भावी मुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांचे 20 फुटी बॅनर झळकले आहेत. परंडा तालुक्यातील सरणवाडी गावात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर झळकले आहेत. महायुतीचे उमेदवार डॉ. तानाजी सावंत हे भूम परंडा वाशी विधानसभा मतदारसंघात विजयी झाल्याबद्दल यांचंही बॅनरवर अभिनंदन केलं आहे. बॅनरच्या वरच्या भागात बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांचे फोटो आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे मागासवर्गीय विभाग सेलचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र जाधव यांनी अजित पवारांचा भावी मुख्यमंत्री असा उल्लेख केलेला बॅनर लावलाय.
गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील खजरी गावाजवळ एसटी महामंडळाची शिवशाही बस उलटली आहे. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची भीती व्यक्त आहे. तर 15 ते 20 लोकं गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे.
“चंद्रकांत पाटील आणि माझे संबंध घरगुती असल्याने त्यांनी माझी भेट घेतली. मंत्रिपदाबाबत आज काही चर्चा झाली नाही. पिंपरीतील राष्ट्रवादीने आधीच अजित दादांकडे मागणी केलीय,” असं आमदार अण्णा बनसोडे म्हणाले.
पालघर जिल्ह्यातील चार विधानसभेच्या जागांवर फेरमतमोजणीची मागणी करण्यात येत आहे. वसई, नालासोपारा, बोईसर, विक्रमगड मतदारसंघात फेर मतमोजणी होणार. हितेंद्र ठाकूर यांच्या बविआ पक्षाने वसई, नालासोपारा, बोईसर विधानसभेची फेर मतमतमोजणी करण्याची मागणी केली. तर विक्रमगडचे शरद पवार गटाचे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील भूसारा यांनीही फेर मतमोजणीची मागणी केली. चारही विधानसभामध्ये फेर मतमोजणीसाठी जिल्हा निवडणूक अधिकारी यांना पराभूत उमेदवारांनी पत्र दिले आहेत.
पिंपरी चिंचवडमधल्या सर्वच जागा महायुतीने जिंकल्यानंतर आज भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी अजित पवार गटाचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांच्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. पुण्यात कालच बोलताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्रिपदी नवीन चेहराही असू शकतो असं विधान केलं होतं. त्याबाबत ते आज काय बोलणार अशी उत्सुकता असताना चंद्रकांत पाटील यांना याबाबत प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला असता पत्रकारांना हात जोडत निघून जाणं पसंत केलं.
मुंबई : “आम्ही शिवसेना नेत्यांची मतं अमित शहांसह महायुतीच्या ज्येष्ठ नेत्यांसमोर मांडली आहेत. एकतर महायुतीचे नेते महाराष्ट्रात बैठक घेऊन ड्राफ्ट तयार करतील किंवा दिल्लीतील महायुतीचे ज्येष्ठ नेते यावर तोडगा काढतील. कालच्या बैठकीत निवडणुकीतील विजय, सरकार कसं बनवायचं, कोण काय भूमिका घेणार… यावर बैठकीत चर्चा झाली. 1-2 दिवसात अंतिम तोडगा निघेल’, असं शिवसेना नेते शंभूराज देसाई म्हणाले.
“ईव्हीएमविरोधात कोर्टात गेलो, दोन दिवसांत निकाल दिला. आमदार अपात्रतेचा निकाल कोर्टानं लवकर दिला नाही. पाच-सहा जणांचं शिष्टमंडळ निवडणूक आयोगाला भेटणार. निकाल लागून पाच-सहा दिवस झाले, अजून सरकार अस्तित्वात नाही,” असं नाना पटोले म्हणाले.
“कुणी मान झुकवली हे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. तुम्ही तर गुडघे टेकवले. स्वाभिमानावर चर्चा करण्याची तुमची लायकी नाही. भीक मागायला कटोरे त्यांच्या हातात आहे. आता यांच्या काटोऱ्यात भीक कुणी टाकली नाही. यांना आता भीक मिळणार नाही. उद्या ते कुणाचेही नाव घेतील” संजय राऊतांवर अशी टीका संजय शिरसाट यांनी केली.
