Inside Story : मुंबईसाठी मेगाप्लॅन ते विद्यामान आमदारांचे तिकीट कापणार? भाजपची विधानसभेसाठी रणनीती

| Updated on: Sep 27, 2024 | 8:12 PM

यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. अमित शाह यांनी याबाबत नागपूर येथील बैठकीत सूचक संकेत दिले आहेत. अमित शाह यांनी नागपुरात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी याबाबतचं सूचक वक्तव्य केलं.

Inside Story : मुंबईसाठी मेगाप्लॅन ते विद्यामान आमदारांचे तिकीट कापणार? भाजपची विधानसभेसाठी रणनीती
अमित शाह
Follow us on

विदर्भ आणि मराठवाड्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचं आता मिशन मुंबई सुरु आहे. अमित शाह मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघांचा विभागनिहाय आढावा घेणार आहेत. अमित शाह 1 किंवा 2 ऑक्टोबरला मुंबईच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजप कामाला लागली आहे. मुंबईतील मतदारसंघांसाठी अमित शाह यांनी विशेष प्लॅनिंग आखलं आहे. अमित शाह मुंबईतील डेंजर झोनमधील मतदारसंघांचा स्वत: आढावा घेणार आहेत. अमित शाह मुंबईतील कार्यकर्त्यांसोबत संवाददेखील साधणार आहेत. अमित शाह यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजप अलर्ट मोडवर आहे. पुढील तीन दिवस मतदारसंघ पिंजून काढण्याचे पदाधिकाऱ्यांना आदेश आहेत. तीन दिवसात मुंबईतील प्रत्येक विघानसभा मतदारसंघाचा एक रिपोर्ट तयार केला जाणार आहे.

दरम्यान, यंदा भाजपच्या अनेक विद्यमान आमदारांची उमेदवारी धोक्यात येण्याची शक्यता आहे. अमित शाह यांनी याबाबत नागपूर येथील बैठकीत सूचक संकेत दिले आहेत. अमित शाह यांनी नागपुरात आढावा बैठक घेतली होती. त्यावेळी त्यांनी याबाबतचं सूचक वक्तव्य केलं. अमित शाह यांच्या या संकेतामुळे आता कोणकोणत्या आमदारांचं तिकीट कापलं जाणार? ते पाहणं महत्त्वाचं आहे.

अमित शाह नेमकं काय म्हणाले?

“माझं तिकीट एकेकाळी कापलं गेलं होतं, आज नाईलाजाने मला तिकीटं कापावी लागत आहेत”, असं म्हणत अमित शाहांनी नागपूरच्या बैठकीत आपला अनुभव सांगितला. आमच्यापैकी कुणाचे तिकीट कापलं तर आम्ही बंड करणार नाही, असं अमित शाह यांनी बैठकीत आमदारांकडून वदवून घेतलं. यावेळी शाह यांनी कुशाभाऊंचं उदाहरण दिलं. “नाराज झालात तरी तुमची मनधरणी करायला कोणी घरी येणार नाही. वयाच्या पस्तीशीत असताना पक्षाने माझं आमदारकीचं तिकीट कापलं होतं. माझं तिकीट कापलं मी दु:खी असल्याचं कुशाभाऊ ठाकरेंना सांगितलं होतं”, असा किस्सा अमित शाह यांनी सांगितला.

“कुशाभाऊ ठाकरे माझ्या घरी आल्यावर त्यांच्यासोबत बोललो होतो. त्यावेळी तू प्रचार करु नको. कारण दु:खी मनाने कुणी काम करु शकत नाही, असं कुशाभाऊ म्हणाले होते. तुमझ्याकडे कुणी येणार नाही हे देखील बघ, कारण ज्याला घरी जाऊन समजावे लागते तो कार्यकर्ताच नाही, असं कुशाभाऊ मानायचे”, असं अमित शाह यांनी सांगितलं.