उद्घाटनाच्या वादावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने

पुणे मेट्रोच्या एका मार्गिकेचं आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार होते. पण काल मुसळधार पाऊस झाल्याने मैदानावर चिखल झाल्याने आणि मुसळधार पावसाचा इशारा दिल्याने हा उद्घाटन सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. यावरुन आता सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले आहेत.

उद्घाटनाच्या वादावरुन सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 10:53 PM

पावसामुळे पुणे मेट्रोच्या एक मार्गिकेचा उद्घघाटन सोहळा रद्द झाला आहे. त्यावरुन मविआ आणि महायुतीचे नेते आमने-सामने आले आहेत. मोदींच्या हस्ते हे उद्घाटन होणार होतं. पण आता मविआनं उद्याच उद्घाटनाचा इशारा दिला आहे. उद्घाटनांवरुन आता मविआ आणि महायुतीत संघर्ष रंगतो आहे. मोदींच्या हस्ते पुण्यातील शिवाजीनगर ते स्वारगेट या भुयारी मेट्रो मार्गीकेचं उद्घाटन होणार होतं. पण रात्रीच्या पावसामुळे उद्घाटन सोहळा रद्द करावा लागला. त्यावरुन इतक्या दिवसांपासून काम पूर्ण झालेलं असूनही फक्त मोदींच्या हस्ते उद्घाटन व्हावं यासाठी विलंब केला जातो आहे. उद्घाटन कार्यक्रमांवर उधळपट्टी सुरु असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. दुसरीकडे मोदींना पुन्हा पुण्यात बोलावून उद्घाटन करण्याचा निश्चय भाजपनं व्यक्त केला आहे.

आता मविआकडून या मेट्रोकामाचं उद्घाटनाचा इशारा देण्यात आल्यानं सत्ताधारी-विरोधक आमने- सामने आले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाईन पद्धतीनं पुणे मेट्रो मार्गिकेचं उद्घाटन करतील अशीही एक शक्यता वर्तवली जाते आहे. तिकडे रोहित पवारांच्या जामखेड मतदारसंघातल्या कुसडगावात SRPF प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनाचा वाद रंगला आहे. रोहित पवारांसह समर्थकांनी प्रशासनाचा विरोध झुगारुन SRPF प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन केलं.

प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन अनिल देशमुख आणि अनिल परबांच्या हस्ते होणार होतं. पण भाजपनं उद्घाटन सोहळ्याला विरोध केला होता. SRPF प्रशिक्षण केंद्र हे मविआ सरकारच्या काळात मंजूर झालं. बांधकामासाठी 34 कोटी 37 लाख रुपयांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन 22 जून 2022 ला प्रशिक्षण सुरु करण्याचे आदेशही निघाले होते. मात्र 30 जून 2022 ला शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आलं.

महायुती सरकारनंतर हे प्रशिक्षण केंद्र जळगावच्या वरणगावला हलविण्याच्या हालचाली झाल्या. भुसावळचे भाजप आमदार आमदार संजय सावकारेंनी देवेंद्र फडणवीसांना पत्र लिहून SRPF प्रशिक्षण केंद्र वरणगावलाच आधी मंजूर झाल्याचा दावा केला. त्यामुळे सरकारनंही जामखेडमधलं काम स्थगितीचे आदेश काढत वरणगावला सेंटर नेण्याचा निर्णय घेतला. त्याच कामाच्या उद्घाटनावरुन वादावादी रंगली आहे.

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.