Maharashtra Breaking News LIVE 26 September 2024 : हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात बुधवारी धमकीचा फोन

| Updated on: Sep 26, 2024 | 9:59 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 26 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 26 September 2024 : हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात बुधवारी धमकीचा फोन

मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागांना काल मुसळधार पावसाने झोडपून काढलं. मुंबईत काल संध्याकाळपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे अनेक सखल भागात पाणी साचलं होतं. मुंबईची लाईफलाइन म्हटली जाणारी रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. आज पहाटेपासून पावसाने विश्रांती घेतली आहे. मध्य रेल्वेची सेवा अजूनही सुरळीत झालेली नाही. काही मिनिटं उशिराने ट्रेन धावत आहेत. काल रात्रीपर्यंत सखल भागात जमा झालेलं पाणी आता ओसरलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आज पुण्यात होणाऱ्या सभेवरही पावसाच सावट आहे. काल मैदानात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. पर्यायी व्यवस्था म्हणून स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचाचा पर्याय ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्रात पुढच्या दोन महिन्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांचे दौरे वाढले आहेत. सभा, पत्रकार परिषदा, रणनिती आखणी, उमेदवार निश्चिती सुरु आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 26 Sep 2024 05:52 PM (IST)

    पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान रुग्णालयात दाखल

    पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांना नियमित आरोग्य तपासणीसाठी फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती ठीक आहे. मुख्यमंत्री कार्यालयाने ही माहिती दिली आहे.

  • 26 Sep 2024 05:37 PM (IST)

    काँग्रेसला जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा फुटीरतावादाला चालना द्यायची आहे- मुख्यमंत्री योगी

    जम्मू-काश्मीरमधील रामगढ येथे एका निवडणूक रॅलीला संबोधित करताना उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले की, मला राहुल गांधींना विचारायचे आहे की ते जम्मू-काश्मीरसाठी वेगळ्या ध्वजाच्या चर्चेला पाठिंबा देतील का? कलम 370 आणि 35A परत आणण्याच्या आणि जम्मू-काश्मीरला अशांतता आणि दहशतवादाच्या युगात ढकलण्याच्या नॅशनल कॉन्फरन्सच्या मागणीला राहुल गांधी समर्थन देतात का? फुटीरतावादाला प्रोत्साहन देण्याचे काँग्रेस समर्थन करते का?

  • 26 Sep 2024 05:25 PM (IST)

    दिल्ली महापालिकेची कारवाई 5 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली

    प्रचंड गदारोळानंतर दिल्ली महानगरपालिका सदरचे कामकाज 5 ऑक्टोबरपर्यंत स्थगित करण्यात आले आहे. याआधीही अनेक मुद्दे सभागृहात चर्चेसाठी ठेवण्यात आले होते. मात्र, गदारोळामुळे काहीही चर्चा होऊ शकली नाही. नंतर ही कारवाई 5 ऑक्टोबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली.

  • 26 Sep 2024 05:09 PM (IST)

    हिजबुल्लाहचा जोरदार हल्ला, इस्रायलच्या किरयत शमोना येथे अनेक स्फोट

    इस्रायल आणि हिजबुल्ला यांच्यातील युद्धाला वेग आला आहे. इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर आता हिजबुल्लाही जोरदार हल्ले करत आहेत. हिजबुल्लाहने एकाच वेळी इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्र डागली आहेत. यामध्ये किरयत श्मोनामध्ये अनेक स्फोटही झाले आहेत. हे सर्व रॉकेट दक्षिण लेबनॉनमधून डागले जात आहेत.

