ज्या भावाबरोबर खेळली, बागडली… त्याच भावाचा मृतदेह पाहिला अन् बहिणीनं त्याच जागी….

मयत नामदेव साखरे यांना दोन भाऊ व एक बहीण. तीन भावात एक लाडकी बहीण असल्याने मथुराबाई यांचा आदर, सन्मान केला जात असे.

ज्या भावाबरोबर खेळली, बागडली... त्याच भावाचा मृतदेह पाहिला अन् बहिणीनं त्याच जागी....
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Mar 16, 2023 | 1:09 PM

राजीव गिरी, नांदेड | भारतीय संस्कृतीत (Indian culture) भावा-बहिणीच्या (Brother Sister) नात्याला एक वेगळं स्थान आहे. बालपणापासून जपलेलं हे नातं मोठेपणी आणि वृद्धापकाळी तर आणखी वेगळं रुप घेतं. दुरावलेले असले तरीही नात्यांची वीण अधिक घट्ट होत जाते. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या भावा-बहिणीच्या एकापेक्षा एक भावनिक कथा ऐकायला मिळत असतात. नांदेडमध्ये नुकतीच घडलेल्या एका घटनेनं दोन गावं हळहळ व्यक्त करत आहेत. वृद्धापकाळी दीर्घ आजारानं भावाचा मृत्यू झाला. तीन भावांमध्ये एकुलती एक असलेली बहीण भावाच्या अंत्यदर्शनासाठी आली. थोरल्या भावाचा मृतदेह पाहिला अन् तिने तिथेच प्राण त्यागला.

कुठे घडली घटना?

नांदेडमधील अर्धापूर शहरातील ही हृदय पिळवटून टाकणारी ही घटना सध्या चर्चेत आहे. शहरातील अहिल्यादेवी नगरात राहणारे ज्येष्ठ नागरिक नामदेव यादोजी साखरे (वय ८५) हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते.त्यांचा आजार बळावल्याने प्रकृती जास्तच खालावली होती. मंगळवारी राहत्या घरी त्यांचं निधन झालं. ही निधनाची बातमी सर्वा नातेवाईकांना देण्यात आली. नामदेव साखरे यांच्या पार्थिवावर बुधवारी अंत्यसंस्कार करण्याचे ठरले. नातेवाईक अंत्यदर्शनासाठी येत होते.

बहिणीने मृतदेह पाहताच…

आपल्या लाडक्या भावाच्या अंत्यदर्शनासाठी मथुराबाई संभाजी बोरकर (वय ८० कोर्टा ता. वसमत जिल्हा हिंगोली) सकाळी ९वाजेच्या सुमारास आल्या. भावाचा मृतदेह पाहताच धक्का बसला. त्या तिथेच खाली बसल्या आणि काही क्षमताच प्राण सोडला.उपस्थित नातेवाईकांनी तातडीने उपचारासाठी शहरातील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय तपासणी करून मृत घोषित केले.

बहिणीच्या मृतदेहाची साडीचोळीने बोळवण

ज्या घरात भावाचा मृत्यू झाला, त्याच घरातून बहिणीच्या मृतदेहाची बोळवण करण्या आतील. मथुराबाईंच्या पार्थिवाला साडीचोळीने बोळवण करून अंत्यसंस्कारासाठी कोर्टा येथे पाठवण्यात आले. त्यांच्या पश्चात पती,तीन मुली,एक मुलगा असा परिवार आहे. तर नामदेव साखरे यांच्या मागे पत्नी, पांच मुली, दोन मुलगे असा परिवार आहे.

तीन भावात एकच बहीण

मयत नामदेव साखरे यांना दोन भाऊ व एक बहीण. तीन भावात एक लाडकी बहीण असल्याने मथुराबाई यांचा आदर, सन्मान केला जात असे. नामदेव साखरे हे आजारी आसल्याने त्यांची बहीण काही दिवसांपूर्वी भेटुन गेल्या होत्या. तसेच आरोग्याची काळजी घे असे सांगून गेल्या.ही शेवटचीच भेट होईल त्यांना ठाऊक नव्हते.नियतीच्या मनात काही वेगळेच होते. या भावंडातील दोन भाऊ वारल्यानंतर हे भाऊ बहीण एकमेकांना आधार होते.पण सर्व भावंडात वडील असलेले नामदेव साखरे आपणाला सोडून गेले आहेत, हे दुःख सहन न झाल्याने अखेरच्या क्षणीही त्यांनी भावासोबत जाण्याचा निर्णय घेतला, यामुळे नांदेडमध्ये या सध्या या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.