Inside Story : पडद्यामागे भेटीगाठी, मंत्रिमंडळ विस्तार ते कुणाकुणाला मंत्रिपदाची संधी? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे

मंत्रिमंडळाचा विस्तार, अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे रविवारी नागपुरात होणार आहे. .येत्या सोमवारपासून नागपुरात हिवाळी अधिवेशन आहे. त्याआधी 35 मंत्र्यांचा शपथविधी होणार असल्याची माहिती आहे. त्याआधी भेटीगाठींना वेग आलाय.

Inside Story : पडद्यामागे भेटीगाठी, मंत्रिमंडळ विस्तार ते कुणाकुणाला मंत्रिपदाची संधी? तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे
ajitdada, devendra fadnavis and eknath shinde
Follow us
| Updated on: Dec 13, 2024 | 9:00 PM

मोहन देशमुख, इनपूट एडिटर, Tv9 मराठी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आधी उपमुख्यमंत्री अजित पवारांना भेटले. अजित पवारांना भेटून बावनकुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भेटीसाठी सागर बंगल्यावर आले. अजित दादा आणि फडणवीसांशी चर्चा झाल्यानंतर चंद्रशेखर बावनकुळे ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला आले आहेत. दरम्यान, विस्ताराच्याआधी शिंदेच्या शिवसेनेत जोरदार लॉबिंग सुरु आहे. शिवसेना नेते तानाजी सावंत आणि भरत गोगावलेंनी एकनाथ शिंदेंची भेट घेतली. आमदार संजय शिरसाट, उदय सामंत आणि प्रकाश सुर्वेही वर्षावर शिंदेंच्या भेटीला आले. शिंदेंच्या शिवसेनेत अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकरांचा पत्ता कट झाल्याची माहिती आहे. तर संजय राठोडांचा चान्स फिफ्टी फिफ्टी आहे. हे दोघेही गेल्या महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री होते. मात्र या दोघांनाही शिंदेंच्या शिवसेनेकडून अंतर्गत विरोध असल्याचं कळतंय.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिपदाचा फॉर्म्युलाही ठरलाय. एकूण 43 मंत्रिपदांपैकी भाजप स्वत:कडे 21 मंत्रिपदं ठेवणार असल्याचं कळतंय. शिंदेंच्या शिवसेनेकडे 13 तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 9 मंत्रिपदं मिळू शकतात. गृहखात्यासाठी शेवटपर्यंत एकनाथ शिंदेंनी आग्रह धरला. मात्र गृहखातं भाजप मित्रपक्षांना देणार नसल्याची माहिती आहे. गृह आणि अर्थ खातं भाजपकडेच राहील. गृह खातं फडणवीस स्वत:कडे ठेवतील. तर अर्थ खातं दुसऱ्या सहकाऱ्यांना देतील, अशी सूत्रांची माहिती आहे. शिंदेंच्या शिवसेनेकडे नगरविकास खातं आणि महसूल खातं जाईल. शिंदे स्वत:कडे नगरविकास खातं ठेवतील तर महसूल शिवसेनेतल्या दुसऱ्या सहकाऱ्याला देतील, अशी माहिती आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सार्वजनिक बांधकाम आणि गृहनिर्माण खातं असेल.

भाजपमध्ये कुणा-कुणाला मंत्रिपदाची संधी?

महायुतीत तिन्ही पक्षांची यादी जवळपास निश्चित झालीय. भाजपकडून चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, गिरीश महाजन, रवींद्र चव्हाण, प्रवीण दरेकर, मंगल प्रभात लोढा, बबनराव लोणीकर, पंकजा मुंडे, आशिष शेलार किंवा योगेश सागर या दोघांपैकी एकाला संधी मिळेल. संभाजी निलंगेकर, जयकुमार रावल, शिवेंद्रराजे भोसले, नितेश राणे, विजयकुमार गावित, देवयानी फरांदे किंवा राहुल आहेर, राहुल कुल, माधुरी मिसाळ, संजय कुटे आणि गोपीचंद पडळकर यांच्या गळ्यात मंत्रिपदाची माळ पडू शकते.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेतील ‘हे’ आमदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ

शिंदेंच्या शिवसेनेच्या संभाव्य यादीवर नजर टाकल्यास, दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, गुलाबराव पाटील, मंगेश कुडाळकर, अर्जुन खोतकर, भरत गोगावले, संजय शिरसाट, राजेश क्षीरसागर, आशिष जैस्वाल, प्रताप सरनाईक, प्रकाश सुर्वे, आणि प्रकाश आबिटकरांना संधी मिळू शकते.

अजित पवारांचे ‘हे’ शिलेदार घेऊ शकतात मंत्रिपदाची शपथ

अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा आत्राम, अदिती तटकरे अनिल पाटील, माणिकराव कोकाटे, इंद्रनिल नाईक, संजय बनसोडे, दत्ता मामा भरणे किंवा संग्राम जगताप किंवा राजू नवघरे यांना संधी मिळू शकते. मंत्रिमंडळाचा विस्तार अवघ्या 48 तासांवर आलाय. त्यामुळं पुढच्या 12 तासांत अधिकृत सरकारची अंतिम यादी समोर येईल.

अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी
अल्लू अर्जूनच्या जामिनाचा मार्ग मोकळा,इतक्या दिवसांची न्यायालयीन कोठडी.
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला
'ते' मंदिर कोणाचं हेही माहिती नाही अन्.., चित्रा वाघ यांचा कोणाला टोला.
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ
रविवारी भाजप, शिवसेनेसह राष्ट्रवादीचे कोणते नेते घेणार मंत्रिपदाची शपथ.
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार
आता मुंबईऐवजी 'या' ठिकाणी येत्या १५ तारखेला होणार मंत्रिमंडळ विस्तार.
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?
'राष्ट्रवादीवर बोलणारे मिटकरी कोण? त्यांना अकोल्यात..', कोणाचाी टीका?.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्.
विधानसभेतील पराभवानंतर मोठा निर्णय, नाना पटोले यांचं दिल्लीत पत्र अन्..
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?
राष्ट्रवादी पुन्हा एक होणार? रोहित पवारांच्या आईनं काय केलं वक्तव्य?.
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?
साऊथ सुपरस्टार अल्लू अर्जुनला ‘पुष्पा 2’प्रकरणी अटक, नेमकं काय घडलं?.
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील...
फडणवीसांचं वक्फ बोर्ड विधेयकासंदर्भात मोठं वक्तव्य, जिथे बोट ठेवतील....
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश
बेस्ट चालकांची सरप्राईज टेस्ट;महाव्यवस्थापकांचे कंत्राटदारांना निर्देश.