Pune Drugs Case : पुण्यातील L3 बारमध्ये DJ चा दणदणाट, बेधुंद तरुणाईचा जल्लोष, नवीन 2 व्हिडीओ समोर

| Updated on: Jun 24, 2024 | 8:57 PM

Pune Drugs Case : पुणे ड्रग्ज प्रकरणात L3 बारमधील आणखी दोन व्हिडीओ समोर आले आहेत. पहिल्या व्हिडीओमध्ये तरूण ड्रग्ज सेवन करत असल्याचं दिसलं होतं. आता नवीन व्हिडीओमध्ये आतमध्ये कशा प्रकारे राडा सुरू होता हे दिसत आहे.

Pune Drugs Case : पुण्यातील L3 बारमध्ये DJ चा दणदणाट, बेधुंद तरुणाईचा जल्लोष, नवीन 2 व्हिडीओ समोर
Follow us on

पुण्यातील एफसी रोडवरील पुण्यातील L3 बार मधील ड्रग्जच्या व्हिडीओमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या पार्टीमध्ये अनेकांना ताब्यात घेतलं असून या प्रकरणाचा आणखी तपास सुरी आहे. अशातच या पार्टीमधील आणखी काही व्हिडीओ समोर आलेत. रविवारी सकाळी पहाटेपर्यंत सुरू असलेल्या या पार्टीमधील दोन व्हिडीओ व्हायरल होत आहेत. या व्हिडीओमध्ये बारमधील पार्टीत डीजे चा दणदणाट आणि तरुणाई बेधुंद होत जल्लोष करत असल्याचं दिसत आहेत.

L3 बार मध्य  रविवारी पहाटे ४ पर्यंत सुरू होती पार्टी.  पुण्यातील एफ सी रोड असलेल्या L3 बार मधील ४० ते ५० जणांचे पार्टीमधील व्हिडीओ समोर आले आहेत. हातात मद्याचे ग्लास, डी जे चा मोठा दणदणाट तरुणाई कडून सुरू होता या बार मध्ये जल्लोष करताना दिसत आहेत. या  प्रकरणात बार मधील वेटर आहेत त्यांना परवानगी नसताना दुसऱ्या मजल्यावर मद्याची विक्री केल्याप्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अटक करण्यात आली आहे. येत्या  29 तारखेपर्यंत कोठडी  सुनावण्यात आलीये.

 

शिवाजीनगर भागात अनेक कॉलेज असून त्या भागात अशा प्रकारची पार्टी होतेय म्हणजे ड्रग्जचं जाळं आता पुण्यातही पसरलं हे समोर आलं आहे. पुण्यातील FC रोड कायम गजबजलेला असतो, या परिसरात एफ सी कॉलेज, रानडे इन्स्टिस्टुटा असून या भागात मोठी खाऊ गल्ली असल्याने तरूणाई मोठ्या संख्येने तिथे असलेली पाहायला मिळते. मात्र या बारमधील पार्टीने खळबळ उडवून टाकली आहे. पोलीस या पार्टीमधील सर्वांची चौकशी करत असून कोणाच्या वरदहस्ताने  हे सुरू आहे का असा सवाल सोशल मीडियावर केला जात आहे.