हिवाळा सुरू होऊन काही दिवस झाले आहे. हिवाळ्यामध्ये सर्दी, खोकला यासारखे सामान्य आजार होत असतात. त्यासोबतच त्वचेच्या समस्या देखील निर्माण होऊ लागतात. हिवाळा सुरू झाल्यानंतर लगेच त्याचे परिणाम तुमच्या त्वचेवर आणि केसांवर दिसायला लागतात. केसांमध्ये कोंडा तयार होतो आणि त्वचा कोरडी होते त्यामुळे हिवाळ्यात शरीराप्रमाणेच केसाची आणि त्वचेची काळजी घेणे देखील आवश्यक आहे. जर तुम्ही त्वचा आणि केसांची योग्य काळजी घेतली नाही तर तुम्हाला त्यांच्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागेल. कानपूर येथील डॉक्टर दीक्षा कटियार म्हणतात की केस आणि त्वचा निरोगी ठेवण्यासाठी योग्य जीवन शैलीचे पालन करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात अनेक लोक केस आणि त्वचेशी संबंधित समस्यांनी त्रस्त असतात. हिवाळ्यामध्ये आरोग्यासोबतच त्वचा आणि केसांची काळजी घेण्यासाठी योग्य दिनचर्येचे पालन करणे आवश्यक आहे. हिवाळ्यात त्वचेची चमक परत आणण्यासाठी काय करावे हे जाणून घेऊ तज्ञांकडून.
कोरडी त्वचा
हिवाळ्यात त्वचा कोरडी होणे ही एक सामान्य समस्या आहे. कोरड्यात त्वचेमुळे हिवाळ्यात त्वचेची जळजळ होते असे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यामुळे हिवाळ्यात कोरडी त्वचा असलेले लोक कोरफड जेल लावू शकता. त्याचबरोबर हिवाळ्यात पुरेसे पाणी पिणे देखील फायदेशीर ठरू शकते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणे
चमकदार त्वचा मिळवण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे आवश्यक आहे. हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करणाऱ्या पदार्थांचे सेवन करणे आवश्यक आहे. ज्यामुळे तुमचे शरीर हिवाळ्यात आजारांपासून दूर राहण्यासाठी तयार होइल. शरीर आतून निरोगी असेल तर त्वचा ही आरशासारखी चमकते.
डिटॉक्सिफिकेशन
हिवाळ्यात चमकदार आणि स्वच्छ त्वचा मिळवण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन करणे आवश्यक आहे. डिटॉक्सिफिकेशन योग्य पद्धतीने होण्यासाठी मूत्रपिंडाची आणि यकृताची काळजी घेणे आवश्यक आहे. नैसर्गिकरित्या किडनी डिटॉक्स करणाऱ्या पदार्थाचे सेवन मोठ्या प्रमाणात करा.
वैयक्तिक काळजीसाठी सल्ला घ्या
प्रत्येकाच्या आरोग्याच्या समस्या या वेगवेगळ्या असतात. चांगल्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ल्या घेऊन तुम्ही तुमच्या गरजेनुसार योग्य उपचार मिळवू शकता. यामुळे तुमचा त्वचेशी संबंधित समस्या दूर होतील.