त्याला अशी नशा चढली की भर रस्त्यात केलेल्या धिंगाण्यामुळे पसरली दहशत

| Updated on: Apr 08, 2023 | 11:58 AM

मद्यपी कधी काय करतील, याचा नेम नाही. त्यांना चढलेली नशा उतरावी लागते. एका तरुणाने शुक्रवारी रात्री चांगलाच धिंगाणा घातला. त्या तरुणाने मद्य प्राशन केले. मग त्याला इतकी चढली की आपण काय करतोय, याचेही भान त्याला राहिले नाही.

त्याला अशी नशा चढली की भर रस्त्यात केलेल्या धिंगाण्यामुळे पसरली दहशत
liquor
Follow us on

डोंबिवली : प्रसिद्ध गायक पंकज उदास यांची एक मद्यापींना सल्ला देणारी गजल आहे. थोडी थोडी पिया करो..पियो लेकिन रखो हिसाब..ही गजल आठवण्याचे कारणही आहे. शुक्रवारी मध्यरात्री एका तरुणाने मद्य रिचवून जो धिंगाणा सुरु केला, की त्यामुळे परिसरात दहशत पसरली. त्या मार्गाने जाणारे दुसरीकडून वळू लागले. जवळपास अर्धा तास या तरुणाचा धिंगाणा या रस्त्यावर सुरू होता. अखेरी नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. मग पोलिसांनी त्याची नशा एका झटक्यात उतरवली.

मद्यपीने काय केले सुरु

डोंबिवली ठाकुर्ली 90 फीट रोडवर मद्यपी तरुणाने शुक्रवारी रात्री चांगलाच धिंगाणा घातला. एका तरुणाने मद्य प्राशन केले. मग त्याला इतकी चढली की आपण काय करतोय, याचेही भान त्याला राहिले नाही. रात्रीच्या सुमारास रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना त्याने लाकडी दांडक्याने मारहाण सुरु केली. महिलांना त्याने सोडले नाही. जवळपास अर्धा तास या तरुणाचा धिंगाणा भर रस्त्यावर सुरू होता. घटनेची माहिती काही नागरिकांनी पोलिसांना कळवली. त्यानंतर टिळक नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या तरुणाला ताब्यात घेतलं. पवन केणे असं हा मद्यपी तरुणाचे नाव आहे.

हे सुद्धा वाचा

दहशत पसरली


पवन केणे याने सुरु केलेल्या प्रकारामुळे परिसरात दहशतीचा वातावरण पसरलं होतं.टिळक नगर पोलीस घटनास्थळी आल्यानंतर त्या तरुणाला ताब्यात घेतले. त्याची नशा पोलिसी खाक्या पद्धतीने उतरवली. त्याच्यावर गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केलाय.

नागपुरात आणली नियमावली


नाईट कल्चरसंदर्भात समाजातील सुज्ञ नागरिकांकडून नेहमी तक्ररी केले जाते. रात्रभर सुरु असणारा धांगडधिंगाविरोधात सामाजिक संघटनांकडून आवाजही उठवला जातो. यामुळे नागपूर पोलिसांनी बार, पब, परमिटरुम, रेस्टॅारंटमध्ये जाताना नियमांचे पालन करा, अन्यथा कारवाईला समोरे जा, असा इशारा देत नियमावली केली आहे.

नागपुरातील नाईटलाइफ कल्चरची वेळ बदलली आहे. नाईटलाइफ आता रात्री दीड वाजेपर्यंतच करता येणार आहे. रात्री दीड नंतर सेवा दिली तर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. बार, पब, परमिटरुम आणि रेस्टॅारंटसाठी ही नियमावली असणार आहे. तसेच २५ वर्षांखालील व्यक्तीला मद्य देण्यास मनाई करण्यात आली आहे.

हे ही वाचा

नाईटलाइफ कल्चर बदलले | बार, पब, परमिटरुम, रेस्टॅारंटसाठी आली नवीन नियमावली