कोणत्याही आघाडीत न जाता स्वतंत्र लोकवर्गणीतून निवडणूक लढवणार अन् जिंकणार- राजू शेट्टी
राजू शेट्टींनी खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात दंड थोपटले. कोणत्याही आघाडीत न जाता स्वतंत्र लोकवर्गणीतून निवडणूक लढवणार आहे. 2024 ला मी लोकसभेत सभागृहात असेल. मला कोणी पाठिंबा द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला तर घेणार का ? या प्रश्नावर राजू शेट्टींनी उत्तर दिलं. मी तयारी सुरू केली आहे. वार्ड रचनेसंदर्भात कोर्टानं जो […]
राजू शेट्टींनी खासदार धैर्यशील माने यांच्याविरोधात दंड थोपटले. कोणत्याही आघाडीत न जाता स्वतंत्र लोकवर्गणीतून निवडणूक लढवणार आहे. 2024 ला मी लोकसभेत सभागृहात असेल. मला कोणी पाठिंबा द्यावा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे उद्धव ठाकरेंनी पाठिंबा दिला तर घेणार का ? या प्रश्नावर राजू शेट्टींनी उत्तर दिलं. मी तयारी सुरू केली आहे. वार्ड रचनेसंदर्भात कोर्टानं जो निकाल दिलाय तो शिंदे आणि फडणवीसांसाठी धक्कादायकचं आहे, असं राजू शेट्टी (Raju Shetty) म्हणाले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना केलेली मदत तोकडी आहे. शेतकऱ्यांना बेदखल करू नका अन्यथा शेतकरी सरकारला बेदखल केल्याशिवाय राहणार नाहीत. गुंठ्याला अवघे 136 रुपये दिलेत, अजूनही पंचनामे सुरू नाहीत. शेतकऱ्यांना बेदखल करू नका राजू शेट्टींंनी शिंदे फडणवीसांना इशारा दिलाय, असंही ते म्हणाले आहेत.

ऑपरेशन सिंदूरनंतर आता पाकिस्तानला POK खाली करण्यासाठी थेट वॉर्निंग

राज्यात मान्सून कधी? IMDकडून मोठी अपडेट अन् पावसासंदर्भात इशारा काय?

ऑपरेशन सिंदूरनं पाकला लोळवलं आता पुढची स्ट्रेटजी काय? सरकारनं सांगितलं

भारताचं ट्रम्पला थेट उत्तर, काश्मीरच्या मुद्द्यावर मध्यस्थी मान्य नाही
