मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारताच फडणवीसांनी सांगितला मुंबईच्या विकासाचा मेगा प्लॅन; म्हणाले, धारावीत…
Devendra Fadnavis on Dharavi Redevelopment : देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता नव्या सरकारच्या कामकाजाला सुरुवात झाली आहे. आजपासून विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होणार आहे. वाचा सविस्तर...
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्विकारताच देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई शहराच्या विकासाबद्दल आणि धारावी पुनर्विकास प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे. एका वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी विकासप्रकल्पांवर मत मांडलं. धारावी पुनर्विकास प्रकल्पाची संकल्पना राजीव गांधींनी ठेवली. जो कुणी विकासक राहिला असता त्याला टीडीआरची मोनोपली करता आली असती. टीडीआरची कॅपींग करा सांगितलं, कुणाकडे किती टीडीआर शिल्लक आहे. त्यातून कुणाला किती विकता येईल हा बदल केला. टेंडरमध्ये अदानी जिंकले. त्यामुळे त्यांना हा प्रकल्प दिला गेला. धारावीतच आपण तिथेच वसवणार आहोत. जे धारावीच्या क्रायटेरीयात बसत नाहीत. त्यांना आपण रेंटल हाऊसींग देणार आहोत. बीडीडी चाळ अर्बन रिनुवलचा सर्वात मोठा प्रकल्प आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
मुंबईतील विकासकामांवर फडणवीस काय म्हणाले?
2016 साली एक घोषणा केली होती की मुंबईच्या कुठल्याही भागात फक्त 1 तासांपेक्षा कमी वेळ लागला पाहिजे. कोस्टल रोड, वरळी – बांद्रा, वर्सोवा-मढच काम सुरू आहे, जपान सरकार 40 हजार कोटी देणार आहे. आपल्या मुंबईचा 60% ट्रॅफीक कमी होणार आहे. विरार अलीबागच्या कॉरीडोरच काम सुरू केलं आहे. अटल सेतूचं काम झालं आहे. 375 किमीचं मेट्रो नेटवर्क आपण पूर्ण करतोय. सगळं काम होईल, तेव्हा मुंबईकरांचं काम कमी होईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत.
मुंबईकरांना जीवनात 3 तास जास्त मिळतील, सबर्बन मेट्रो, बस सिस्टीमच काम करतोय. रोड, फ्लाय ओव्हरच काम मोठ्या प्रमाणात करतोय. बीडीडी चाळ, म्हाडाचे रहिवास,अभ्युदय नगरच काम काम करतोय. बिल्डरांच्या घश्यात घालण्यापेक्षा गृहनिर्माणने आपण काम करतोय. मुंबई बॅंके मार्फत प्रविण दरेकर कर्ज देत आहेत. 3 पट मोठी मुंबई आपण देतोय. विरार पर्यंत परवडणारी घर देता येईल. मुंबईकरांच स्वप्न आपल्याला पूर्ण करता येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट काय?
मुख्यमंत्रिपदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल सांगितलं. येत्या काळात अनेक गोष्टी करायच्या आहेत. माझा भर हा नदीजोड प्रकल्पांवर राहणार आहे. महाराष्ट्राला कायम दुष्काळातून मुक्त करायचं आहे. ग्रीन प्रोजेक्ट्सवर माझा भर राहणार आहे. सगळ्यात जास्त फायदा शेती आणि उद्योगाला होणार आहे. वेगवेगळे प्रकल्प आम्ही घेऊच. येत्या काळात महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्यासाठी मी प्रयत्नशील असेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी या मुलाखतीत सांगितलं.