महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष, निवडणूक कलांमध्ये किती जागांवर आघाडीवर? वाचा A टू Z अपडेट

| Updated on: Nov 23, 2024 | 9:09 AM

Maharashtra Assembly Election Results 2024: महाविकास आघाडीची राज्यात पिछाडी होत असल्याचे दिसत आहे. महाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. काँग्रेस ४१ जागांवर आघाडीवर आहे. २८ जागांवर ठाकरे गट तर ३१ जागांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे.

महाराष्ट्र निवडणूक निकाल 2024: भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष, निवडणूक कलांमध्ये किती जागांवर आघाडीवर? वाचा A टू Z अपडेट
devendra fadnavis
Follow us on

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा कल हाती येऊ लागले आहे. या कलामध्ये राज्यात भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. भाजपने टपाली मतमोजणीत आघाडी घेतली आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात कांटे की टक्कर पाहण्यास मिळत आहे. सकाळी ९ पर्यंत मिळालेल्या कलानुसार भाजपने ९० जागांवर आघाडी घेतली आहे. महायुतीमधील शिवसेना २६ आणि राष्ट्रवादीला २१ जागा मिळताना दिसत आहे. महायुतीने २८८ जागांपैकी १३७ जागांवर आघाडी घेतली आहे.

महाविकास आघाडीची राज्यात पिछाडी होत असल्याचे दिसत आहे. हाविकास आघाडीत काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरत आहे. काँग्रेस ५० जागांवर आघाडीवर आहे. ४० जागांवर ठाकरे गट तर ४५ जागांवर शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर आहे. राज्यात महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यात चांगलीच चुरस दिसत आहे. राज्यातील निकालाचे चित्र दुपारी १२ वाजेपर्यंत स्पष्ट होणार आहे. कलांमध्ये महायुती १३७ तर राष्ट्रवादी १३५ जागांवर आघाडीवर आहे. राज्याचे निकाल या कलानुसार राहिले तर सत्तेची चावी लहान पक्ष किंवा अपक्षांच्या हातात जाणार आहे. त्यामुळे अपक्षांना स्थान मिळणार आहे.

बारामतीमध्ये पोस्टल मतांमध्ये अजित पवार पिछाडीवर होते. परंतु आता त्यांनी आघाडी घेतली आहे. येवलामध्ये छगन भुजबळ यांनी आघाडी घेतली आहे. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरमधून आघाडी घेतली आहे.

उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting