शिंदे गटापेक्षाही महाविकास आघाडीच्या जागा अत्यंत कमी; पाहा कुणाला किती जागा मिळाल्या?; A टू Z डिटेल्स एका क्लिकवर

| Updated on: Nov 23, 2024 | 4:49 PM

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटापेक्षा महाविकासआघाडीच्या एकत्रित जागाही अत्यंत कमी आहेत.

शिंदे गटापेक्षाही महाविकास आघाडीच्या जागा अत्यंत कमी; पाहा कुणाला किती जागा मिळाल्या?; A टू Z डिटेल्स एका क्लिकवर
Follow us on

Maharashtra Vidhan Sabha Election Results 2024 : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. सध्या महाराष्ट्रातील 288 विधानसभा मतदारसंघांचे कौल स्पष्ट झाले आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत कोण विजयाचा गुलाल उधळणार याकडे सर्वांचेच लक्ष लागलं आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या सुरुवातीच्या कलात भाजप महायुतीने बाजी मारल्याचे पाहायला मिळत आहे. धक्कादायक बाब म्हणजे राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीतील शिवसेना शिंदे गटापेक्षा महाविकासआघाडीच्या एकत्रित जागा कमी आहेत.

राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुती 228 जागांवर आघाडीवर असल्याचे दिसत आहे. यात भाजप 132 जागा, शिवसेना शिंदे गट 55 जागा, अजित पवार गट 41 जागांवर आघाडीवर असल्याचे पाहायला मिळते. तर महाविकासआघाडी केवळ 47 जागांवर आघाडीवर आहे. यात काँग्रेस 16 जागा, ठाकरे गट 21 जागा आणि शरद पवार गट 10 जागांवर आघाडीवर आहे.

शिंदे गटापेक्षा महाविकासआघाडीची आकडेवारी कमी

राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालात भाजप महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तर महाविकासाआघाडीचा मात्र सुपडा साफ झाला आहे.  शिवसेना शिंदे गटाने विधानसभा निवडणुकीत 80 जागा लढवल्या होत्या. यातील 55 जागांवर शिंदे गट आघाडीवर आहेत. तर विधानसभा निवडणुकीत ठाकरे गटाने 89 जागा लढवल्या होत्या. यातील फक्त 21 जागांवर आघाडीवर आहेत.

महाविकासाआघाडीच्या तिन्ही पक्षांना एकत्र केवळ 47 जागांवर विजय मिळवता आला आहे. त्यामुळे महाविकासआघाडीला हा खूप मोठा धक्का मानला जात आहे. विशेष म्हणजे शिंदे गटाच्या विधानसभेतील जागांची तुलना करता सध्या महाविकासआघाडीचे नेते कमी जागांवर आघाडीवर आहेत. यामुळे महायुतीने महाविकासआघाडीला मोठा धक्का दिला आहे.

…म्हणूनच महायुती जिंकली

महाराष्ट्रात महाविकास आघाडीची अशी अवस्था होण्यामागे वेगवेगळी कारणं आहे. मात्र नकारात्मक प्रचार हे त्यातील प्रमुख कारण म्हटलं जात आहे. महायुती सरकारने महिलांसाठी लाडकी बहिण योजना, ज्येष्ठांसाठी, युवकांसाठी स्टायपेड अशा वेगवेगळ्या योजना आणल्या. शेतकऱ्यांना वीज बिल माफी दिली, त्याचा मतदारांवर परिणाम झाला हे खरं आहे. पण महायुतीच सरकार हटवल्यानंतर महाराष्ट्राच्या विकासासाठी काय प्लान आहे? पर्यायी योजना काय आहेत? हे मतदार राजाला पटवून देण्यात महाविकासआघाडी अपयशी ठरली.