  • 26 Sep 2024 04:53 PM (IST)

    बुधवारी संध्याकाळी 5 वाजता धमकीचा फोन

    मुंबईतून मोठी बातमी समोर आली आहे. हाजी अली दर्गा ट्रस्टच्या कार्यालयात बुधवारी धमकीचा फोन आल्याचं समोर आलं आहे. दर्ग्यात बॉम्ब असून लवकरात लवकर दर्गा रिकामी करा, असं या धमकीच्या फोनद्वारे सांगण्यात आलं. बुधवारी संध्याकाळी 5 वाजता धमकीचा फोन आल्याची माहिती आहे. धमकीचा फोन करणाऱ्याने स्वत:चं नाव पवन असल्याचं सांगितलं. तसेच या पवनने शिवीगाळ केल्याचं म्हटलं जात आहे.

  • 26 Sep 2024 04:36 PM (IST)

    शरद पवार यांना भेटण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सिलव्हर ओकवर

    शरद पवार यांना भेटण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे सिलव्हर ओक या निवासस्थानी पोहचले आहेत. भेटीमागचं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली जात आहे.

  • 26 Sep 2024 04:14 PM (IST)

    जेष्ठ नागरिकांच्या हस्ते मेट्रोचे उद्घाटन करण्याचा मविआ नेत्यांकडून इशारा

    पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. महाविकास आघाडी शुक्रवारी 27 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मेट्रोचे उदघाटन करणार आहे. जेष्ठ नागरिकांच्या हस्ते मेट्रोचे उदघाटन करण्याचा मविआ नेत्यांकडून इशारा देण्यात आला आहे. शिवाजीनगर ते स्वारगेट यां मेट्रो लाईनचे आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते उदघाटन होणार होते. मात्र पावसामुळे पंतप्रधानांचा दौरा रद्द झाला. त्यामुळे आता मविआचे नेते उदघाटनावरून आक्रमक झाले आहेत.

  • 26 Sep 2024 02:55 PM (IST)

    परतीच्या पावसामुळे धुळे तालुक्यात शेतीच मोठा नुकसान

    कापडणे, धमाने ,देवभाने परिसरात शेती पिकाचा नुकसान, पंचनामे करावे आणि मदत द्यावी शेतकऱ्यांची मागणी..

  • 26 Sep 2024 02:40 PM (IST)

    गुन्हेगारांना शासन निर्णय झाला पाहिजे- संजय राऊत

    विधानसभेत या विषयावर प्रश्न विचारले गेले आहेत की यावर चौकशी केली पाहिजे गुन्हेगारांना शासन निर्णय झाला पाहिजे. त्यानंतर कायदेशीर कारवाई करण्याबद्दल विधानसभेने आदेश कायदेशीर कारवाई करून शासनाला अभिप्राय सादर करा असं विधानसभेने सांगितलं होतं

  • 26 Sep 2024 02:29 PM (IST)

    संजय राऊत यांना अपिल करण्याचा अधिकार – वकील असीम सरोदे

    कायद्याचे सगळे मार्ग बंद होत नाही तोपर्यंत ही शिक्षा प्रत्यक्ष अस्तित्वात येणार नाही असे संजय राऊत निकाला प्रकरणी ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

  • 26 Sep 2024 02:23 PM (IST)

    पटेल यांचा पुतळा मजबूत बनवला, महाराजांचा का नाही – आदित्य ठाकरे

    भाजपने गुजरातमध्ये सरदार वल्लभभाईल पटेल यांचा पुतळा मजबूत बनवला पण महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा असा का बनवला ? असा सवाल आदित्य ठाकरे यांनी केला आहे

  • 26 Sep 2024 02:20 PM (IST)

    आमदार प्रताप सरनाईक यांच्याबद्दल संजय राऊत यांचे मोठे भाष्य

    आमदार प्रताप सरनाईक याच भाजपसोबत आहेत त्यांनी राज्य सरकारला एक पत्र लिहिलं होतं चौकशीची मागणी सुद्धा केली आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले

  • 26 Sep 2024 02:01 PM (IST)

    भ्रष्टाचार झाला असा आरोप मी केला नाही- संजय राऊत

    भ्रष्टाचार झाला असा आरोप मी केला नाही सगळ्यात आधी मीरा-भाईंदरचे विरुद्ध पक्ष नेते पाटील यांनी केला आहे.