‘लाडकी बहिण’ योजना सुरु राहणार असल्याने राज्यातील महिलांसाठी आनंदाची बाब आहे. मात्र, या योजनेच्या निकषांमध्ये बदल होणार असल्याने काही महिलांची चिंता वाढू शकते तसेच महायुतीची सत्ता पुन्हा आल्यास योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेत वाढ केली जाईल, असे सांगण्यात आले होते. प्रत्यक्षात ही योजना सुरु ठेवताना सध्याची 1500 रुपये रक्कमच महिलांना मिळत राहणार आहे. या रक्कमेत लगेच वाढ होण्याची शक्यता कमी आहे.
मुंबईत होणारी महायुतीची बैठक पुढे ढकलण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन दिवसानंतर दिल्लीवरून फोन आल्यानंतर बैठक होणार आहे. सरकार स्थापनेला अजून काही दिवस लागण्याची चिन्ह.
“संजय राऊत यांची गिरे तो टांग उपर अशी परिस्थिती आहे. राज्य चालवण्यासाठी केंद्राची मदत लागत असते. हे सोनिया गांधी, राहुल गांधी यांचे तळवे चाटत असतात. केवळ ते वाटेल ते बरळत असतात. दिल्लीच्या फेऱ्या मारणे अशी टीका चुकीची. एवढीच दिल्लीची लाज वाटत असेल तर त्यांनी राज्यसभेचा राजीनामा द्यावा आणि मुंबईत बसावं” अशी खोचक टीका ठाण्याचे शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांनी केली.
नवी दिल्ली : काँग्रेस राष्ट्रीय कार्यकारिणीची आज बैठक पार पडणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालामध्ये काँग्रेसला मिळालेले अपयश आणि राष्ट्रीय पातळीवरती भूमिका निश्चित करण्यासाठी आज काँग्रेसकडून बैठक बोलवण्यात आली आहे. काँग्रेस पक्षाची राष्ट्रीय कार्यकरिणीची बैठक आज दुपारी काँग्रेस मुख्यालयात होणार आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियंका गांधी, महाराष्ट्रातून बाळासाहेब थोरात, चंद्रकांत हांडोरे, नसीब खान अभिनेते हे उपस्थित राहणार आहेत.
नाशिक : नाशिकमध्ये देवयानी फरांदे यांच्या पदाधिकाऱ्यांनी भावी मंत्रीचे असे बॅनर लावले आहेत. हिंदू जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून देवयानी फरांदे यांचे बॅनर लावण्यात आले आहेत. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघात ही बॅनरबाजी पाहायला मिळत आहे. हिंदुत्ववादी आमदार भावी मंत्री देवयानी फरांदे यांना हिंदूमय शुभेच्छा अशा आशय या बॅनरवर लिहिण्यात आला आहे.
महायुतीच्या बैठकीआधी चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला पोहोचले आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे सकाळी ११ च्या सुमारास सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. सध्या चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या बंद दाराआडच चर्चा सुरु आहे.
विरार:- नालासोपारातील 41 इमारतींवर आज सलग दुसऱ्या दिवशी महापालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. यामुळे नालासोपाऱ्यातील संपूर्ण परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप आले आहे. काल नालासोपाऱ्यातील सात इमारती भुईसपाट केल्यानंतर आज सकाळपासून राहिवाशाना घराबाहेर काढण्याची कारवाही सुरू झाली आहे.
नालासोपारा अग्रवाल परिसरातील ओम तुळशी या तीन मजली इमारती मधील 18 कुटुंब घराबाहेर काढण्यात आले आहे. ही इमारत आज दिवसभरात भुईसपाट करण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून मिळाली आहे
मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मुंबई कडून गुजरात कडे जाणाऱ्या वाहिनीवर वाडा खडकोना ते मेंढवन खिंडीपर्यंत मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास चार ते पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या आहेत. ही वाहतूक कोंडी होत असतानाच मुंबईकडून गुजरातच्या दिशेने जाणारी वाहने विरुद्ध दिशेच्या लेन वरून जात असल्याने गुजरात मुंबई वाहिनीवर ही वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे.
दुचाकी चालकासह सहप्रवाशालाही हेल्मेट लागणारय गाडीवरील दोघांनी हेल्मेट न घातल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. राज्यातील प्रमुख शहरांमध्ये दुचाकीस्वाराच्या पाठीमागे बसणाऱ्या सह प्रवाशाला हेल्मेट बंधनकारक करण्यात आले आहे. नाशिक शहरात देखील दुचाकी वरील सह प्रवाशाला हेल्मेट लागणार आहे.
भाजपाच्या गटनेता पद निवडीसाठी 1 डिसेंबर रोजी बैठक होणार आहे. त्यानंतर निरीक्षक मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण याची घोषणा करणा आहे.
