Aaditya Thackeray : ‘शांततेत रेप झाला कुणाला कळला…’ काय म्हणाले आदित्य ठाकरे?
"भाजप आता हिंदुत्व धोक्यात आहे, यावर राजकारण करेल. 2 एप्रिलला वक्फ कायदा आणला. भाजपच्या सगळ्या नेत्यांची भाषणे पाहा. भाजपनेच हिंदुत्व सोडलं आहे. सिद्धिविनायक मंदिरावर वक्फने दावा ठोकला अशी भाजपने अफवा उठवली होती. रोहिंगे आणि बांग्लादेशीं घुसले कसे?" असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.

“लाडकी बहीण 500 वर आणायची तयारी सुरू आहे. भाजप, एसंशी, दादाचा गट असेल यांना ठासून आल्यावर सुद्धा एक योजना आणू शकत नाही. याला निर्लज्जपणे म्हणतात. यांचेच कोणीतरी कोर्टात जाईल आणि योजना बंद करतील” असा दावा आदित्य ठाकरे यांनी केला. ते नाशिक येथे उद्धव ठाकरे गटाच्या निर्धार शिबीरात बोलत होते. “हे सरकार निवडणूक आयोगाचे सरकार आहे. पहिल्या शंभर दिवसांत महिलांवर अत्याचार वाढले. शांततेत रेप झाला कुणाला कळला नाही म्हणून सांगणारे आपल्याकडे गृहराज्यमंत्री आहेत. गेंड्याची नसेल अशी कातडी या सरकारची आहे” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. “बीडचे फोटो प्रेसने दाखविले, तेव्हा मंत्र्यांचा राजीनामा घेतला. भाजपचे आमदार सांगत होते, विधानसभेत सांगत होते, तरी मुख्यमंत्री कारवाई करत नव्हते. शेतकरी बांधवांची फसवणूक झाली आहे” असं आदित्य ठाकरे म्हणाले.
“सरकार आले, 135 आमदार आले. एसंशी चिटकले, बाहेर पडले तर जेलमध्ये जातील. नाराज झाले गावाकडे गेले. अजित पवारांनी सांगून टाकले आहे. उद्धव ठाकरे यांनी निवडणूक समोर नसतांना कर्जमाफी दिली. शक्ती बीलला भाजपने विरोध केला, तोच कायदा उद्धव ठाकरेंनी पास केला. कर्ज घेऊन साखरपुडा करतात म्हणाले त्यांना शिक्षा झाली. पण तेच निर्लज्जपणे शेतकऱ्यांना धमक्या देतात. डाओसला जाऊन कंपन्या आणल्या, मग तिजोरीत घंटा वाजत आहे” अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.
सगळीकडे लाडके कॉन्ट्रॅक्टर ही योजना आहे
“भाजप इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्राला मागे घेऊन जाईल. सगळीकडे लाडके कॉन्ट्रॅक्टर ही योजना आहे. महाराष्ट्रात एसंशीने लूट करून ठेवली. धर्म, जात आणि जिल्हा यामध्ये वाद निर्माण करून ठेवले. आपल्याला आपल्यात व्यस्त ठेवले जात आहे. केंद्रात आणि राज्य सरकार सत्ता आणतांना विकासावर लढायला सांगितले. जे सांगितले होते, ते आले का नाही. काळा पैसा, मेक इन इंडिया, भ्रष्टाचार कमी झाला का ?” असा सवाल आदित्य ठाकरे यांनी विचारला.
ते भाजपात गेले आणि धुतले गेले
“ज्यांच्यावर डाग होते, ते भाजपात गेले आणि धुतले गेले. पुलवामा, बालाकोटचा विषय 19 ला आला. आता विकासावर बोलायला तयार नाही. आपला विरोधक पाकिस्तान होता, आता देशातच भांडणं लावली, गावात जातीचे वाद सुरू, पाण्यावर भांडण होते” असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.