  • 26 Sep 2024 02:00 PM (IST)

    वैभव नाईक यांचे अत्यंत मोठे विधान

    ज्यांनी पोलिसांवर दबाव आणलाय त्यांच्यावरच भ्रष्टाचाराचे आरोप आहेत.आपल्यावरील भ्रष्टाचाराचे आरोप दाबण्यासाठी माझ्यावर दबाव आणला जातोय.

  • 26 Sep 2024 01:57 PM (IST)

    पीएफसीला कर्ज मंजूर

    मुंबई महानगर प्रदेशाच्या (एमएमआर) विकासासाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला (एमएमआरडीए) मे. पॉवर फायनॅन्स कॉर्पोरेशनकडून (पीएफसी) मोठ्या कर्ज सुविधेसाठी मान्यता मिळाली आहे. या अंतर्गत ३१,६७३.७९ कोटी इतके कर्ज मंजूर करण्यात आले आहे.

  • 26 Sep 2024 01:41 PM (IST)

    वैभव नाईक यांना नोटीस

    राजकोट येथील किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला होता. त्यानंतर वैभव नाईक यांनी पत्रकार परिषद घेऊन भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. यासंदर्भात चार दिवसात पुरावे देण्याची नोटीस सिंधुदुर्ग पोलिसांनी आमदार नाईक यांना दिली आहे.

  • 26 Sep 2024 01:25 PM (IST)

    पोलिसांनी संजय राऊत यांना ताब्यात घेतले

    संजय राऊत यांनी किरीट सोमय्या परिवारची बदनामी केली होती. त्यावर त्यांना शिक्षा झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी संजय राऊतांना ताब्यात घेतले आहे, असे किरीट्ट सोमय्या यांनी म्हटले आहे.

  • 26 Sep 2024 01:07 PM (IST)

    धनगर आरक्षण विरोधात आदिवासी समाज आक्रमक

    धनगर आरक्षण विरोधात आदिवासी समाज आक्रमक झाला आहे. आदिवासी समाजात धनगर आरक्षण देऊ नये, अशी मागणी केली आहे. अक्राणी तहसील कार्यालयासमोर समस्त आदिवासी समाजाच्या वतीने धरणे आंदोलन त्यासाठी करण्यात आली.

  • 26 Sep 2024 01:01 PM (IST)

    अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या आमच्यासारख्या लोकांना न्याय कसा मिळणार? संजय राऊत

    ज्या देशाच्या सरन्यायाधीशांच्या घरी पंतप्रधान गणपतीत मोदक खायला जातात, तिथे आमच्यासारख्या अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या लोकांना न्याय कसा मिळणार? संजय राऊतांचा सवाल

  • 26 Sep 2024 12:52 PM (IST)

    अमरावती – अजित पवार यांना काळे झेंडे दाखवण्यात आले

    अजित पवार सध्या अमरावती दौऱ्यावर असून त्यावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांनी  जोरदार घोषणाबाजी केली, काळ झेंडेही दाखवण्यात आले. विविध मागण्यांसाठी आंदोलन केलं.

  • 26 Sep 2024 12:39 PM (IST)

    संजय राऊत यांच्या जामीनाची प्रक्रिया सुरू

    अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊतांना झालेल्या शिक्षेत जामीन घेण्याची प्रक्रिया सुरू. संजय राऊत सध्या कोर्टामध्ये जामीनाची प्रक्रिया पूर्ण करत आहेत.

    संजय राऊत यांच्याकडून बेलबाँड भरून घेतला जात असून त्यांना जामीनावर सोडण्यात येणार.

