VIDEO | पाळीव कुत्र्यावर बिबट्याचा हल्ला, बिबट्याच्या वास्तव्यामुळे भीतीचे वातावरण
वारणावती वसाहतीला लागूनच जवळपास चांदोली अभयारण्य आहे. त्यामुळे अनेक प्राणी या परिसरात भटकंती करत आहेत. यापूर्वी अनेक गवे वस्तीत नागरिकांनी पाहिले आहेत. वसाहतीमध्ये असणारे अनेक मोकाट कुत्रेही गायब झाली आहेत.

सांगली : जिल्ह्यातील (sangli) शिराळा (shirala) तालुक्यातील वारणावती (waranavati) येथील भर नागरी वस्तीत बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला (leopard attack on dog) करून त्याला ठार केल्याची घटना घडली आहे. रविवारी रात्री साडेबाराच्या सुमारास आमीन गुड्डापुरे यांच्या घराजवळ ही घटना घडली. घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून वारणावती परिसरात भीतीचे वातावरण आहे. शेजारी चांदोली अभयारण्य असल्यामुळे त्या परिसरात नेहमी प्राणी पाहायला मिळतात. त्याचबरोबर आतापर्यंत तिथल्या रहिवाशांना अनेकदा रात्री प्राण्यांचे दर्शन झाले आहे.
पाळीव कुत्र्यावर त्याने झडप घालून त्याच्या हल्ला केला
वारणावती येथे आम्ही गुड्डापुरे यांनी आपल्या राहत्या घरी कुत्रे पाळले आहे. रात्री साडेबाराच्या सुमारास त्यांच्या घराजवळ असणाऱ्या रस्त्यावर बिबट्या सुमारे अर्धा तास बसून होता. त्यानंतर जवळच असणाऱ्या त्यांच्या पाळीव कुत्र्यावर त्याने झडप घालून त्याच्या हल्ला केला. झटापट ऐकू आल्यामुळे गुड्डापूरे व त्यांच्या घरातील सर्वजण बाहेर आले, तोपर्यंत बिबट्या कुत्र्याला अलगद घेऊन पलायन केले होते. हा सर्व थरार त्यांनी घरासमोर बसवलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.



अनेक मोकाट कुत्रेही गायब झाली आहेत
वारणावती वसाहतीला लागूनच जवळपास चांदोली अभयारण्य आहे. त्यामुळे अनेक प्राणी या परिसरात भटकंती करत आहेत. यापूर्वी अनेक गवे वस्तीत नागरिकांनी पाहिले आहेत. वसाहतीमध्ये असणारे अनेक मोकाट कुत्रेही गायब झाली आहेत. त्यामुळे बिबट्याचाही वसाहतीत वावर आहे. बऱ्याच दिवसापासून चर्चा होती, काल मात्र गुड्डापुरे यांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या कैद झाल्यामुळे त्याचे अस्तित्व अधोरेखित झाले आहे. या प्रकारामुळे नागरिकात भीतीचे वातावरण असून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
सांगली जिल्ह्यातील ३२ शिराळा तालुक्यातील वारणावती येथे बिबट्या कुत्र्यावर हल्ला…#sangli #shirala #leopardattack pic.twitter.com/I1TkXvHUxn
— महेश घोलप mahesh gholap (@maheshgholap3) February 27, 2023
वारणावती धरण परिसरात आठ महिने कायम पर्यटक
चांदोली अभयारण्य वारणावतीला लागून असल्यामुळे अनेकदा बिबट्या आणि अन्य प्राणी रात्री फिरत असतात. प्राणी अनेकदा लोकांना समोर दिसले आहेत. वारणावती धरण परिसरात आठ महिने कायम पर्यटक असतात. दिवसा पर्यटकांना एकही प्राणी अद्याप दिसलेला नाही.