‘…तर महायुतीच्या सरकारमधून बाहेर पडेन’, राष्ट्रवादीच्या मंत्र्याची धमकी

| Updated on: Sep 29, 2024 | 1:45 PM

महायुती सरकारमधील अजित पवार गटाच्या मंत्र्याने महायुती सरकारमधून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. आरक्षणाच्या विषयावर या मंत्र्याने स्पष्ट भूमिका घेतली आहे. पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होईल.

...तर महायुतीच्या सरकारमधून बाहेर पडेन, राष्ट्रवादीच्या मंत्र्याची धमकी
महायुती
Follow us on

गडचिरोलीतून येणारे आमदार आणि कॅबिनेट मंत्री धर्मराव आत्राम यांनी महायुतीच्या सरकारमधून बाहेर पडण्याच इशारा दिला आहे. धर्मराव आत्राम हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार आहेत. ते अजित पवार गटात आहेत. “धनगर समाजाला आरक्षण दिल्यास मी महायुतीच्या सत्तेतून बाहेर पडणार” अशी प्रतिक्रिया धर्मराव आत्राम यांनी टीव्ही 9 मराठीला दिली आहे.

आत्राम हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील आमदार आहेत. सध्या ते कॅबिनेट मंत्री आहेत. आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासाठी तयार असून कुठे ना कुठे धनगर समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आत्राम असल्यात दिसत आहे.

आमदारकी घरातच ठेवण्याच्या आरोपावर काय म्हणाले?

आमदारकी घरातच राहिली पाहिजे यासाठी धर्मराव आत्राम आणि त्यांच्या मुलीचा राजकीय गेम आहे असा आरोप अमरीश राव आत्राम यांनी केला. त्यावर प्रतिक्रिया देताना धर्मराव आत्राम म्हणाले की, “पन्नास वर्षातून 40 वर्ष आमदारकी माझ्या घरीच राहिली. पुढे पण राजघराण्यातच आमदारकी राहणार. पुतण्याही निवडणुकीत आहे, माझी मुलगी सुद्धा निवडणुकीत आहे”

मुलीने दिलेला हात कापण्याचा इशारा

भाग्यश्री आत्राम या धर्मराव बाबा आत्राम यांच्या कन्या आहेत. भाग्यश्री यांनी वडिलांची साथ सोडत शरद पवारांच्या पक्षात प्रवेश केला. “माझे वडील शेर तर मीही शेरणी. पण कार्यकर्त्यांना हात लावला तर हात कापून टाकेन” असा इशाराच भाग्यश्री आत्रामांनी दिला होता.