Konkan Election Result 2024 : कोकणात महायुतीची सरशी, ठाकरे गटाचा फक्त एका जागेवर विजय, पाहा नवीन आमदारांची संपूर्ण यादी

| Updated on: Nov 23, 2024 | 5:48 PM

कोकणातील १५ मतदारसंघांसाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील ८ जागांवर शिंदे गट, ४ जागांवर भाजप आणि २ जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर फक्त एका जागांवर ठाकरे गटाचा विजय झाला आहे.

Konkan Election Result 2024 : कोकणात महायुतीची सरशी, ठाकरे गटाचा फक्त एका जागेवर विजय, पाहा नवीन आमदारांची संपूर्ण यादी
Follow us on

Konkan Election Result 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत झाली होती. अखेर या लढतीत महायुतीने महाविकासआघाडीचा सुपडा साफ केला आहे. महायुतीने तब्बल २२८ जागांवर आघाडी घेतली आहे. यात भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गट ५५ आणि राष्ट्रवादी अजित पवार गट ४१ जागांवर आघाडीवर आहेत. तर महाविकासआघाडीला फक्त ४७ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यात काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २१ आणि राष्ट्रवादी शरद पवार गट १० जागा मिळाल्या आहेत. तर अपक्ष-इतर यांना १३ जागा मिळाल्या आहेत.

महाराष्ट्रातील राजकारणात महत्त्वाचा विभाग मानला जाणार कोकणात कोण बाजी मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असते. कोकण म्हणजे शिवसेनेचा बालेकिल्ला, कोकण म्हणजे नारायण राणे अशी वाक्य कायमच राज्याच्या राजकारणात पाहायला मिळतात. पण यंदाच्या विधानसभा निवडणुकीत कोकणातील जनता कोणाला साथ देणार याची चर्चा सर्वत्र पाहायला मिळत होती. अखेर कोकणातील जनतेने महायुतीच्या पारड्यात यश टाकलं आहे. कोकणातील १५ पैकी १४ जागांवर महायुतीचे उमेदवार विजयी ठरले आहेत. तर एका जागेवर ठाकरे गट विजयी झाला आहे.

कोकणात महायुतीची सरशी, ठाकरे गट फक्त एका जागेवर विजयी

कोकण हा कायमच शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मात्र अडीच वर्षांपूर्वी शिवसेनेत फूट पडली होती. शिवसेनेचे सहा आमदार फुटून शिंदे गटात सामील झाले. यामुळे शिवसेनेत खूप मोठी फूट पडली. शिवसेनेची ताकद दोन गटांत विभागली गेली आहे. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत अनेक विधानसभा मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगला. कोकणातील १५ मतदारसंघांसाठी १२८ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यातील ८ जागांवर शिंदे गट, ४ जागांवर भाजप आणि २ जागांवर अजित पवार गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत. तर फक्त एका जागांवर ठाकरे गटाचा विजय झाला आहे.

 कोकणातील नवनिर्वाचित आमदारांची संपूर्ण यादी

मतदारसंघ विजयी पराभूत
दापोली रामदास कदम (शिवसेना शिंदे गट) संजय कदम (शिवसेना ठाकरे गट)
गुहागर भास्कर जाधव (शिवसेना ठाकरे गट) राजेश बेंडल (शिवसेना शिंदे गट)
चिपळूण शेखर निकम (अजित पवार गट) प्रशांत यादव (शरद पवार गट)
रत्नागिरी उदय सामंत (शिवसेना शिंदे गट) बाळ माने (ठाकरे गट)
राजापूर किरण सामंत (शिंदे गट) राजन साळवी (ठाकरे गट)
कणकवली नितेश राणे (भाजप) संदेश पारकर (ठाकरे गट)
कुडाळ निलेश राणे (शिंदे गट) वैभव नाईक (शिवसेना ठाकरे गट)
सावंतवाडी दीपक केसरकर (शिवसेना शिंदे गट) राजन तेली (शिवसेना ठाकरे गट)
पनवेल प्रशांत ठाकूर (भाजप) बालाराम पाटील (अपक्ष)
कर्जत सदाशिव थोरवे (शिवसेना शिंदे गट) सुधाकर घारे (अपक्ष)
श्रीवर्धन अदिती तटकरे (अजित पवार गट) अनिल नवगणे (शरद पवार गट)
उरण महेश बालदी (भाजप) प्रीतम म्हात्रे (अपक्ष)
महाड भरत गोगावले (शिवसेना शिंदे गट) स्नेहल जगताप (शिवसेना ठाकरे गट)
पेण रवीशेठ पाटील (भाजप) अतुल म्हात्रे (अपक्ष)
अलिबाग महेंद्र दळवी (शिंदे गट) चित्रलेखा (अपक्ष)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE

महाराष्ट्र विधानसभा इलेक्शन रिझल्ट 2024 LIVE Updates

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Coverage