  • 26 Sep 2024 12:37 PM (IST)

    हसन मुश्रीफांनी पवार कुटंबासोबत असलेल्या नात्याचा सौदा केला – समरजित घाटगेंचा आरोप

    ईडीपासून सुटका करण्यासाठी आणि पालकमंत्रीपदासाठी हसन मुश्रीफांनी पवार कुटंबासोबत असलेल्या नात्याचा सौदा केला , अशा शब्दात समरजित घाटगेंनी घणाघाती हल्ला चढवला.

  • 26 Sep 2024 12:35 PM (IST)

    मालवण पुतळा दुर्घटना – चौकशी समितीने सादर केला 16 पानी अहवाल

    मालवणी येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी  चौकशी समितीने 16 पानी अहवाल सादर केला . पुतळ्या अंतर्गत गंज, कमकुवत फ्रेम , चुकीच्या वेल्डिंगच्या कामामुळे पुतळा कोसळला, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.

  • 26 Sep 2024 12:31 PM (IST)

    Akshay Shinde Encounter : चार्टशीट मिळविण्यासाठी आई-वडिलांच्या नावाने अर्ज दाखल

    अक्षय शिंदे गुन्हा प्रकरणी चार्टशीट मिळविण्यासाठी आई-वडिलांच्या नावाने कल्याण सत्र न्यायालयात अक्षय शिंदेच्या वकीलांनी चार्टशीटसाठी अर्ज दाखल केला आहे.

    अक्षयच्या मृत्यूनंतर चार्टशीटसाठी वकिलांनी अर्ज केला होता मात्र नातेवाईकांनाच चार्टशीट मिळणार असल्याचा निर्णय न्यायालयाने दिल्यानंतर अक्षयच्या वकिलाने आई-वडिलांच्या नावाने अर्ज दाखल करण्यात आला आहे.

  • 26 Sep 2024 12:18 PM (IST)

    पुण्याच्या खेड तालुक्यातील धुवाधार पाऊस, अनेक दुकानांमध्ये शिरले पाणी

    पुण्याच्या खेड तालुक्यातील पावसाची धुवाधार बॅटिंग सुरू आहे. पावसामुळे  राजगुरुनगर शहरातील अनेक दुकानामध्ये पाणी शिरले आहे.  तर काही ठिकाणी दुकानालगत पाणी भरल्याने दुकानदार चिंतेत आहेत.

    रस्त्यावर पाणीच पाणी नागरिकांना पाण्यातून मार्ग काढावा लागतोय

  • 26 Sep 2024 12:06 PM (IST)

    उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीत दाखल, विविध विकास कामांचे होणार भूमीपूजन

    उपमुख्यमंत्री अजित पवार अमरावतीत दाखल झाले असून अमरावती विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे अजित पवार यांच्या हस्ते भूमीपूजन होत आहे.

    त्यानंतर ते 200 खाटांच्या जिल्हा स्त्री सामान्य रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे लोकार्पण करतील. अम रावती शहरातील लालखडी परिसरात उड्डाणपूल तसेच रसत्याचे भूमिपूजन पार पडेल.

  • 26 Sep 2024 11:57 AM (IST)

    अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी

    अब्रुनुकसानीच्या खटल्यात संजय राऊत दोषी आढळले आहेत. मेधा किरीट सोमय्या यांनी खटला दाखल केला होता. संजय राऊतांना 15 दिवसांची कैद आणि 25 हजारांचा दंड ठोठावण्यात आला आहे.

  • 26 Sep 2024 11:50 AM (IST)

    बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे आईवडील कल्याण न्यायालयात दाखल

    बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचे आईवडील आणि त्याचे वकील अमित कटारनवरे कल्याण न्यायालयात दाखल झाले आहेत. काल रात्री बदलापूर पोलीस ठाण्यात दफनभूमीसाठी अर्ज केल्यानंतर आज न्यायालयात दाखल झाले आहेत. याआधी कल्याण न्यायालयामध्ये अक्षय शिंदे याची सुनावणी आणि चार्टशीटसंदर्भात संबंधित वकिलाशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

  • 26 Sep 2024 11:40 AM (IST)

