मोटार सुरू करायला गेलेला शेतकरी परतलाच नाही, माढा तालुक्यातील धक्कादायक घटना
माढा तालुक्यातून सिना नदी वाहते. ही नदी कित्तेकांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. नदीच्या काठावर भाजीपाला तसेच फळबाग लागवड केली जाते.
सोलापूर : माढा तालुक्यातून सिना नदी वाहते. ही नदी कित्तेकांसाठी जीवनदायिनी ठरली आहे. नदीच्या काठावर भाजीपाला तसेच फळबाग लागवड केली जाते. त्यामुळे या परिसरातील शेतकरी आनंदी आहेत. नदीमुळे आपल्याला चांगल्या पद्धतीचे अन्नधान्य मिळते. यामुळे शेतकरी सुखावला आहे. शिवाय नदीपात्रात पोहणे युवकांसाठी मजेची बाब. त्यामुळे या नदीत पोहण्याचा आनंद युवक घेत असतात. पण, कधीकधी ही नदी जेवढी आनंददायी असते, तेवढीच दुःखद घटना घडतात. तेव्हा लोकं या नदीला शिव्याश्राप देऊनच शांत होतात. अशीच एक दुर्घटना या नदीपात्रात घडली. त्यामुळे परिसरात दुःखाचे सावट पसरले आहे.
पोहायला गेलेला युवक परतलाच नाही
माढा तालुक्यातील सिना नदीपात्रात एका युवक पोहायला गेला. पोहत असताना तो गटांगल्या घालू लागला. वेळेवर त्याला मदत मिळाली नाही. खोल पाण्यात गेला. त्यामुळे एका युवकाचा या नदीपात्रात मृत्यू झाला. आदित्य विनायक पाटील असं या युवकाचं नाव आहे. युवकाचा अकाली निधन झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. माढा पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
मोटार सुरू करायला गेला तो आलाच नाही
अजिनाथ आप्पा धर्मे हे शेतकरी आहेत. शेतात पाणी देण्यासाठी मोटारपंपाचा वापर करावा लागतो. ते मोटार सुरू करण्यासाठी नदीवर गेले. पण, ते परत आले नाही. त्यामुळे घरचे चिंतेत पडले. त्यांनी शेताच्या परिसरात शोध घेतला. शेताला लागून नदी आहे. या नदीपात्रात बुडून त्यांचा मृत्यू झाल्याचं कळले. कुर्डुवाडी पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.
दोघांचा बुडून मृत्यू
अशाप्रकारे सोलापूर जिल्ह्यात दोघांचा बुडून मृत्यू झाला. एक युवक आणि दुसरा शेतकरी. अशा २ जणांचा बुडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. लव्हे नदी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या युवकाचा तसेच केवड येथे मोटार सुरु करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. आदित्य विनायक पाटील आणि अजिनाथ आप्पा धर्मे असं बुडून मृत्यू झालेल्या दोघांची नावे आहेत. माढा व कुर्डूवाडी पोलिसांत घटनेची नोंद झाली आहे.