मुंबई: जीओ वर्ल्ड सेंटर परिसरात आढळला विषारी साप; सर्पमित्राने केला रेस्क्यू, सुरक्षीत अधिवासात सुटका

| Updated on: Dec 17, 2021 | 8:50 AM

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या वाद्रे कुर्ला संकुलमधील जीओ वर्ल्ड सेंटर परिसरात साप आढळू आला. साप असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी 'वापरा' या संस्थेला घटनेबाबत माहिती दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संस्थेतील सर्पमित्र अतुल कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या सापाला रेस्क्यू केले.

मुंबई: जीओ वर्ल्ड सेंटर परिसरात आढळला विषारी साप; सर्पमित्राने केला रेस्क्यू, सुरक्षीत अधिवासात सुटका
प्रातिनिधिक छायाचित्र
Follow us on

मुंबई :  उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या वाद्रे कुर्ला संकुलमधील जीओ वर्ल्ड सेंटर परिसरात साप आढळू आला. साप असल्याचे लक्षात येताच कर्मचाऱ्यांनी ‘वापरा’ या संस्थेला घटनेबाबत माहिती दिली. दरम्यान घटनेची माहिती मिळताच संस्थेतील सर्पमित्र अतुल कांबळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन या सापाला रेस्क्यू केले. संबंधित साप हा नाग प्राजातीचा असल्याची माहिती अतुल कांबळे यांनी दिली.

सापाला पाहण्यासाठी गर्दी

दरम्यान साप आढळल्याची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी साप पहाण्यासाठी गर्दी केली होती. नागरिकांना भिऊन हा साप तिथे असलेल्या कुंडितील झाडामागे लपून बसला होता. अतुल कांबळे यांनी घटनास्थळी दाखल होऊन मोठ्या शिताफीने या सापाला पकडले. नाग पकडल्यानंतर सर्वंनी सुटकेचा निश्वास सोडला. साप आढळून आल्याने काही काळ परिसरामध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान त्यानंतर या सापाला वनविभागाच्या नियमानुसार सुरक्षीत अधिवासात मुक्त करण्यात आले.

सापांच्या चार प्रमुख विषारी प्राजातीमध्ये नागाचा समावेश

या सापाबाबत माहिती देताना कांबळे यांनी सांगितले की, हा साप नाग या प्रजातीचा आहे. भारतामध्ये आढळणाऱ्या सापांच्या प्रमुख चार विषारी जातींमध्ये नागाचा समावेश होतो. या सापाची उंची 5 ते 5.5 फुटांपर्यंत वाढू शकते. हा साप चावल्यास रुग्ण दगावू  शकतो. त्यामुळे नागाने दंश केल्यास इतर दुसरे कोणतेही उपचार न करता, रुग्णाला तातडीने रुग्णालयात दाखल करावे. योग्यवेळी उपचार मिळाल्यास रुग्णाचा जीव वाचू  शकतो. सामान्यपणे उंदिर, घुशी आणि पक्षाची अंडी हे या सापाचे प्रमुख खाद्य आहे. तो आपल्या खाद्याच्या शोधात बाहेर येत असतो. चुकून त्याला धक्का लागल्यास किंवा धोका जाणवला तरच तो मनुष्याला दंश करतो. सापाच्या अनेक प्राजाती या नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत, त्यामुळे त्यांना न मारता त्यांची माहिती सर्पमित्रांना द्यावी असे आवाहनही कांबळे यांनी यावेळी केले.

संबंधित बातम्या 

HSC and SSC board exam date : इयत्ता दहावी, बारावीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर, परीक्षा कधीपासून? वाचा सविस्तर

कल्याण-डोंबिवलीत येत्या आठवड्यापासून अनधिकृत बांधकांमावर हातोडा; किती बांधकामे तोडणार?

OBC Reservation: ओबीसी आरक्षणावरून केंद्राकडून दिशाभूल, संसदेत जाब विचारणार; नवाब मलिकांचा इशारा