शिंदे गटापेक्षाही महाविकास आघाडीच्या जागा अत्यंत कमी; पाहा कुणाला किती जागा मिळाल्या?; A टू Z डिटेल्स एका क्लिकवर
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटापेक्षा महाविकासआघाडीच्या एकत्रित जागाही अत्यंत कमी आहेत.
Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल स्पष्ट झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटापेक्षा महाविकासआघाडीच्या एकत्रित जागाही अत्यंत कमी आहेत.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती 219 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यात भाजप 126 जागा, शिवसेना शिंदे गट 56 जागा, अजित पवार गट 35 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. तर महाविकासआघाडी 50 जागांवर आघाडीवर आहे. यात काँग्रेस 20 जागा, ठाकरे गट 17 जागा आणि शरद पवार गट 13 जागांवर आघाडीवर आहे.