    दिल्ली हायकोर्टात आज राहुल गांधींच्या नागरिकत्त्वाबाबत सुनावणी

    राहुल गांधींच्या नागरिकत्त्वाबाबत पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. राहुल गांधी भारतीय नसून विदेशी असल्याच्या याचिका दाखल झाल्या आहेत. राहुल गांधींकडे ब्रिटनचं नागरिकत्त्व असल्याचा दावा याचिकेत करण्यात आला आहे. दिल्ली हायकोर्टात आज राहुल गांधींच्या नागरिकत्त्वाबाबत सुनावणी होणार आहे.

  • 26 Sep 2024 11:30 AM (IST)

    तिरुपती प्रसाद वादावर सीपीआय खासदार काय म्हणाले?

    तिरुपती बालाजी मंदिरातील प्रसादाच्या वादावर सीपीआय खासदार पी. संदोष कुमार म्हणाले, “सर्व राजकीय पक्ष, मग ते वायएसआर असो किंवा काँग्रेस असो.. उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत भ्रष्टाचार आहे. मग तो देवाच्या नावावर असो किंवा रस्त्याच्या नावावर. वायएसआर काँग्रेस आणि टीडीपीमध्ये काही फरक नाही.”

  • 26 Sep 2024 11:20 AM (IST)

    राजकीय फायद्यासाठी चकमकी होत असतील तर ते चुकीचं- संजय राऊत

    बदलापूर प्रकरणातील अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरबद्दल शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, “बलात्कार करणाऱ्याला कडक शिक्षा झाली पाहिजे आणि न्याय जलद मिळाला पाहिजे. पण राजकीय फायद्यासाठी चकमकी होत असतील तर ते चुकीचं आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे या दोघांमध्ये स्पर्धा आहे. या चकमकीचं श्रेय घेण्यासाठी त्यांच्यात स्पर्धा आहे.”

  • 26 Sep 2024 11:10 AM (IST)

    तमिळनाडूचे माजी मंत्री सेंथील बालाजी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर

    तमिळनाडूचे माजी मंत्री सेंथील बालाजी यांना सर्वोच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर करण्यात आला आहे. 14 जून 2023 रोजी बालाजी यांना अटक झाली होती. ED कडून त्यांना अटक करण्यात आली होती.

  • 26 Sep 2024 10:58 AM (IST)

    उजनी धरणातून भीमा नदीत 31600 क्यूसेस विसर्ग सुरू

    उजनी धरणाच्या वरील साखळी मधील सर्व धरणं काठोकाठ भरली असून पुणे जिल्ह्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. भीमा नदी पात्रात दौंड बंधाऱ्यातून मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक देखील होतेय. उजनी धरण काटोकाट भरलं असल्यानं उजनी धरणातून भीमा नदी पात्रात 31 हजार 600 क्यसेक इतक्या दाबाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. उजनी धरणाचे 16 दरवाजे दोन फुटाने उचलण्यात आलेत.

  • 26 Sep 2024 10:50 AM (IST)

    मुसळधार पावसामुळे पूल गेला वाहून

    सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील आगळगाव परिसरात रात्रभर झालेल्या तुफान पावसामुळे धसपिंपळगावचा पूल वाहून गेला. पावसाची जोरदार बॅटिंग झाल्याने चांदणी नदीला पूर आला आहे. नदीला आलेल्या पुरामुळे नदीवरील पूल वाहून गेला आहे.

  • 26 Sep 2024 10:40 AM (IST)

    सोलापूर विमानतळाचे उद्धघाटन लांबणीवर?

    सोलापूरकरांची अनेक वर्षांची प्रतीक्षा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूर विमानतळाचे उद्घाटन होणार होते. पण मोदी यांचा दौरा मुसळधार पावसाच्या शक्यतेने रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे या विमानतळाचे उद्धघाटन लांबणीवर पडल्याची चर्चा सुरू आहे.

