महाराष्ट्रात पावसाने दिवसभरात कुठे-कुठे थैमान घातलं? वाचा A टू Z माहिती

राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही हा पाऊस पडत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत.

महाराष्ट्रात पावसाने दिवसभरात कुठे-कुठे थैमान घातलं? वाचा A टू Z माहिती
महाराष्ट्रात पावसाने दिवसभरात कुठे-कुठे थैमान घातलं?
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 8:37 PM

राज्यात परतीच्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये परतीचा पाऊस पडत आहे. या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतीचं मोठं नुकसान झालं आहे. काही जिल्ह्यांमध्ये अजूनही हा पाऊस पडत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. महाराष्ट्रात आज दिवसभरात कुठे-कुठे पाऊस पडला याचा आढावा आम्ही या बातमीच्या माध्यमातून देणार आहोत. नंदुरबार जिल्ह्याला हवामान खात्याने आज ऑरेंज अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याने वर्तवलेल्या अंदाजानुसार, नंदुरबार शहरात संध्याकाळी साडेसात वाजेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. दिवसभर कडक ऊन आणि संध्याकाळी आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. नागरिकांना उकाड्यापासून काहीसा सुटका मिळाली आहे. मात्र काढणीसाठी आलेल्या मिरची, सोयाबीन या पिकांना या पावसाचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

वसई-विरारमध्ये पावसाला सुरुवात

दिवसभराच्या विश्रांती नंतर वसई, विरार, नालासोपाऱ्यात आज रात्री पुन्हा पावसाने हजेरी लावली. पालघर जिल्ह्याला हवामान खात्याने आज दिवसभरासाठी रेड अलार्ट दिला होता. पण दिवसभर पाऊस पडला नाही. सायंकाळी साडेसहा वाजेनंतर पावसाने हजेरी लावली. वसई-विरारमध्ये कालही रात्री ८ ते १० या वेळेत मुसळधार पडलेल्या पावसाने सर्व परिसरात हाहा:कार उडवला होता. त्यानंतर आज पुन्हा रात्रीच्या वेळीचं पाऊस सुरु झाला असून, पावसाचा जोर वाढतच आहे.

रत्नागिरीत जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली

रत्नागिरी जिल्ह्यात पाऊस सुरु आहे. मुसळधार पावसामुळे खेडमध्ये जगबुडी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. जगबुडी नदीची धोक्याच्या पातळीकडे वाटचाल सुरु आहे. नदीच्या पाणी पातळीत आणखी एक मीटरने वाढ झाल्यास शहराला पुराच्या पाण्याचा धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान खात्याकडून रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे.

जळगावात केळीचे पिके जमीनदोस्त

जळगाव तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे केळी पिकासह कापूस, मका, ज्वारी, बाजरी या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळी वाऱ्यासह पावसामुळे चिंचोली, उमाळा परिसरात केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. सलग दोन दिवस आलेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे काढणीवर आलेल्या केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्याने हातातोंडाशी आलेला घास हिरावल्याने शेतकरी संकटात सापडला आहे.

दोन दिवसाच्या मुसळधार पावसामुळे अनेक शेतामध्ये पाणी साचल्याने कापूस आडवे पडले असून या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. जळगाव तालुक्यातील धानवड, उमाळा चिंचोली या परिसरात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तिसऱ्या दिवशी पुन्हा सकाळपासून सततचा पाऊस सुरू असल्यामुळे नुकसानीत वाढ होण्याचे शक्यता आहे. त्यामुळे खरीप हंगामातील सुरुवातीला कमी-अधिक पावसामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्याच्या डोळ्यात परतीच्या पावसाने सुद्धा पाणी आणल्याचं पाहायला मिळत आहे.

बीडमध्ये देखील पाऊस

बीड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून दमदार पावसाने हजेरी लावली. बीड, परळी, गेवराई आणि अंबाजोगाई तालुक्यात दमदार पाऊस झाला. सर्वदूर पडणाऱ्या पावसाने वातावरणात गारवा निर्माण झालाय. मागील आठवडाभरापासून पावसाने ओढ दिली होती. मात्र दोन दिवसांपासून सर्वदूर मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बहुतांश सर्वच पाणी प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरत आहेत. त्यामुळे शहरासह गाव खेड्यातील पाण्याचा प्रश्न मार्गी लागलाय. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असला तरी या पावसाने खरिपातील काढणीला आलेल्या पिकांना फटका बसतोय. प्रामुख्याने भाजीपाला, फळबाग, कापूस आणि तूर या पिकांचे नुकसान होत आहे.

नांदेडमध्ये सततच्या पाऊसामुळे पपई पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव

नांदेड जिल्ह्यात सततच्या पाऊसामुळे पपई पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झालाय. त्यामुळे फळबागांचं मोठं नुकसान होत आहे. मुदखेड तालुक्यातील पपईच्या बागांचे नुकसान झालंय. जिल्ह्यात सलग गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसाने पपई पिकांवर रोंगाचा प्रादुर्भाव झाल्याने पपईची उगवन क्षमता कमी होऊन पपई पिकत नसल्याने पपई बागेचं प्रचंड नुकसान झालं आहे. शेकडो एकर वरील पपईच्या बागा संकटात आल्या आहेत. जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून विजेच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यासह अधुनमधुन पाऊस सुरू आहे. त्याचा फटका आता पपई पिकाला बसत असल्याचं चित्र सध्या परिसरात पहायला मिळत आहे.

सोलापुरात उजनी धरणातून भीमा नदीत 31600 क्यूसेस विसर्ग सुरू

उजनी धरणाच्या वरील साखळी मधील सर्व धरणं काठोकाठ भरली असून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक देखील होतेय. उजनी धरण काटोकाट भरलं असल्यानं उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 31 हजार 600 क्यसेक इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय.

उजनी धरणाचे 16 दरवाजे दोन फुटाने उचलण्यात आले आहेत. सध्या उजनी धरण 109 टक्के क्षमतेने भरले असून उजनीत 122 टीएमसी इतका पाणी साठा आहे. भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून येणाऱ्या पाण्याचा प्रवाह वाढल्यास अधिक प्रमाणात विसर्ग केला जाऊ शकतो, असं उजनी धरण व्यवस्थापनाकडून सांगण्यात आलंय. त्या पार्श्वभूमीवर भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.

अहमदनगरमध्ये जोरदार पाऊस

पाणलोट क्षेत्रात दोन दिवस जोरदार पाऊस झाल्याने पारनेर तालुक्यात वरदान ठरलेले मांडओहळ धरण बुधवारी ओव्हरफ्लो झाले. यामुळे लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे. जोरदार झालेल्या पाऊसामुळे धरणात 399 दशलक्ष घनफूट साठा झाला. विशेष म्हणजे पारनेर तालुक्यातील 16 गावांची कान्हूर पठार पाणी योजना याच धरणातून आहे. त्यामुळे आता धरण भरल्याने पिण्याच्या पाण्यासह येत्या रब्बी हंगामातील ज्वारी, कांदा, गहू, हरबरा आदी पिकांना दिलासा मिळणार आहे.

गोंदिया जिल्ह्यात परतीच्या पावसाची सकाळपासून जोरदार हजेरी

गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासूनच पावसाने जोरदार हजेरी लावली. पारतीच्या पावसाचे जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या शेतात असलेल्या हलक्या स्वरूपाच्या धान पिकांना यामुळे धोका निर्माण झाला आहे. सध्या काही दिवसातच धान कापणीला येणार आहे. मात्र धान पिकाला यामुळे फायदा होणार असले तरी मात्र पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता दिसून आली आहे.

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.