अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला सगळीकडूनच विरोध, कुटुंबियांची वणवण

| Updated on: Sep 26, 2024 | 11:03 PM

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर होऊन 3 दिवस झाले तरी देखील अद्याप त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यासाठी परवानगी मिळालेली नाही. कारण कळव्यात मनसेनं दफनविधीसाठी जमीन देण्यास विरोध केला. तर अंबरनाथमध्येही नगरपरिषदेनं परवानगी दिली नाही. मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांची वणवण सुरु आहे.

अक्षय शिंदेच्या अंत्यसंस्काराला सगळीकडूनच विरोध, कुटुंबियांची वणवण
Follow us on

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाल्यानंतर 3 दिवस झाले आहेत. मात्र अद्याप त्याच्यावर अंत्यसंस्कार झालेले नाहीत. कळव्यात मनसेनं दफनविधीसाठी जमीन देण्यास विरोध केला. तर अंबरनाथमध्येही नगरपरिषदेनं परवानगी दिली नाही. त्यामुळे मुलावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीयांची वणवण सुरु आहे. दुसरीकडे अद्याप अक्षय शिंदेच्या कुटुंबीयांना दफनविधीसाठी जमीन मिळत नाहीये. अंबरनाथमध्ये हिंदू स्मशानभूमीची पोलिसांसोबत पाहणी केल्यानंतर, अंबरनाथ नगर परिषदेत अर्जही केला. पण अधिकारी नसल्यानं पत्रावर सहीच मिळाली नसल्याचं अक्षयच्या वडिलांचं म्हणणं आहे. मुलाच्या दफनविधीसाठी कुटुंबीयांची अक्षरश: वणवण सुरु आहे.

आधी कळव्यात दफनविधी करण्याचा प्रयत्न अक्षयच्या कुटुंबीयांनी केला. मात्र मनसेनं कडाडून विरोध केला. मनसेच्या कार्यकर्त्यांनी कळवा पोलीस स्टेशन आणि प्रभाग समितीत विरोधाचं पत्रही दिलं. अक्षयच्या वडिलांनी एन्काऊंटरवरुन पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. तसं पत्रच मुंब्रा पोलिसांकडे अक्षयच्या कुटुंबीयांनी दिलंय. ते पत्र मुंब्रा पोलिसांनी तपास करणाऱ्या सीआयडीकडे दिलं आहे.

अक्षय शिंदेचा एन्काऊंटर आणि बदलापुरातील त्या शाळेतल्या घटनेवरुन संजय राऊतांनी, गंभीर आरोप केलेत. बदलापूरच्या शाळेत चाईल्ड पॉर्न फिल्म तयार होत होत्या असं उल्लेख याचिकेत असून फरार असलेले शाळेचे संस्थाचालकांना वाचवण्यासाठी, अक्षय शिंदेचा एन्काऊंटर करुन पुरावाच संपवला, असा आरोप राऊतांनी केला आहे.

ज्या शाळेत चिमुकल्यांच्या 2 मुलींवर अत्याचार झाले. त्या शाळेचे संस्थाचालक उदय कोतवाल आणि संस्थेचे सचिव तुषार आपटे अजूनही पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यावरुन आता राऊतांनी चाईल्ड पॉर्न फिल्मचा आरोप करुन खळबळ उडवली आहे. विशेष म्हणजेच, ज्या दिवशी आरोपी अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाला. त्याच दिवशी फरार आरोपी उदय कोतवाल आणि तुषार आपटेंनी मुंबई हायकोर्टात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. त्यावर 1 ऑक्टोबरला सुनावणी आहे. तर ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री शिंदे आणि फडणवीसांचे श्रेयवादाचे पोस्टर लागत आहेत. त्यावरुन सिंघम होण्याची स्पर्धा असल्याची टीका राऊतांनी केली आहे.