मुंबई : बॉलिवूड अभिनेता अजय देवगनचा ‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट बघून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते प्रचंड प्रभावित झाल्याचे दिसत आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी असा हॅशटॅग सुरु केला आहे (MNS party workers).
छत्रपती शिवाजी महाराजांचे सरदार तानाजी मालुसरे यांच्याप्रमाणेच आपणही मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे सरदार आहोत, असा निर्धार करत मनसेच्या कार्यकर्त्यांनी (MNS party workers) ही हॅशटॅगची मोहिम सुरु केली आहे.
औरंगजेबाच्या ताब्यातील कोंढाणा पुन्हा जिंकण्यासाठी स्वराज्याचे- शिवरायांचे शिलेदार तान्हाजींनी स्वतःच्या जीवाची बाजी लावली…
आपण आपलाच पक्ष वाढवून आपली #विधानसभा #प्रभाग जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा नाही करू शकत?
फक्त जिंकण्याचा निर्धार करूया!#राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी— Kirtikumar Shinde (@KirtikumrShinde) January 12, 2020
येत्या २३ जानेवारीला मनसेचे महाअधिवेशन आहे. या अधिवेशनात पक्षाची पुढील वाटचाल ठरवली जाणार आहे. या अधिवेशनात मनसे हिंदुत्वाबाबत भूमिका घेणार असल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय पक्षाच्या झेंड्याचा रंगदेखील बदलणार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत राज ठाकरे अधिकृतपणे घोषणा करणार आहेत. त्यांच्या सर्व निर्णयांना कार्यकर्त्यांचा पूर्णपणे पाठिंबा असल्याचे या हॅशटॅग मोहिमेतून स्पष्ट होत आहे.
साहेब तुम्ही जो निर्णय घ्याल तो योग्यच असेल.
तुम्ही बांधाल ते तोरण आणि तुम्ही ठरवाल तेच धोरण…#राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी @RajThackeray @mns9sms @mnsadhikrut @rajupatilmanase pic.twitter.com/g9BREwMxg2— AKASH GAWALI 9️⃣ (@AkashGawali11) January 13, 2020
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सैन्यातील वीर सरदार तानाजी सावंत यांच्या आत्मचरित्रावर आधारीत ‘तान्हाजी’ चित्रपट आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसाठी त्यांच्या मावळ्यांनी जीवाची पर्वा केली नाही. तानाजी मालुसरे स्वत:च्या मुलाचे लग्न सोडून कोंढाणा किल्ल्याच्या मोहिमेवर गेले होते. त्यांनी स्वराज्यासाठी कोंढाणा किल्ला जिंकून दिला, पण यात त्यांना आपला जीव गमवावा लागला, अशी तान्हाजी मालुसरे यांची अमरगाथा आहे.
कुठे जायच हे माहित आहे
आणि जिथे जायच तिथे सर्वांना नेणारच
हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये आहे.चिंता नसावी #महाअधिवेशन #RajThackeray #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी pic.twitter.com/ULrz3Ihy2H
— Vaibhav malave (@Vaibhavmalave9) January 12, 2020
तीन दिवसांत ‘तान्हाजीं’ची घोडदौड
‘तान्हाजी द अनसंग वॉरियर’ या सिनेमाची बॉक्स ऑफिसवर घोडदौड सुरु आहे. पहिल्या दिवशी 16 कोटी रुपयांची कमाई करणाऱ्या या सिनेमाने तीन दिवसात 60 कोटींचा आकडा पार केला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरन आदर्श यांनी तीनही दिवसाच्या कमाईचे आकडे जाहीर केले आहेत. यानुसार तान्हाजी सिनेमाने तीन दिवसात मिळून तब्बल 61.75 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
राजकारणातील ‘र’ सुद्धा कळत नव्हता तेव्हापासून राजसाहेबांचा चाहता आहे.
पक्षासाठी काम करण्याची मनापासून इच्छा आहे.
पण मी जिथे राहतो तिथे पक्षच नाही आहे अशी तक्रार नाही करणार.
मी सध्या नवी मुंबई(पनवेल) येथे वास्तव्यास आहे.
फक्त एक हाक मारा…#राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी— R.R.Mhatre (EDiot Hittler) (@EdiotHittler) January 12, 2020
?साहेब आज मी शपथ घेतो की, पक्षाच्या चांगल्या वाईट काळात सदैव पक्षासाठी झटणार , प्रभाग असो किंवा वार्ड मी तुमचा गड राखणारच… ? #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी #मराठी pic.twitter.com/EChK7l72C8
— Sandesh Nevrekar (@Sandesh_Nevrekr) January 13, 2020
?साहेब आज मी शपथ घेतो की, पक्षाच्या चांगल्या वाईट काळात सदैव पक्षासाठी झटणार , प्रभाग असो किंवा वार्ड मी तुमचा गड राखणारच… ? #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी #मराठी @RajThackeray pic.twitter.com/c1tLHfS9S5
— Raj_samarthak_ulhas_desle (@desle_raj) January 12, 2020
#राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी
जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवायचाय त्यासाठी मी सदैव तुमच्या सोबत आहे
आदरणीय राज साहेब,
ह्यापुढे पराभव नाही… फक्त महाराष्ट्र जिंकण्याचा निर्धार!#राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी— Dhondiba Kharat (@KharatDhondiba) January 12, 2020
साहेब आज मी शपथ घेतो की,पक्षाच्या चांगल्या वाईट काळात सदैव पक्षासाठी झटणार, प्रभाग असो किंवा वार्ड मी तुमचा गड राखणारचं…✍ #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी #मराठी #म pic.twitter.com/UmdKMNZwUC
— Ganesh Dixit (@GaneshDixitMNVS) January 12, 2020
आदरणीय साहेब,
आम्ही शपथ घेतो की, विक्रोळी विधानसभा आणि प्रत्येक प्रभाग आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच जिंकणार!
ह्यापुढे पराभव नाही… फक्त जिंकण्याचा निर्धार!
विक्रोळीगड मनसेचाच! #राजसाहेब_मी_तुमचा_तान्हाजी
विनोद शिंदे
अध्यक्ष,विक्रोळी विधानसभा,
महाराष्ट्र नवनिर्माण सेना— Vinod Shinde (@VinodSh38778875) January 12, 2020