  • 26 Sep 2024 10:30 AM (IST)

    राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार अमरावतीत दाखल

    अमरावती विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उदघाटन करतील. काँग्रेस आमदार यांच्या अमरावती विधानसभा मतदार संघाच्या क्षेत्रातील विविध विकास कामाचे भुमीपूजन करण्यात येत आहे. अमरावती शहरातील जलशुद्धीकरण केंद्र तपोवन मधील वाढीव पाणी पुरवठा योजनाचे 865 कोटी रुपयांचा अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे.

  • 26 Sep 2024 10:20 AM (IST)

    मुंबईसह उपनगरातील शाळांना सुट्टी

    मुसळधार पावसामुळे मुंबईसह उपनगरातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज ही या परिसराला रेड अलर्ट दिल्याने खबरदारी म्हणून शाळांना सुट्टी देण्यात आली. ठाण्यातील शाळा पण आज बंद असतील.

  • 26 Sep 2024 10:10 AM (IST)

    परतीच्या पावसामुळे धुळे तालुक्यात शेतीच मोठा नुकसान

    गेल्या दोन दिवसापासून धुळे जिल्ह्यामध्ये विविध भागात परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान केलं आहे. कापडणे, धमाने ,देवभाने परिसरात शेती पिकाचे नुकसान झाले आहे. पंचनामे करावे आणि मदत द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

  • 26 Sep 2024 10:00 AM (IST)

    अमरावतीच्या काँग्रेस आमदार हातावर बांधणार घड्याळ?

    राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर असताना काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी लावले अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले आहे. त्यामुळे त्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे समोर आले आहे.

  • 26 Sep 2024 09:57 AM (IST)

    पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी

    पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज दिल्ली उच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. मागच्या सुनावणीवेळी पूजाने कोर्टाला सांगितल होत की ती AIMS रुग्णालयात तिच्या अपंगत्वाची तपासणी करण्यास तयार आहे.दिल्ली पोलिसांनी सुनावणीच्या आधी एक दिवस उच्च न्यायालयात नवीन स्टेटस रिपोर्ट दाखल केला होता. त्यात पूजाने UPSC ला सादर केलेल्या दोन अपंगत्व प्रमाणपत्रांपैकी एक बनावट असल्याचा दावा केला होता.

  • 26 Sep 2024 09:45 AM (IST)

    अक्षय शिंदेच्या दफनविधीसाठी जागा मिळेना

    बदलापूर पोलीस ठाण्यात मयत आरोपी अक्षय शिंदे यांच्या कुटुंबाने दफनासाठी जागा उपलब्ध करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. आरोपीच्या आई-वडिलांसह त्याचा भाऊही बदलापूर पोलीस ठाण्यात काल रात्री बारा ते एक वाजेच्या सुमारास अक्षय शिंदे याला दफन करण्यासाठी जागा लवकरात लवकर शोधून द्यावी असा अर्ज दिला आहे.

  • 26 Sep 2024 09:30 AM (IST)

    राहुल गांधी नागरिकत्वाबाबतच्या याचिकेवर आज सुनावणी

    विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत पुन्हा चर्चा होत आहे. इलाहाबाद हायकोर्टच्या लखनऊ खंडपीठाने गृहमंत्रालयाकडे स्पष्टीकरण मागितलं आहे. राहुल गांधी यांच्याकडे ब्रिटनच नागरिकत्व असल्याचा दावा आहे. याचिकेवर सुनावणी करताना लखनऊ खंडपीठाने स्पष्टीकरण मागितलं  आहे. दिल्ली हायकोर्टातही आज राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाबाबत सुनावणी होणार आहे. दोन्ही याचिकांमध्ये राहुल गांधी भारतीय नसून विदेशी असल्याचा दावा आहे.

