लक्षद्वीपवर कुठे आहे टॉपलेस बीच, येथे येण्यासाठी घ्यावी लागते कोणाची परवानगी?

Lakshadweep Tour : लक्षद्वीप बेटावर येण्यासाठी आता अनेक लोकं उत्सूक आहेत. कारण गुगलवर लक्षद्वीपबाबत अनेक जण सर्च करत आहेत. लक्षद्वीपबाबत खूप कमी लोकांना माहित आहे. लक्षद्वीपवर फिरण्यासाठी वेगवेगळे बीच आहेत. या बीचवर तुम्ही चांगला वेळ घालवू शकता. दरम्यान या ठिकाणी एक टॉपलेस बीच देखील आहे. जो चर्चेत आहे.

लक्षद्वीपवर कुठे आहे टॉपलेस बीच, येथे येण्यासाठी घ्यावी लागते कोणाची परवानगी?
Follow us
| Updated on: Jan 09, 2024 | 8:40 PM

Lakshadweep Topless Beach : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लक्षद्वीप दौऱ्यानंतर ते चांगलेच चर्चेत आले आहे. इतके दिवस कधीच त्याला प्रसिद्धी मिळाली नाही ती आता मिळत आहे. गुगलवर पण लोकं लक्षद्वीपबद्दल सर्च करु लागले आहेत. लक्षद्वीप हा भारताचा केंद्रशासित प्रदेश आहे जो अनेक बेटांचा समूह आहे. लक्षद्वीपला नैसर्गिक सौंदर्य लाभले आहे. मालदीवमध्ये अनेक जण जातात. पण आता भारत त्याला पर्याय म्हणून लवकरच लक्षद्वीपला डेव्हलप करु शकतो.

लक्षद्वीपला तुम्ही कुटुंबासोबत जा किंवा मित्रांसोबत. तुम्हाला नक्कीच त्याचा खूप चांगला अनुभव मिळेल. याचं एक प्रमुख कारण म्हणजे येथे गर्दी कमी असते. येथे तुम्ही स्कूबा डायव्हिंग, स्नॉर्कलिंग, विंडसर्फिंग, मासेमारी इत्यादीसारख्या साहसी गोष्टींचा अनुभव घेऊ शकता. परंतु येथे एक बीच आहे जे चर्चेत आहे. ज्याला टॉप लेस बीच असेही म्हणतात.

आगत्ती बेट

लक्षद्वीप समुहामध्ये असलेले ३२ बेटांपैकी एक आगत्ती बेट आहे. येथे तुम्हाला खूपच कमी लोकं भेटतील. येथे एकांतात वेळ घालवायचा असेल तर ही जागा परफेक्ट आहे. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत येथे शांत वेळ घालवू शकता.  अगट्टी बेटाला टॉपलेस बीच म्हणून देखील ओळखले जाते. कारण त्याचा एक भाग आहे जिथे लोकांना कपड्यांशिवाय राहण्याची परवानगी आहे. पांढर्‍या वाळूचे किनारे आणि निळ्याशार समुद्राने वेढलेल्या या बेटावर तुम्ही आपल्या जोडीदारासोबत चांगला वेळ घालवू शकता. चहूबाजूंनी हिरव्यागार नारळाच्या झाडे तुमच्यासाठी एक वेगळाच अनुभव असेल. येथे तुम्ही शाकाहारी भोजनासोबतच समुद्री खाद्यपदार्थांचाही आनंद घेऊ शकता. येथे राहण्यासाठी रिसॉर्ट्स देखील आहेत जे तुमची सुट्टी आणखी खास बनवतील.

हे सुद्धा वाचा

परवानगी घेणे आवश्यक आहे

मिळालेल्या माहितीनुसार, आगत्ती बेटावर कपड्यांशिवाय राहण्याची परवानगी असली तरी प्रत्येकाला येथे जाण्याची परवानगी नाही. या समुद्रकिनाऱ्याला भेट देण्यासाठी काही नियमांचे पालन करावे लागेल आणि या बेटावर जाण्यासाठी तुम्हाला परमिट देखील आवश्यक आहे.

आगत्ती बेटावर कसे जायचे

कावरत्ती बेटाच्या पश्चिमेस आगत्ती बेट वसले आहे. जे कोचीपासून सुमारे ४५९ किलोमीटर अंतरावर आहे. कोची येथून तुम्ही येथे हेलिकॉप्टरने येऊ शकता. आगत्ती गावाला जोडलेला एकच रस्ता आहे जो पूर्व आणि पश्चिम भागांना जोडतो.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.