Wadala Election Result 2024 LIVE Updates : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचे निकाल स्पष्ट होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यात विधानसभा निवडणुकीचे सुरुवातीच्या कलांमध्ये आतापर्यंत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपाच्या १२९ जागा, शिवसेनेच्या ५७ जागा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी ३८ जागांवर आघाडी आहे. या निकालात महाविकासआघाडीचा सुपडासाफ झाल्याचं दिसून येत आहे. महाविकास आघाडीतील शरद पवारांच्या राष्ट्रवादीला १९ जागा आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला १७ जागांवर आघाडी आहे. तर काँग्रेस १८ जागांवर आघाडीवर आहे. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकासआघाडी अशी लढत पाहायला मिळाली. या अटीतटीच्या लढतीत महायुतीने सत्तेसाठी लागणारी मॅजिक फिगर गाठली आहे. महाराष्ट्र विधानसभेतील सर्वात ज्येष्ठ आमदार आणि सलग नवव्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरलेले भाजप नेते कालिदास कोळंबकर यांनी निवडणुकीतील पहिल्या विजयाची नोंद करण्याची तयारी करत आहे.
वडाळा विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार कालिदास कोळंबकर यांनी सलग नवव्यांदा विजयी झाले आहेत. कालिदास कोळंबकर यांनी तब्बल 24 हजार 973 मतांनी विजय मिळवला आहे. कालिदास कोळंबकर यांनी शिवसेना ठाकरे गटाच्या श्रद्धा जाधव यांचा दारुण पराभव केला आहे. वडाळ्यातील मतदारांनी पुन्हा एकदा आपला आमदार म्हणून कालिदास कोळंबकरांची निवड केली आहे. त्यांच्या विजयामुळे मोठा विक्रम रचला गेला आहे.
कालिदास कोळंबकर हे आतापर्यंत सलग ८ वेळा विधानसभेवर निवडून आले आहेत. त्यानंतर आता २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत वडाळा विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे उमेदवार कालिदास कोळंबकर यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेकडून माजी महापौर श्रद्धा जाधव आणि मनसेकडून माजी नगरसेविका स्नेहल जाधव निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या होत्या. कालिदास कोळंबकर हे निवडणुकीच्या प्रत्येक फेरीत आघाडीवर असल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे कोळंबकरांनी मोठ्या मताधिक्याने श्रद्धा जाधव यांचा दारुण पराभव केला.
2019 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपचे उमेदवार कालिदास निळकंठ कोळंबकर यांनी विजय मिळवला होता. वडाळा विधानसभा मतदारसंघात भाजपचे कालिदास कोळंबकर हे सलग नऊ वेळा विजयी ठरले आहेत. यंदाच्या निवडणुकीतही वडाळ्यातील जनतेने कालिदास कोळंबकर यांनाच आमदार म्हणून निवडलं आहे. यामुळे आता कालिदास कोळंबकर यांची नोंद जागतिक विक्रमात होणार आहे.