कोरोना पॉझिटिव्ह नर्सला घेऊन परिचारिकांची डीनच्या केबिनमध्ये धडक, केईएम रुग्णालयात आंदोलन

केईएम रुग्णालयाच्या पारिचारिकांनी आज (1 जून) रुग्णालयाचे डीन हेमंत देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं (KEM hospital nurses protest).

कोरोना पॉझिटिव्ह नर्सला घेऊन परिचारिकांची डीनच्या केबिनमध्ये धडक, केईएम रुग्णालयात आंदोलन
Follow us
| Updated on: Jun 01, 2020 | 4:50 PM

मुंबई : केईएम रुग्णालयाच्या पारिचारिकांनी आज (1 जून) रुग्णालयाचे डीन हेमंत देशमुख यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन केलं (KEM hospital nurses protest). केईएम रुग्णालयातील कोरोनाबाधित पारिचारिकांवर रुग्णालयातच उपचाराची व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पारिचारिका गेल्या काही दिवसांपासून करत आहेत. मात्र, रुग्णालय प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत असल्याने पारिचारिकांनी आंदोलन पुकारलं (KEM hospital nurses protest).

कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करत असताना आता पारिचारकांनादेखील कोरोनाची लागण होत असल्याची माहिती समोर येत आहे. केईएम रुग्णालयातील 45 पारिचारिकांना कोरोनाची लागण झाली आहे. मात्र, या पारिचारिकांवर उपचार करण्यासाठी रुग्णालयात व्यवस्था नाही.

केईएम रुग्णालयाच्या कोरोनाबाधित पारिचारिकांना उपचारासाठी महात्मा गांधी रुग्णालय किंवा सेव्हन हिल्स हॉस्पिटलमध्ये पाठवले जाते. केईएमच्या कोरोनाबाधित पारिचारिकांवर केईएम रुग्णालयातच उपचार व्हावे, अशी मागणी पारिचारिकांनी केली होती. पारिचारिका ही मागणी काही दिवसांपासून वारंवार करत होत्या. मात्र, रुग्णालय प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केले.

केईएम रुग्णालय प्रशासनाला विनंती करुनही मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने पारिचारिकांनी आक्रमक पवित्रा घेतला. सर्व पारचारिका आज (1 जून) कोरोनाची लागण झालेल्या परिचरिकेला घेऊन रुग्णालयाचे डीन हेमंत देशमुख यांच्या कार्यालयात धडकल्या. रुग्णालयाच्या डीनच्या कार्यालयाबाहेर त्यांनी आंदोलन केलं.

पारिचारिकांच्या आंदोलनानंतर रुग्णालय प्रशासनाला जाग आली. परिचरिकांच्या उपचारासाठी वेगळा कक्ष बनवण्याचे आश्वासन डीन देशमुख यांनी दिलं. केईएम रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांनी गेल्या आठवड्यातच देशमुखांविरोधात आंदोलन केलं होतं. देशमुख कर्मचाऱ्यांना चांगली वागणूक देत नसल्याने त्यांच्यात रोष होता.

संबंधित बातम्या :

गोरेगाव फिल्मसिटी काम, मुंबई-नागपूर विमानाने प्रवास, चंद्रपुरात पोहोचलेला तरुण कोरोना पॉझिटिव्ह

नाशिकमध्ये कोरोनाचा विळखा वाढता, जिल्ह्यात आता 147 कंटेन्मेंट झोन

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.