हिवाळ्यात कोरड्या त्वचेने त्रासलात ? तज्ञांकडून जाणून घ्या उपाय

हिवाळ्यामध्ये त्वचेशी संबंधित समस्या वाढतात. हिवाळ्यामध्ये त्वचा कोरडी होते. त्वचा चमकदार असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते पण ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांना क्लोइंग स्किन मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. यासाठी योग्य खाण्याच्या सवयी, चांगली झोप आणि नियमित काळजी घेणे आवश्यक आहे.

हिवाळ्यात कोरड्या त्वचेने त्रासलात ? तज्ञांकडून जाणून घ्या उपाय
कोरड्या त्वचेने त्रासलात Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: Dec 14, 2024 | 4:02 PM

हिवाळा सुरू होऊन काही दिवस झाले आहे. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला यासारखे सामान्य आजार होत असतात. त्यासोबतच त्वचेच्या समस्या देखील निर्माण होऊ लागतात. हिवाळा सुरू झाल्यानंतर लगेच त्याचे परिणाम तुमच्या त्वचेवर आणि केसांवर दिसायला लागतात. केसांमध्ये कोंडा तयार होतो आणि त्वचा कोरडी होते त्यामुळे हिवाळ्यात शरीराप्रमाणेच केसाची आणि त्वचेची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही त्वचा आणि केसांची योग्य काळजी घेतली नाही तर तुम्हाला त्यांच्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. कानपूर येथील डॉक्टर दीक्षा कटियार म्हणतात की केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवन शैलीचे पालन करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात अनेक लोक केस आणि त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असतात. हिवाळ्यामध्ये आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी योग्य दिनचर्येचे पालन करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात त्वचेची चमक परत आणण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊ तज्ञांकडून.

कोरडी त्वचा

हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे ही एक सामान्य समस्या आहे. कोरड्यात त्वचेमुळे हिवाळ्यात त्वचेची जळजळ होते असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे हिवाळ्यात कोरडी त्वचा असलेले लोक कोरफड जेल लावू शकता. त्याचबरोबर हिवाळ्यात पुरेसे पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते.

रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे

चमकदार त्वचा मिळवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमचे शरीर हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी तयार होइल. शरीर आतून निरोगी असेल तर त्वचा ही आरशासारखी चमकते.

डिटॉक्सिफिकेशन

हिवाळ्यात चमकदार आणि स्वच्छ त्वचा मिळवण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन करणे आवश्यक आहे. डिटॉक्सिफिकेशन योग्य पद्धतीने होण्यासाठी मूत्रपिंडाची आणि यकृताची काळजी घेणे आवश्यक आहे. नैसर्गिकरित्या किडनी डिटॉक्स करणाऱ्या पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात करा.

वैयक्तिक काळजीसाठी सल्ला घ्या

प्रत्येकाच्या आरोग्याच्या समस्या या वेगवेगळ्या असतात. चांगल्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ल्या घेऊन तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य उपचार मिळवू शकता. यामुळे तुमचा त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.