मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी (Sharad Pawar Home Attack) सदावर्ते दाम्पत्याच्या अडचणी आहेत. त्यातच गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील (Jayshree Patil) यांचा एक व्हिडीओ व्हायल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांचा आक्रस्थाळेपणा दिसत आहे. त्या कुणावर तरी हात उचलत आहे. या व्हिडीओत क्रिस्टर टॉवरमधील एक महिला म्हणत आहे की तू तिला मारलं आहे. त्यावर जयश्री पाटील या थेट येऊन एक महिलेच्या अंगावर धावून जाताना दिसत आहे. यावेळी आरडाओरडीचा आवाजही येत आहे. एक लहान मुलीच्या रडण्याचाही आवाज व्हिडीतून येत आहे. दरम्यान, नेमका काय प्रकार आहे. ते मात्र कळू शकलेलं नाही. सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. यामुळे जयश्री पाटील अडचणीत येण्याची शक्यता आहे.
जयश्री पाटील यांचा शोध घेण्यासाठी आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) पथकं तैनात केली आहे. सदावर्ते यांना झालेल्या अटकेनंतर जयश्री पाटील यांनी पोलिस संरक्षण सोडलं होतं. त्यानंतर आता पोलिसांकडून जयश्री पाटील यांचं शोध घेतला जात असल्याचं सांगितलं जातंय. मात्र अद्याप त्या कुठे आहेत, याबाबतची माहिती कळू शकलेली नाही. महत्त्वाची बाब म्हणजे गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाल्यानंतर पोलीस संरक्षण जयश्री पाटील यांनी का सोडलं, असाही प्रश्न उपस्थित केला जातो आहे. दरम्यान, जयश्री पाटील यांनी अटपूर्वी जामीनासाठी अर्ज केला आहे.
शरद पवार यांच्या घरावर दुपारच्या सुमारास अचानक काही एसटी कर्मचारी धडकले होते. यावेळी पवारांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी चप्पल फेकून घोषणाबाजी करत काहींनी संताप व्यक्त केला होता. यानंतर पोलीस यंत्रणेचीही तारांबळ उडाली आहे. अचानक उडालेल्या या गोंधळानंतर शरद पवारांच्या घराबाहेर घडलेल्या या प्रकरणाची गंभीर दखल घेण्यात आली. अनेकांना याप्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलं असून सध्या या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून कसून तपास केला जातो आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी सुरुवातील गुणरत्न सदावर्ते यांना ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर आता त्यांना एका वेगळ्या प्रकरणी सातारा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आलं आहे. तर दुसरीकडे आता सदावर्ते यांची पत्नी जयश्री पाटील यांचाही शोध पोलिसांकडून घेतला जात असून, त्यांनाही पोलिस ताब्यात घेण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. दरम्यान, जयश्री पाटील यांचा हा व्हिडीओ व्हायर झाल्याने त्यांच्या अडचणी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे.
इतर बातम्या
औरंगाबादमध्ये सुप्रिया सुळेंच्या कार्यक्रमात गदारोळ
‘वर्षा’वर मुख्यमंत्री-गृहमंत्र्यांमध्ये सव्वा तास झाली बैठक
Akola : अकोल्यात ट्रकच्या धडकेत वृद्धाचा जागीच मृत्यू, अशोक वाटिका चौकातील घटना