अशी इमेज असलेल्या नेत्यापासून महिलांनी शंभर हात दूर राहावे, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांचा घणाघात

शिवसेनेच्या महिला इथं गरबा खेळत नाही बसलेल्यात. आम्ही आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरणार, असा इशारा संजना घाडी यांनी दिला.

अशी इमेज असलेल्या नेत्यापासून महिलांनी शंभर हात दूर राहावे, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या संजना घाडी यांचा घणाघात
संजना घाडी
Follow us
| Updated on: Dec 22, 2022 | 5:06 PM

मुंबई : खासदार राहुल शेवाळे यांच्यावर ठाकरे गटाच्या संजना घाडी यांनी जोरदार हल्लाबोल केला. संजना घाडी म्हणाल्या, राहुल शेवाळे यांची धर्मपत्नी आहे. जिच्याबरोबर त्यांनी सात फेरे घेतले. वचनं दिलेत. ती वचन ते आपल्या धर्मपत्नीसोबत निभाऊ शकले नाहीत. तिला एका दुःखाच्या गर्तेत टाकलं. ती भडभडती जखम घेऊन सहचारिणी तुमच्यासोबत राहते आहे. शिवसेनेनं तुम्हाला निवडून दिलं. तुमच्यासाठी रक्ताचं पाणी केलं. हे तुम्ही विसरलास आणि खोक्यांसाठी गद्दारी केलीत. मुळात तुमझा स्वभाव गद्दारीचा आहे. मुळात तुमझा स्वभाव हा विश्वासघातकी आहे. अशा लोकप्रतिनिधीवर लोकांनी विश्वास ठेऊ नये. अशी इमेज असलेल्या नेत्यांपासून महिलांनी शंभर होत लांब राहावं, अशी जळजळीत टीका त्यांनी केली.

संजना घाडी म्हणाल्या, राहुल शेवाळे यांचं प्रकरण बाहेर निघालं. तेव्हा खासदारांची बैठक होती. उद्धव ठाकरे यांनी त्यांना सांगितलं होतं की, या प्रकरणातील काय सत्यता काय आहे, ते तुम्ही मांडा. हा विषय क्लीअर करून द्या. यावर निर्णय घ्यावे लागतील. संजय राठोड प्रकरणात तत्कालीन शिवसेना पक्षानं अॅक्शन घेतली. त्यावेळी चित्रा वाघ ओरडत होत्या. आता संजय राठोड शिवसेनेतून बाहेर गेले. मग ते पवित्र झाले का, असा सवालही त्यांनी विचारला.

दिशा पटनीचे फोटो टाकून दिशा सालीयन असे काम करणार का. यांना सगळं करून झालं. पोलीस यंत्रणेचा तपास करून झाला. सर्व समोर आलं आहे. आता सारखे फाजिलगिरी करतात. शिवसेनेच्या महिला इथं गरबा खेळत नाही बसलेल्यात. आम्ही आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्या समर्थनात रस्त्यावर उतरणार, असा इशारा संजना घाडी यांनी दिला.

नितेश राणे आणि नीलेश राणे या दोघांची पहिले नार्को टेस्ट झाली पाहिजे. यांच्या बायका का टीकत नव्हत्या. यांच्या घरातले दरवाजे, टीव्ही का फुटत होत्या. सिंधुदुर्गातल्या प्रत्येक माणसाला, घराघरात हे माहिती आहे. आम्हाला हे सांगू नका. नारायण राणे यांची नार्को टेस्ट केली तर मशीन बिघडून जाईल. कधी काँग्रेसला शिव्या घालतात. कधी भाजपाला शिव्या घालतात. कुठला पक्ष ठेवलाय का तुम्ही, असा घणाघातही संजना घाडी यांनी केला.

'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?
'... त्यांना सत्तेत ठेवले हेच मोठं',बच्चू कडू यांचा नेमका कोणाला टोला?.
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?
भाजपचं पारडं जडच...फडणवीस CM, मुख्यमंत्रिपदासह 'ही' मोठी खाती BJP कडे?.
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?
मागणी केलेल्या खात्यांपैकी कोणती खाती शिंदेंच्या शिवसेनेला मिळणार?.
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?
नव्या सरकारमध्ये अजितदादांच्या राष्ट्रवादीच्या पारड्यात कोणती खाती?.
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?
मतांचा टक्का वाढला, विरोधकांच्या आरोपांवर काय म्हणाले निवडणूक अधिकारी?.
शिंदे म्हणाले; 'मी काळजीवाहू CM, सगळ्यांची काळजी घेतोय, आजही खूश...'
शिंदे म्हणाले; 'मी काळजीवाहू CM, सगळ्यांची काळजी घेतोय, आजही खूश...'.
फडणवीस तिसऱ्यांदा CM, दिल्लीत शिक्कामोर्तब तर शिंदेंच्या वाट्याला काय?
फडणवीस तिसऱ्यांदा CM, दिल्लीत शिक्कामोर्तब तर शिंदेंच्या वाट्याला काय?.
मुख्यमंत्री फडणवीस? दिल्लीत फैसला पण देसाई,चंद्रकांतदादांचा सूर वेगळा?
मुख्यमंत्री फडणवीस? दिल्लीत फैसला पण देसाई,चंद्रकांतदादांचा सूर वेगळा?.
खातेवाटपावरुन इनसाईड स्टोरी, कोणाचे किती मंत्री अन कोणाकडे कोणती खाती?
खातेवाटपावरुन इनसाईड स्टोरी, कोणाचे किती मंत्री अन कोणाकडे कोणती खाती?.
अचानक ७६ लाख मतं आली कुठून? वाढलेल्या मतांच्या टक्क्यावरून वादंग
अचानक ७६ लाख मतं आली कुठून? वाढलेल्या मतांच्या टक्क्यावरून वादंग.