Chandrapur Accident : चंद्रपुरात ट्रकने दुचाकीला चिरडले, आई, मुलाचा मृत्यू, वडील व दुसरा मुलगा जखमी
निखिल ठवरी हे आपल्या कुटुंबासह दुचाकीनं रुग्णालयात जात होते. ते लहूजीनगर येथून ताडाळी येथील रुग्णालयात जात होते. खुटाळा गावाजवळ वाहतूक बैशिस्त होती. वाहन पुढं जाण्यास अडथळा निर्माण होत होता. अशात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेले निखिल यांचे कुटुंबीय चिरडले गेले.
चंद्रपूर : शहराजवळ घुग्गुस मार्गावर दुचाकीला ट्रकने धडक दिली. या अपघातात आई आणि 3 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर वडील आणि 5 वर्षीय मुलगा गंभीर झाले आहेत. निखिल ठवरी (Nikhil Thawari) आपली मुले आणि गर्भवती पत्नीसह लहूजनगर येथून ताडाळी येथील रुग्णालयात तपासणीसाठी जात होते. दरम्यान खुटाळा गावाजवळ महामार्गावर घुग्गुस मार्गावरील अवजड वाहनाच्या अस्ताव्यस्त पार्किंगमुळे वाहन पुढे नेण्यास अडथळा आला. त्यामुळं हा अपघात घडला. खुटाळा ( Khutala) ग्रामपंचायतीने काही दिवसांपूर्वी अवजड वाहतूक समस्येबाबत पोलिसांना (Police) निवेदन दिले होते. मात्र त्यावर कारवाई न झाल्याने दोघांचा मृत्यू झाल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. पानठेला चालवून उदरनिर्वाह करणाऱ्या निखिल याच्या कुटुंबावर यामुळे मोठा आघात झाला आहे. पडोली पोलीस अधिक तपास करत आहेत.
कशा झाला अपघात
निखिल ठवरी हे आपल्या कुटुंबासह दुचाकीनं रुग्णालयात जात होते. ते लहूजीनगर येथून ताडाळी येथील रुग्णालयात जात होते. खुटाळा गावाजवळ वाहतूक बैशिस्त होती. वाहन पुढं जाण्यास अडथळा निर्माण होत होता. अशात ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीवर बसलेले निखिल यांचे कुटुंबीय चिरडले गेले. यात निखिल यांच्या पत्नीचा मृ्त्यू झाला. तसेच तीन वर्षीय मुलगाही जागीच ठार झाला. तर निखल व त्यांचा दुसरा पाच वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
बेशिस्त वाहतुकीचा बळी
घुग्गुस मार्गावर वाहतूक बेशिस्त आहे. या वाहतुकीचे दोन जण बळी ठरल्याची प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिली. ही वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी पोलिसांना निवेदन देण्यात आले होते. परंतु, त्यांनी याकडं दुर्लक्ष केलं. त्यामुळं हा अपघात झाला. यात आई व मुलगा ठार झाला. तर वडील व दुसरा मुलगा जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. मनसेच्या अॅम्बुलन्सच्या मदतीनं रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.