पुन्हा आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकर धास्तावले, रेड अलर्टनंतर जोरदार पाऊस, अपार्टमेंटच्या बेसमेंट पाणी

Pune Rain: पुणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यानंतर पुणे शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून पुणे शहरातील सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून शहराला सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पुन्हा आलेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकर धास्तावले, रेड अलर्टनंतर जोरदार पाऊस, अपार्टमेंटच्या बेसमेंट पाणी
पुण्यात पावासामुळे नदीला पूर आला आहे.
Follow us
| Updated on: Aug 04, 2024 | 12:47 PM

नेहमी हवाहवासा वाटणार पाऊस पुणेकरांना घाबरवून सोडत आहे. यंदाच्या मान्सूनमध्ये दोन वेळा पुणे शहरातील अनेक भाग पाण्यात गेले. त्यानंतर रविवारी पुन्हा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यात पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासनला अलर्ट राहण्याचे आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे जिल्ह्याला आज पावसाचा रेड अलर्ट दिला आहे. त्यानंतर पुणे शहरासह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस सुरु झाला आहे. गेल्या अर्ध्या तासांपासून पुणे शहरातील सर्व भागांमध्ये जोरदार पाऊस पडत आहे. हवामान खात्याकडून शहराला सतर्कतेचा इशारा दिला आहे. द्वारका अपार्टमेंटच्या बेसमेंटमध्ये पाणी घुसले आहे. पहिल्या मजल्यावरचे लोक बाहेर जायला सुरूवात झाली आहे. सिंहगड रस्त्यावरील एकतानगरात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. द्वारका सोसायटी पूर्ण रिकामी केली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आदेश

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुणे जिल्ह्यातील ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषेच्या आतील नागिरकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. पुणे जिल्ह्यातील पूर परिस्थिती निर्माण होण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एक्शन मोडमध्ये आले आहेत. त्यांनी पुणे जिल्हाधिकारी, पुणे शहर महापालिका आयुक्त आणि आपतकालीन विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली. ब्लू लाईन म्हणजेच धोकादायक पूर रेषाच्या आत राहणाऱ्या सर्व नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच नागरिकांच्या दोन्ही वेळच्या जेवणाची, राहण्याची आणि त्यांना लागेल ती मदत करण्याचे दिले आदेश दिले आहेत.

हे सुद्धा वाचा

अजित पवार यांचे प्रशासनाला आदेश

काही दिवसांपासून धरणक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस होत आहे. त्यामुळे धरणांमधील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अजित पवार रविवारी बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी दूरध्वनीद्वारे संपर्क साधत प्रशासकीय अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. पाण्याचा वाढता विसर्ग लक्षात घेवून नागरिकांना तशा सूचना दिल्या आहेत.

घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग

सह्याद्रीच्या डोंगरमाथ्यावर पाऊसाची जोरदार बँटिंग सुरु आहे. कुकडी प्रकल्पातील सर्वात मोठा डिंभे जलाशय ओव्हरफ्लो झाला असून धरणातून घोडनदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. पाऊसाचा जोर कायम राहिल्यास विसर्ग वाढवण्यात येणार आहे. यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

मुळा मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग पुन्हा वाढवला आहे. खडकवासला धरण क्षेत्रातील चारही धरण 90% पेक्षा अधिक भरली आहेत. मुळा मुठा नदीपात्रात ३५ हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे. खडकवासला धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार सुरू आहे. एकता नगरीत पुन्हा पाणी येण्याचा धोका वाढू शकतो.

लोणावळ्यात धुवांधार पाऊस

लोणावळ्यात गेल्या 24 तासांत तब्बल 232 मिलिमीटर इतका पाऊस पडला आहे. त्यामुळे संपूर्ण लोणावळा जलमय झाले आहे. पर्यटन स्थळ असलेल्या लोणावळ्यात देखील मुसळधार पाऊस सुरू आहे. पर्यटकांची संख्या रोडावली आहे. पावसाने लोणावळ्यात जोरदार बॅटिंग केली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पाऊस जास्त कोसळला आहे. पर्यटन स्थळ असलेल्या भुशी धरणावर पाण्याचा प्रवाह वाढला आहे.

मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्..
मुख्यमंत्री फडणवीसांचं अनोखं स्वागत, थेट 'लाडकी बहीण'ची रांगोळी अन्...
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल
'आता राम आठवतोय, उद्धव ठाकरे नौटंकी...', किरीट सोमय्यांचा हल्लाबोल.
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली
शिंदेंच्याच दोन बड्या नेत्यांची मंत्रिपदासाठी धडपड अन् भेट नाकारली.
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल
आडवाणींची तब्येत बिघडली, गेल्या 4-5 महिन्यात चौथ्यांदा रूग्णालयात दाखल.
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?
उद्याच महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणता फॉर्म्युला झाला डन?.
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी
कोल्हापूरच्या नृसिंहवाडीत दत्त जयंतीचा उत्साह, भक्तांची अलोट गर्दी.