ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का घालतात? आहे खास कारण
ऑपरेशन करताना डॉक्टर हिरवे किंवा निळे कपडे का घालतात याचे एक खास कारण आहे. याचे कारण फार रंजक आहे. नेमकं याचं कारण काय आहे ते पाहुया.
आपण कोणत्यातरी कारणांमुळे हॉस्पिटलमध्ये तसं जाणं होतं. तसेच कुटुंबातील किंवा मित्रांमधील कोणी अॅडमीट असेल तर त्यांना पाहायलाही आपण जातो. हॉस्पिटमधल्या अशा बऱ्याच गोष्टी असतात ज्यांच्याबद्दल आपल्याला फार ज्ञान नसतं. त्यातील एक गोष्ट म्हणजे ऑपरेशनच्या वेळी डॉक्टर हिरव्या किंवा निळ्या रंगाचेच कपडे का घालतात?
हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि तिथला स्टाफ नेहमी पांढऱ्या कपड्यांमध्ये दिसून येतात. मात्र, डॉक्टर आणि नर्स ऑपरेशनसाठी जातात तेव्हा हिरव्या किंवा निळ्या रंगाचे कपडे घालतात. किंवा आपण हे बऱ्याचदा चित्रपटांमध्येही पाहिलं असेल. पण तुम्ही कधी हा विचार केलाय का की डॉक्टर याच रंगाचे कपडे का घालतात?
या मागे एक खास कारण आहे. जाणून घेऊयात ते कारण काय आहे ते
खरं तर पूर्वी ऑपरेशन करतेवेळी डॉक्टर पांढऱ्या कपड्यातच असायचे. पण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला, एका सुप्रसिध्द डॉक्टराने पांढऱ्या कपड्याच्या ऐवजी हिरव्या रंगाच्या कपड्याचा वापर केला. त्यांना वाटले की, अस केल्याने डॉक्टर आणि इतर स्टाफ यांच्या डोळ्यांना आराम मिळेल. काही संशोधक आणि तज्ज्ञांच्या मते हिरवा रंग आपले मन शांत ठेवतो.
रक्ताचा लाल रंग पाहून ताण येण्याची शक्यता असते
काहीवेळा डॉक्टरांना बराच वेळ ऑपरेशन थिएटरमध्ये राहावे लागते. अशावेळी त्यांना रक्ताचा लाल रंग पुन्हा पुन्हा पहावा लागतो. लाल रंग जास्त वेळ नजरेसमोर असल्याने डॉक्टर आणि इतर स्टाफच्या डोळ्यांवर ताण येऊ शकतो. किंवा एखाद्याला अस्वस्थताही जाणवू शकते.
ड़ॉक्टरांचे शस्त्रक्रियेवर लक्ष केंद्रीत होण्याासाठी
अशावेळी डॉक्टर शस्त्रक्रियेवर लक्ष केंद्रीत करु शकत नसल्याची शक्यताही असते . त्यांच्या डोळ्यांना सतत लाल रंग दिसू नये यासाठी ऑपरेशन थिएटरमध्ये डॉक्टर हिरव्या रंगाचा पोशाख घालण्याची प्रथा सुरु झाली ती आजपर्यंत सुरुच आहे.
व्हिज्युअल एक्सपर्टच्या म्हणण्यानुसार लाल रंगावर सतत लक्ष केंद्रित केल्यानंतर ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरला पांढऱ्या रंगाचा पृष्ठभाग दिसला तर हिरवा रंग दिसल्याचा भ्रम निर्माण होईल. म्हणजेच, जर डॉक्टर रुग्णाच्या लाल रक्ताचे सतत निरीक्षण केल्यानंतर, पांढऱ्या रंगाचा कोट किंवा मास्क घातलेल्या स्टाफवर नजर टाकतील, तेव्हा त्यांना प्रत्येक रंगाचे भ्रम दिसतील.
व्हिज्युअल डिस्टरब्रँस होत नाही
वैज्ञानिक भाषेत याला ‘व्हिज्युअल इल्युजन’ म्हणतात. खर तर पांढऱ्या प्रकाशात इंद्रधनुष्याचे सर्व रंग असतात. लाल रंगाचा प्रभावामुळे डोळ्यांना पांढऱ्या पृष्ठभागावरूनही हिरवा रंग दिसतो. अशावेळी जेव्हा डॉक्टर रुग्णाच्या लाल रंगाकडे पाहून त्याच्या स्टाफने आधीच घातलेल्या हिरव्या किंवा निळ्या रंगाकडे बघेल तेव्हा हिरव्या रंगाचा भ्रम त्यात लगेच मिक्स होईल आणि त्यामुळे कोणताही व्हिज्युअल डिस्टरब्रँस होणार नाही.
तशीच बाजू निळ्या रंगाच्या बाबतीतही आहे. कारण निळा रंग पाण्याचा अन् आकाशाचा शांत रंग आहे. त्यामुळे हा रंग देखील हिरव्या रंगाप्रमाणे डोळ्यांना शांतता देतो. अशा बऱ्याच वैज्ञानिक कारणांमुळे डॉक्टर निळ्या किंवा हिरव्या रंगाचे कपडे ऑपरेशनवेळी घालतात.