एकनाथ शिंदे संरक्षण मंत्री पद मागू शकतात. राष्ट्रपती उपराष्ट्रपती मागू शकतात. पण दिल्लीने डोळे वटारले तर त्यांच्याकडे काही पर्याय नसेल भाजपाला जे काम करून घ्यायचं होता ते झालेल आहे. महाराष्ट्र कमजोर करून झालेला आहे. भविष्यात यांचे पक्ष फुटले तर आश्चर्य वाटू नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.
एकनाथ शिंदे यांना सत्तेत ठेवले हीच मोठी गोष्ट आहे, असा टोला बच्चू कडून यांनी लगावला. भाजपा त्यांना गृहमंत्रीपद देणार नाही, असे ते म्हणाले.
अजित पवार कायम डेप्युटी सीएम आहेत. अजित पवार काल गॉगल वगैरे लावून फिरत होते. त्यांचा चेहरा लोकसभेनंतर उतरला होता. आता त्यांचे चेहरे फुलले आहेत. ईव्हीएम ची त्यांनी पूजा केली पाहिजे, असा टोला संजय राऊत यांनी अजित पवारांना लगावला.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार व प्रहार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची बैठक सुरू झाली. भविष्यातील राजकीय वाटचालीसाठी, वाय. बी.चव्हाण सेंटर मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सर्व उमेदवार व प्रहार जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष यांची बैठक सुरू झाली. भविष्यातील राजकिय वाटचालीसाठी, वाय. बी.चव्हाण सेंटर मुंबई येथे तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीमध्ये बेकायदेशीर डिझेलच्या साठ्यावर खेड तहसीलदार आणि राज्य दक्षता पथकाने छापा टाकला. 36 कंटेनर सह 3 हजार 600 लिटर डिझेलचा साठा जप्त करण्यात आला.
राज्याच्या स्वाभिमानच्या गोष्टी महायुतीने करू नयेत. राज्यात कोणी काय करावं हे दिल्लीतून नरेंद्र मोदी, अमित शाह ठरवत आहेत. एकनाथ शिंदे काय किंवा अजित पवार त्यांचा स्वाभिमान राहिलेला नाही, दिल्लीने डोळे वटारले की ते शांत बसतात.
काल दिल्लीत अमित साह यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आज मुंबईत पुन्हा महायुतीच्या नेत्यांची बैठक होणार आहे. देवेंद् फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार यांच्या उपस्थितीत आजची बैठक पार पडणार असून त्यामध्ये खातेवाटपावर चर्चा होऊ शकते.
गृह, नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम खात्यासह काही महत्वाच्या खात्यांची एकनाथ शिंदे यांच्या कडून दिल्लीच्या बैठकीत मागणी करण्यात आली आहे. मात्र गृह खाते सोडण्यास भाजपने नकार दिला आहे.
गृह, महसूल, ऊर्जा, ग्रामविकास, जलसंपदा,, गृह निर्माण, वन , ओबीसी मंत्रालय, पर्यटन , सामान्य प्रशासन ही खाती भाजप स्वतःकडे ठेवणार असल्याची सूत्रांची माहिती.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला नगरविकास, सार्वजनिक बांधकाम ,उद्योग, शिक्षण, सांस्कृतिक , पाणी पुरवठा , आरोग्य ,परिवहन, राज्य उत्पादन शुल्क ही खाती देण्यात येऊ शकतात.
विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अद्यापही राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांचे नाव समोर आलेलं नाही. यासंदर्भात काल महायुतीच्या नेत्याची दिल्लीत बैठक झाली, अमित शहांशी चर्चा झाली. काल रात्री दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांसोबत झालेल्या बैठकीत एकनाथ शिंदे यांनी गृहमंत्रिपदावर दावा केला आहे. तर अजित पवारांना अर्थखात हवं आहे. दिल्लीतील बैठकीनंतर आता मुंबईत महायुतीची महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. या बैठकीला एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार हे उपस्थितीत असणार आहेत. या बैठकीत मुख्यमंत्रिपदावर चर्चा होणार आहे. तसेच अमित शाहांनी दिलेल्या सूचना आणि निर्णयांबद्दल बैठकीत चर्चा केली जाईल. येत्या काही दिवसांत राज्यात मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा होऊन लवकरच शपथविधी होऊ शकतो. राजकारणासह क्रीडी, मनोरंजन व इतर क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील.