्य काम करत होते.

वाह क्या बात है! मराठमोळ्या वडापावची जगालाही भूरळ; बेस्ट सँडविचच्या यादीत कितव्या क्रमांकावर माहित्ये का?
Vada Pav
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

नवी दिल्ली : गोरगरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत सर्वांच्याच आवडीचा पदार्थ असलेल्या अस्सल मराठमोळ्या वडापावची आता जगालाही भूरळ पडली आहे. मुंबई आणि मुंबईकरांची ओळख असलेल्या वडापावची टेस्टच न्यारी आहे. कोणत्याही वेळी आणि कधीही खाल्ला जाणारा, कुठेही मिळणारा आणि खिशाला परवडणारा असा हा पदार्थ आहे. त्यामुळे या पदार्थाच्या चवीने जगही भूलून गेले नसते तर नवलचं. जगातील बेस्ट सँडविचच्या यादीत वडापावचा समावेश झाला आहे. या यादीत वडापावला 13 वे स्थान मिळाले आहे.

टेस्ट अॅटलास (Taste Atlas) या संस्थेने जगातील सर्वश्रेष्ठ खाद्यपदार्थांची रॅंकीग केली आहे. ही संस्था फूड क्रिटिक्सकडून रिव्ह्यू घेते. सोबतच रिसर्च पेपर्सच्या मदतीने पारंपारिक पद्धतीने बनलेल्या व्यंजनाच्या अस्ल रेसिपीसना रँकिंग देते. विशेष म्हणजे या 50 पदार्थांमध्ये दोनच शाकाहारी पदार्थ आहे. त्यापैकी वडापाव सुद्धा एक आहे.

हे सुद्धा वाचा

तुर्कीची डिश नंबर वन

या रँकिंगमध्ये तुर्कीची टॉम्बिक ही डिश पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर पेरुची डिश बुटिफारा आणि अर्जेंटिनाची सँडविच डे लोमो यांना अनुक्रमे दुसरा आणि तिसरा क्रमांक मिळाला आहे. टेस्ट अॅटलासच्या वेबसाईटवर ही माहिती देण्यात आली आहे. या वेबसाईटवर वडापावची जन्मकथाही सांगितली गेली आहे.

वडापावची जन्मकथा

वडापाव हा मुंबईतील प्रसिद्ध स्ट्रीट फूड आहे. अशोक वैद्य नावाच्या एका स्ट्रीट वेंडरने वडापाव पहिल्यांदा तयार केला आणि विकला. 1960 ते 1970च्या दशकात दादर रेल्वे स्टेशनजवळ अशोक वैद्य काम करत होते. त्यावेळी या परिसरात मजदूर मोठ्या प्रमाणावर काम करायचे. त्यांना घरून डबा आणणे शक्य नव्हते. आणि हॉटेलात रोज पैसे देऊन खाणे त्यांना परवडत नव्हते. त्यामुळे हे मजूर उपाशी पोटी काम करायचे.

त्यामुळे या मजुरांना स्वस्तातला खाद्यपदार्थ देण्याचा विचार वैद्य यांनी केला आणि त्यातूनच वडापावची आयडिया सूचली. लोकांना हा पदार्थ आवडला. वडापाव रुचकर होता. गरमागरम वडापावने भूक भागत होती. अंगात तरतरी येत होती. शिवाय हा वडापाव खिशाला परवडणारा होता. त्यामुळे बघता बघता हा वडापाव मुंबईची ओळख झाला. आणि देशभर पसरला.

वडापाव कसा तयार करतात?

बटाट्यापासून वडापाव तयार केला जातो. त्यात तिखट मसाला घातल्या जातो. पावासोबत वडापाव सर्व्ह केला जातो. हल्ली वडापावचे अनेक प्रकार तयार करण्यात आले आहेत. बटर वडापाव वगैरे आदी प्रयोग वडापावमध्ये करण्यात आले आहेत. त्यालाही खवय्यांनी पसंती दिली आहे. मुंबईत येणारा कोणताही पर्यटक असो, तो मुंबईचा वडापाव खालल्याशिवाय राहत नाही. अत्यंत कमी भांडवलात आणि एखाद्या छोट्याश्या गाडीवरही हा व्यवसाय सुरू करता येतो. या वडापावच्या गाड्यांमुळे अनेक तरुणांच्या रोजगारीचा प्रश्नही सुटलेला आहे.