“भाजपचा एक पॉर्नस्टार आरोप करतो आणि…”, संजय राऊत असं का म्हणाले?

| Updated on: Sep 27, 2024 | 12:09 PM

"मिरा भाईंदरसारख्या ठिकाणी आम्ही पुराव्यांसह काही भूमिका मांडल्यावर पॉर्नस्टारच्या कुटुंबियांची बेअब्रू झाली. न्यायव्यवस्था तुमच्या हातात आहे. दबाव आहे. आम्ही वरच्या कोर्टात जाऊ", असे संजय राऊतांनी सांगितले.

भाजपचा एक पॉर्नस्टार आरोप करतो आणि..., संजय राऊत असं का म्हणाले?
संजय राऊत
Follow us on

Sanjay Raut on Kirit Somaiya : भाजप नेते किरीट सोमय्या यांची पत्नी मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रु नुकसानीच्या खटल्यात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद सुनावण्यात आली आहे. तसेच 25 हजारांचा दंडही आकारण्यात आला आहे. शिवडी कोर्टाने हा निकाल दिला. हे प्रकरण २०२२ चे असून संजय राऊतांनी मीरा भाईंदर शौचालय प्रकरणात मेधा सोमय्यांवर आरोप केले होते. आता यावर संजय राऊतांनी प्रतिक्रिया दिली आहे. “या देशात न्याय विकत घेतला जातो. न्याय मिळत नाही. ज्याप्रकारे न्याय व्यवस्थेचे संघीकरण झाले आहे, दबाव टाकला जात आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी संजय राऊतांना अब्रु नुकसानीच्या खटल्याबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर त्यांनी स्पष्ट भाषेत उत्तर दिले. मी एक लवकरचा चित्रपट काढणार आहे. बाई मी विकत घेतला न्याय, असा हा सिनेमा असेल. या देशात न्याय विकत घेतला जातो. न्याय मिळत नाही. ज्याप्रकारे न्याय व्यवस्थेचे संघीकरण झाले आहे, दबाव टाकला जात आहे. भाजपचा एक पॉर्नस्टार आमच्यावर आरोप करतो, त्यावर काय बोलणार. उगाचच सर्वांवर खोटे आरोप केले जातात, असे संजय राऊत म्हणाले.

“पॉर्नस्टारच्या कुटुंबियांची बेअब्रू झाली”

“भाजपची लायकी ही आहे की त्यांनी पॉर्नस्टारला पुढे करुन त्यांनी आमच्यासारख्या सर्वांवर आरोप करायला लावत आहेत. आम्ही दुर्लक्ष केले. पण मिरा भाईंदरसारख्या ठिकाणी आम्ही पुराव्यांसह काही भूमिका मांडल्यावर पॉर्नस्टारच्या कुटुंबियांची बेअब्रू झाली. न्यायव्यवस्था तुमच्या हातात आहे. दबाव आहे. आम्ही वरच्या कोर्टात जाऊ”, असे संजय राऊतांनी सांगितले.

“याप्रकरणी मी आरोप केले नव्हते, मिरा भाईंदरचे विरोधी पक्षनेते प्रवीण पाटील यांनी पुरव्यासह तक्रार दाखल केली होते. प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहून आरोप केले होते. यात मी कुठेच नाही हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे मी हा घोटाळा काही कोटींचा आहे, त्याची चौकशी व्हायला पाहिजे असे म्हटले”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

“पॉर्न स्टारच्या पत्नीचा अपमान झाला असेल तर…”

“कारण हे पॉर्न स्टार विक्रांत घोटाळा प्रकरणी जे आरोप करतात, त्याची चौकशी झाली पाहिजे. तेव्हा तर हे बाप बेटे पळून गेले होते, त्यांचं सरकार आल्यावर पुन्हा चौकशी बंद केले. पॉर्न स्टार तुम्ही हिशोब द्या. पॉर्न स्टारच्या पत्नीचा अपमान झाला असेल तर त्यांनी आपल्या पॉर्न स्टार पतीकडे न्याय मागवा”, असेही संजय राऊत म्हणाले.