सर्वात मोठी बातमी! मारकडवाडीत काय-काय घडलं? अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ईव्हीएमच्या वादावर दिली A टू Z माहिती

सोलापूर जिल्ह्यातील मारकडवाडी गावातील निवडणुकीतील ईव्हीएम वादावर जिल्हाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत स्पष्टीकरण दिले. ग्रामस्थांनी ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला होता आणि बॅलेट पेपरवर पुन्हा मतदान करण्याची मागणी केली होती. पण जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, नियमानुसार हे शक्य नाही आणि कायदेशीर मार्ग म्हणजे निवडणूक याचिका दाखल करणे. त्यांनी ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबतही माहिती दिली.

सर्वात मोठी बातमी! मारकडवाडीत काय-काय घडलं? अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी ईव्हीएमच्या वादावर दिली A टू Z माहिती
Follow us
| Updated on: Dec 08, 2024 | 9:04 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मारकडवाडी गावाची चांगलीच चर्चा आहे. या गावात महाविकास आघाडीचे उमेदवार उत्तम जानकर आणि त्यांच्या समर्थकांनी भाजपचे उमेदवार राम सातपुते यांना आपल्या गावात 100 पेक्षा जास्तदेखील मतदान होऊ शकत नाही, असा दावा करत ईव्हीएममध्ये घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. त्यामुळे गावकऱ्यांनी मारकडवाडीत बॅलेट पेपरवर पुन्हा निवडणूक घेण्याचा प्रयत्न केला. पण प्रशासनाच्या दबावानंतर ते शक्य होऊ शकलं नाही. या प्रकरणी अनेक गावकऱ्यांवर गुन्हा देखील दाखल झाला आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे आज मारकडवाडी गावात पोहोचले. त्यामुळे मारकडवाडी गावाची जोरदार चर्चा होत आहे. या सर्व वादावर आज अखेर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी पत्रकार परिषद घेत सविस्तर भूमिका मांडली आहे.

“20 नोव्हेंबरला निवडणुकीची प्रक्रिया पार पडली. 23 तारखेला मतमोजणी झाली. 29 तारखेला मरकडवाडी ग्रामस्थांनी निवेदन दिलं. ज्यामध्ये निर्णय आम्हाला मान्य नसल्याचे सांगत बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची विनंती केली. पण नियमानुसार केवळ निवडणूक आयोगाला आणि त्यांच्यावतीने प्रशासनाला अधिकार आहेत. बाकी कोणाला कोणत्याही कायद्यानुसार अधिकार देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे त्यांचे निवेदन अमान्य करण्यात आले. तरी देखील ग्रामस्थ स्वतः मतदान करण्याचा निर्णय घेतला”, असं जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी सांगितलं.

ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर काय करायचं?

“आम्ही 2 ते 5 डिसेंबरपर्यंत जमावबंदी लागू केली होती. त्याचे उल्लंघन केले म्हणून 89 लोकांवर गुन्हे देखील दाखल केले आहेत. मरकडवाडी येथे मतदान का करू दिलं नाही? असा प्रश्न सध्या आहे. लोकप्रतिनिधित्व कायदा 1951 नुसार कोणालाच मतदान घेण्याचे अधिकार नाही. जर ग्रामस्थांना निकालावर संशय असेल तर ते कोर्टात निवडणूक याचिका दाखल करू शकतात. पण स्वतःला असं मतदान घेता येणार नाही”, असं जिल्हाधिकारी म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“पोलीस नीट काम करत नाहीत म्हणून स्वतःचे तुरुंग किंवा फोर्स सुरु करता येत नाही. त्याच पद्धतीने स्वतः असं मतदान घेता येणार नाही. 1 ते 31 ऑगस्ट FLC फर्स्ट लेव्हल चेकिंग करण्यात आले. राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोर हे करण्यात येतं. प्रत्येक बॅलेटवर 96 मतदान करण्यात येतं. प्रत्येक बटन 6 वेळा दाबण्यात येतात. वेगवेगळ्या पद्धतीने ही चाचणी करण्यात येते. या सर्वांचे व्हिडीओ पुरावे उपलब्ध आहेत. त्यानंतरच हे मशीन अकलूजला पाठवण्यात आले आहेत. ईव्हीएम मशीन ज्या गाडीतून नेण्यात आले त्या गाडीना GPS होते. इतकंच नाही तर EVM मशीन नेणाऱ्या गाड्यांना फॉलो करण्याची मुभा देखील होती”, असा खुलासा जिल्हाधिकाऱ्यांनी केला.

“विविध राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींसमोर हे मशीन अकलूज गोडाऊनमध्ये ठेवले. 9 तारखेला ईव्हीएम मशीन पेअरिंग केली, त्यावेळीही राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. 11 तारखेला कमिशनिंग झालं तेव्हा उत्तम जानकर यांचे प्रतिनिधी उपस्थित होते”, असंही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं.

“20 नोव्हेंबरला मतदान झालं, मारकडवाडीमध्ये तीन केंद्र आहेत. 96 नंबर बूथमध्ये 4 पोलिंग एजंट उपस्थित होते. 97 नंबरमध्ये 4 पोलिंग एजन्ट, 98 नंबर बूथमध्ये 3 उपस्थित होते. यामध्ये ज्यांनी आक्षेप घेतले त्यांचे प्रतिनिधी देखील मॉक पोल वेळी उपस्थित होते. मॉक पोल सर्टिफिकेट आम्ही घेतो तेव्हा पोलिंग एजंटची सही आम्ही त्यांच्यावर घेतो, या एजंटनी सही केलेली आहे”, अशी माहिती जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिली.

तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल
तरूणाचा जाच संपेना... 11 वीत शिकणाऱ्या तरूणीनं उचललं टोकाचं पाऊल.
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले...
'लाडकी बहीण' संदर्भात नितेश राणेंची फडणवीसांकडे मोठी मागणी; म्हणाले....
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?
पुण्यात अर्जांची छाननी सुरू, 10 हजार 'लाडक्या बहिणी' अपात्र, कारण काय?.
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून...
समुद्रकिनारी मौज-मजा करण्याची आवड तुम्हालाही? जरा जपून....
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ
'..म्हणून गोंधळ झाला', कुर्ला बेस्ट अपघातातील बस चालकचा जबाब अन् खळबळ.
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा
शिवसेनेतील मंत्रिपदासाठी इच्छुक अन् नाराजांसाठी एकनाथ शिंदेंचा तोडगा.
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?
'लाडक्या बहिणीं'नो डिसेंबरचा हप्ता हवाय? ही कागदपत्र तुम्ही जोडलीत का?.
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?
Bogus Medicines : बोगस गोळ्या-औषधांचा भांडाफोड, खरे मास्टरमाईंड कोण?.
पवारांवर टीका करताना पडळकर अन् खोतांची मारकडवाडीतून जहरी टीका
पवारांवर टीका करताना पडळकर अन् खोतांची मारकडवाडीतून जहरी टीका.
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार,शिंदे-दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?
14 तारखेला मंत्रिमंडळ विस्तार,शिंदे-दादांच्या मंत्र्याची यादी दिल्लीत?.