घरातील सकारात्मकता वाढवायची असेल तर मीठाचा अशा पद्धतीने करा वापर
मीठ तुमच्या घरातील नकारात्मकता दूर करण्यास मदत करते. होय तुम्ही ऐकताय ते खरं आहे, मीठ आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेते त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते. त्यामुळे प्रत्येकाने आपल्या घरात रॉक मिठाचा दिवा ठेवून मिठाच्या पाण्याने पुसल्यास घरातील नकारात्मकता दूर होते. तर आता आपण मिठामुळे कशी नकारात्मकता दूर होते याबाबत जाणून घेणार आहोत.
मुंबई : प्रत्येकजण आपलं घर नेहमी उत्साही, सकारात्मक, आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. कारण घर जितकं आनंदी राहील तितकंच प्रत्येकाला ऊर्जा मिळत असते. पण घरामध्ये असं वातावरण तयार करणे खूप गरजेचं असतं. यामुळे आपल्या मनाला आराम मिळतो, आनंद मिळतो. पण काही लोकांच्या घरांमध्ये नकारात्मक वातावरण मोठ्या प्रमाणात असते. मग कौटुंबिक वाद, ताणतणाव, आर्थिक समस्या अशा अनेक गोष्टींमुळे घरात नकारात्मक वातावरण असते. यामुळे नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो, भांडण होतात. अनेक वेगवेगळे उपाय करून देखील घरातील नकारात्मकता दूर होत नाही. तर अशा परिस्थितीत मिठाचा उपयोग आवर्जून करा.
बाहेरची नकारात्मकता घरात येऊ द्यायची नसेल तर तुमच्या घराच्या गेट समोर मीठ टाका. त्यानंतर तिथे पाण्याने स्वच्छ धुऊन काढा. यामुळे बाहेरची नकारात्मक ऊर्जा तुमच्या घरात येत नाही. तसेच तुमचे घर हसते खेळते, सकारात्मक, आनंदी राहण्यास मदत होते.
जेव्हाही तुम्ही तुमच्या घरातील फरशी पुसत असाल त्यावेळी फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये मीठ टाका आणि या मिठाच्या पाण्याने घरातील फरशी स्वच्छ पुसा. यामुळे तुमचं घर स्वच्छ तर होतं सोबतच घरामध्ये सकारात्मक ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. पण गुरुवारी या पाण्याने फरशी पुसू नका. बाकीच्या दिवशी मीठ टाकून तुम्ही फरशी पुसू शकता.
जर तुम्हाला तुमच्या घरातील नकारात्मक दूर करायची असेल तर समुद्रातील खारे मीठ घेऊन या आणि ते एखाद्या काचेच्या बॉटलमध्ये किंवा भरणीमध्ये भरून ते घरात ठेवा. यामुळे तुमच्या घरातील नकारात्मकता दूर होण्यास मदत होते. तसेच घरामध्ये नेहमी सकारात्मक, आनंदी वातावरण निर्माण होते.
जर तुमच्या बाथरूममध्ये कोणताही प्रकारचा वास्तुदोष असेल तर तेथे मीठ टाका. यामुळे तेथील नकारात्मकता दूर होते. तसेच तुमच्या घरात होणारे भांडण देखील कमी होते आणि तुमच्या घरामध्ये नेहमी सकारात्मक वातावरण राहते.