गाडीला कट मारल्याचा राग, औरंगाबादेत टोळक्याचा हैदोस, बस चालकासह प्रवाशांना मारहाण

गाडीला कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरुन औरंगाबादमध्ये जमावाने औरंगाबाद-शिरपूर बसवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (mob beat bus driver).

गाडीला कट मारल्याचा राग, औरंगाबादेत टोळक्याचा हैदोस, बस चालकासह प्रवाशांना मारहाण
Follow us
| Updated on: Feb 19, 2020 | 9:03 AM

औरंगाबाद : गाडीला कट मारण्याच्या क्षुल्लक कारणावरुन औरंगाबादमध्ये जमावाने औरंगाबाद-शिरपूर बसवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे (mob beat bus driver). जमावाच्या या हल्ल्यात बसचालक गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. या जमावाने फक्त बसचालकालाच नाही तर प्रवाशांनाही मारहाण केली. जमावाच्या गुंडगिरीचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओमध्ये जमाव बसचालकाला मारहाण करताना दिसत आहे. याशिवाय जमावाकडून बसची तोडफोड केली जात असल्याचे दिसत आहे.

औरंगाबादहून शिरपूरकडे ही बस निघाली होती. औरंगाबाद आणि कन्नड शहरादरम्यान ही घटना घडली. गाडीला फक्त कट लागला म्हणून परिसरातील जमाव आक्रमक झाला आणि त्यांनी बसचालकास शिवीगाळ आणि मारहाण करण्यास सुरुवात केली (mob beat bus driver). या मारहाणीत बसचालक सुधाकर श्यामराव शिरसाठ जखमी झाले आहेत. मारहाण करणाऱ्या जमावाने बसच्या काचा फोडत तोडफड केली. बसचालकाला मारहाण आणि बसची तोडफोड होत असताना बसमधील प्रवाशांनी या घटनेचे आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ शूट केले. ते व्हिडीओ आता समोर आले आहेत.

दरम्यान, या घटनेप्रकरणी 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आाला आहे. तर तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!
... अशी होणार मुख्यमंत्र्यांच्या नवाची घोषणा, शपथविधीचा मुहूर्त ठरलं!.
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल
'ते' पुन्हा येणार! नव्या मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीच मुहूर्त-ठिकाण ठरल.
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती
गोंदियात 'शिवशाही'चा भीषण अपघात, मृतांचा आकडा वाढण्याची भीती.
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.
शिंदे म्हणाले; 'मी काळजीवाहू CM, सगळ्यांची काळजी घेतोय, आजही खूश...'
शिंदे म्हणाले; 'मी काळजीवाहू CM, सगळ्यांची काळजी घेतोय, आजही खूश...'.
फडणवीस तिसऱ्यांदा CM, दिल्लीत शिक्कामोर्तब तर शिंदेंच्या वाट्याला काय?
फडणवीस तिसऱ्यांदा CM, दिल्लीत शिक्कामोर्तब तर शिंदेंच्या वाट्याला काय?.