पुण्यात घर घ्यायचंय? ‘म्हाडा’ लवकरच काढतंय एक हजार घरांची लॉटरी, कधी आहे सोडत?

पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. पुणे म्हाडाकडून (Pune MHADA) लवकरच एक हजार घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery Pune) काढली जाणार आहे. ज्यामुळे परवडणाऱ्या दरात पुण्यात घर मिळू शकणार आहे.

पुण्यात घर घ्यायचंय? 'म्हाडा' लवकरच काढतंय एक हजार घरांची लॉटरी, कधी आहे सोडत?
Follow us
| Updated on: Aug 27, 2021 | 2:24 PM

पुणे : वाढत्या औद्योगीकरणासोबत पुण्याचा (Pune) विस्तार झपाट्याने होत आहे. पीएमआरडीएचं (PMRDA) विस्तारीत प्रारूप आणि त्यात मेट्रोचं (Pune Metro) आगमन यामुळे रहाण्यासाठी पुण्याला अनेकजण पसंती देत असतात. पुण्यात घरं घेणं हे अनेकांचं स्वप्न आहे. पण शहरीकरणासोबत वाढत चाललेल्या घरांच्या किंमतींमुळे पुण्यात घर घेणं सर्वसामान्यांना शक्य होईलच असं नाही. पण आता पुण्यात घर घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. पुणे म्हाडाकडून (Pune MHADA) लवकरच एक हजार घरांसाठी लॉटरी (MHADA Lottery Pune) काढली जाणार आहे. ज्यामुळे परवडणाऱ्या दरात पुण्यात घर मिळू शकणार आहे. (Pune MHADA will soon draw lottery for one thousand houses)

पुणे, पिंपरी चिंचवड हद्दीतली घरं

पुणे गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळाच्या वतीने एक हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. ही घरं प्रामुख्याने पुणे, पिंपरी चिंचवड शहरातच्या हद्दीतली आहेत. या सदनिका पंतप्रधान आवास योजना, प्रथम येणाऱ्या प्रथम प्राधान्य, म्हाडाकडून बांधण्यात आलेले प्रकल्प आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनेअंतर्गत असणार आहेत.

‘म्हाडा’ची यावर्षातली तिसरी लॉटरी

म्हाडाकडून काढण्यात येणारी ही यावर्षातली तिसरी लॉटरी असणार आहे. यापूर्वी जानेवारी महिन्यात 5 हजार 217 सदनिकांची लॉटरी काढण्यात आली होती. त्यामध्ये पुणे महापालिका हद्दीतली 410, पिंपरी चिंचवड महापालिका परिसरात 1020 आणि कोल्हापूर महापालिका हद्दीतल्या 62 सदनिका होत्या.

त्यानंतर म्हाडाकडून 2 जुलैला दोन हजार 908 घरांची ऑनलाईन पद्धतीने लॉटरी काढण्यात आली होती. यामध्ये पुण्यासह सोलापूर, सातारा, सांगली, आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या म्हाडाच्या 2153 सदनिका आणि 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतल्या 755 सदनिका होत्या. त्यानंतर आता एक हजार घरं पुन्हा नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहेत.

गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर घरांची लॉटरी

पुणे विभागाच्या म्हाडाकडून यावर्षीच्या तिसऱ्या लॉटरीसाठी गणेशोत्सवाचा मुहूर्त ठरवण्यात आला आहे. गणेशोत्सावात एक हजार घरांची लॉटरी काढली जाणार आहे. या लॉटरीसाठी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया लवकरच म्हाडाकडून जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे पुण्यात घर घेण्याचं स्वप्न पाहणाऱ्यांना काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

इतर बातम्या :

Narayan Rane LIVE | दरोडेखोराप्रमाणे मला अटक, टप्प्याटप्प्याने प्रकरणं बाहेर काढणार : नारायण राणे

उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या असहिष्णुतेचे जनक, आशिष शेलार यांचा घाणाघाती हल्ला

‘राजीव तुम्हाला मिस करतेय’, काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर प्रज्ञा सातव भावूक

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.