  • 26 Sep 2024 09:15 AM (IST)

    अजित पवार यांचा अमरावती दौरा

    उपमुख्यमंत्री अजित पवार आज अमरावती दौऱ्यावर आहेत. काँग्रेसच्या आमदार सुलभा खोडके यांनी  अजित पवारांच्या स्वागताचे बॅनर लावले आहेत. अजित पवारांच्या बॅनरमुळे शहरात एकच चर्चा होत आहे. काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके ह्या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा दर्शवली होती. आता या बॅनर मुळे काँग्रेसचे आमदार सुलभा खोडके या अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश करणार असल्याचं निश्चित होत आहे. आमदार सुलभा खोडके यांच्या अमरावती विधानसभा मतदारसंघातील आज अनेक कामांच्या भूमिपूजनासाठी अजित पवार उपस्थित राहणार आहेत.

  • 26 Sep 2024 08:53 AM (IST)

    Maharashtra news : वसई-विरारमध्ये काय स्थिती?

    वसई विरारमध्ये आज सकाळपासून पावसाची विश्रांती. रात्री दोन तास पडलेल्या पावसाने वसई विरारमध्ये सर्वत्र झाले होते पाणीच पाणी. पाऊस थांबल्याने साचलेले पाणी ओसरले असून, सर्व सुरळीत सुरु आहे.

  • 26 Sep 2024 08:52 AM (IST)

    Maharashtra news : मोदींचा दौरा, मराठा कार्यकर्त्यांना नोटीसा

    मोदींच्या दौऱ्याला मराठा कार्यकर्त्यांचा विरोध होण्याची शक्यता. म्हणून पिंपरी चिंचवड आणि पुणे पोलिसांकडून खबरदारी. मराठा कार्यकर्त्यांना नोटीस द्यायला पोलिसांकडून सुरुवात. राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनावरुन विरोध होण्याची शक्यता.

  • 26 Sep 2024 08:40 AM (IST)

    Maharashtra News : अमित शाहंसोबतच्या बैठकीत काय ठरलं?

    अमित शहा सोबतच्या बैठकीत अनेक गुप्त खलबते. बैठकीत एकनाथ शिंदेंनी कोणताही आग्रह धरला नसल्याची माहिती. एकनाथ शिंदे किंवा अजित पवारांच्या आमदारांबद्दल कोणताही भेदभाव करणार नसल्याची अमित शाहंनी ग्वाही दिल्याची माहिती. विद्यमान आमदारांच्या जागा त्या त्या पक्षाला देण्यात येणार असल्याची माहिती, तर इतर ठिकाणी वातावरण बघून निर्णय घेण्याची चर्चा.

  • 26 Sep 2024 08:38 AM (IST)

    Maharashtra News : मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत

    मध्य रेल्वे आज पुन्हा विस्कळीत. कालच्या मुसळधार पावसाचा परिणाम कायम. कल्याणहून CSMT कडे जाणाऱ्या गाड्या 10 ते 20 मिनिटे उशिराने धावत आहेत. धिमी लोकल 5 ते 10 मिनिटे उशिराने; लांब पल्ल्याच्या गाड्यांमुळे जलद लोकल्स 10 ते 15 मिनिटे उशिराने. पहाटे कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांचे हाल. कल्याणसह अंबरनाथ बदलापूर व इतर स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी.

  • 26 Sep 2024 08:36 AM (IST)

    Maharashtra News : पुढचे दोन दिवस कोकणात पावसाचे

    पुढचे दोन दिवस कोकणात पावसाचे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र. त्या क्षेत्राचे ट्रफ उत्तर कोकण किनारपट्टीवर. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा आँरेज अलर्ट. शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता. तळकोकणापासून रत्नागिरी जिल्ह्यापर्यत सर्वत्र पाऊसधारा. रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी, रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यत 104 टक्के पाऊस. 3488 मिलिमिटर पावसाची आजपर्यत नोंद, पुढचे दोन दिवस पावसाचेच.

Published On - Sep 26,2024 8:35 AM

Follow us
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.