Maharashtra Breaking News LIVE 29 September 2024 : पुणे मेट्रोच्या प्रकल्पाचे नरेंद्र मोदी यांनी केले लोकार्पण

| Updated on: Sep 29, 2024 | 1:27 PM

Maharashtra Political News LIVE in Marathi : आज 29 सप्टेंबर 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News LIVE 29 September 2024 : पुणे मेट्रोच्या प्रकल्पाचे नरेंद्र मोदी यांनी केले लोकार्पण
Follow us on

LIVE NEWS & UPDATES

  • 29 Sep 2024 01:57 PM (IST)

    जुन्या कसारा घाटत बस दरीत कोसळताना बचावली बस

    मुंबई नाशिक महामार्गावर जुन्या कसारा घाटत बस दरीत कोसळताना बस बचावली. बसमधील सर्व प्रवासी सुखरूप आहेत. ही बस मुंबईहून संभाजी नगर येथे जात असताना महामार्गावरील कसारा घाटतील आंबा पाॅईट जवळ रस्ता खचला आहे. त्या ठिकाणी बस स्लीप झाली. नशीब चांगले होते म्हणून बस दरीत कोसळली नाही. ही बस क्रेनच्या सहाय्याने बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.

  • 29 Sep 2024 01:44 PM (IST)

    शिर्डीत साईबाबा मंदिरात कार्यक्रम

    आधी सुवर्ण कळस आणि नंतर मूर्ती असा इतिहास असलेल शिर्डीच साईबाबा मंदिराचा आहे. 29 सप्टेंबर 1952 रोजी साईबाबा मंदिरावर सुवर्ण कळसाचं रोहन करण्यात आले. पारनेर येथील डॉ. रामचंद्र महाराज यांच्या हस्ते हा सोहळा त्यावेळी पार पडला.


  • 29 Sep 2024 01:32 PM (IST)

    आरक्षण न दिल्यास महायुती सोडणार- मंत्री धर्मराव आत्राम यांचा इशारा

    महायुती सरकारमधील मंत्री धर्मराव आत्राम यांनी धनगर समाजाला आरक्षण दिल्यास मी महायुतीच्या सत्तेतून बाहेर पडणार आहे, अशी प्रतिक्रिया टीव्ही 9 ला दिली. आत्राम हे गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी विधानसभा क्षेत्रातील आमदार असून सध्या कॅबिनेट मंत्री आहेत.

  • 29 Sep 2024 01:16 PM (IST)

    जुन्या सरकारच्या जुन्या मानसिकतेला बदललं- मोदी

    आम्ही जुन्या सरकारच्या जुन्या मानसिकतेला बदललं. जुनी व्यवस्था बदलली. आम्ही स्वच्छ भारत योजना आणली. महिलांना त्याचा फायदा झाला. शाळेत शौचालये आणली गेली. त्यामुळे मुलींची शाळा सोडण्याचं प्रमाण कमी झालं, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील विविध विकास कामांचे भूमीपूजन करताना सांगितले.

  • 29 Sep 2024 01:02 PM (IST)

    मोदींची काँग्रेवर टीका

    जुने विचार आणि कार्यपद्धती असती तर ही कामे झालीच नसती. मागच्या सरकारला आठ वर्षात मेट्रोचा एक पिलरही उभा करता आला नाही. पण आमच्या सरकारने पुण्यात मेट्रोचं आधुनिक नेटवर्क तयार केलं आहे, असे नरेंद्र मोदी यांनी नाव न घेता सांगितले.


  • 29 Sep 2024 01:00 PM (IST)

    पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती- मोदी

    “पुण्याच्या कणाकणात राष्ट्रभक्ती आणि समाजभक्ती आहे. अशा पुण्यात येणं हे ऊर्जावान बनवणारं आहे. त्यामुळे पुण्याला येता न आल्याने माझं मोठं नुकसान झालंय. पण तंत्रज्ञानाच्या माध्यमातून तुमची भेट घेण्याची संधी मिळाली. पुण्याची धरती महान विभूतींची आहे. महाराष्ट्राच्या विकासाची नवी साक्षीदार होत आहे”, असं मोदी म्हणाले.

  • 29 Sep 2024 12:55 PM (IST)

    पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन उपस्थित

    पुणे मेट्रो उद्घाटन सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑनलाइन उपस्थित राहिले. यावेळी मराठीत भाषणाला सुरुवात करत ते म्हणाले, “पुण्यातील सर्व लाडक्या बहीण-भावांना माझा नमस्कार. पुण्यात येऊ शकलो नाही, यात माझं नुकसान आहे.”

  • 29 Sep 2024 12:50 PM (IST)

    बदलापूरच्या घटनेवरून मुख्यमंत्र्यांची प्रतिक्रिया

    “बदलापूरच्या घटनेवरून आधी म्हणायचे आरोपीला फाशी द्या. नंतर टीका करत होते. पोलिसांवर हल्ला केला असता तर विरोधक म्हटले असते पोलिसाकडे बंदूक आहेत त्या शोभेसाठी आहेत का? असं बोलून विरोधक डबल बोलता,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

  • 29 Sep 2024 12:40 PM (IST)

    नाशिकमध्ये रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर

    नाशिकमध्ये रोहित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर लागले आहेत. रोहित पवारांच्या वाढदिवसानिमित्त लावलेले बॅनर चर्चेत आले आहेत. भावी मुख्यमंत्री, खरा वादा रोहित दादा, असे बॅनर लावण्यात आले आहेत. रोहित पवारांच्या कार्यकर्त्यांकडून नाशिक शहरात बॅनरबाजी करण्यात आली.

  • 29 Sep 2024 12:30 PM (IST)

    कितीही संकटं आली तरी मोदीजी विकासकामांना ब्रेक देत नाहीत- एकनाथ शिंदे

    “गुरुवारी उद्घाटन कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं, पण पाऊस होता. लोकांना त्रास होऊ नये म्हणून मोदींनी कार्यक्रम पुढे ढकलला. कितीही संकटं आली तरी मोदीजी विकासकामांना ब्रेक देत नाहीत,” असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुणे मेट्रोच्या उद्घाटन सोहळ्यात म्हणाले.

  • 29 Sep 2024 12:20 PM (IST)

    पुणे मेट्रोचं काम अतिशय वेगात सुरू- फडणवीस

    “पुणे मेट्रोचं काम अतिशय वेगात सुरू आहे. पुणे शहरात कुठेही मेट्रोने जाता येईल, असा हा प्रकल्प आहे. सोलापुरातील नव्या विमानतळाचं उद्घाटन होतंय, याचा मला आनंद आहे,” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

  • 29 Sep 2024 12:10 PM (IST)

    मविआच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांची जोरदार टीका

    “पुणे मेट्रोचं उद्धाटन लांबलं म्हणून काहींनी छात्या बडवल्या. आधी स्वत: एखादा तरी खांब उभा करा, मग छात्या बडवा”, अशी जोरदार टीका
    मविआच्या आंदोलनावर देवेंद्र फडणवीसांनी केली.

  • 29 Sep 2024 12:10 PM (IST)

    हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाहच्या हत्येविरोधात जम्मू-काश्मीरमध्ये निषेध मोर्चा

    इस्रायल डिफेन्स फोर्सकडून (IDF) करण्यात आलेल्या हिजबुल्ला प्रमुख हसन नसराल्लाहच्या हत्येविरोधात जम्मू आणि काश्मीरमध्ये मोर्चा काढण्यात आला. जम्मू-काश्मीरच्या बडगाममध्ये हा निषेध मोर्चा काढण्यात आला.

  • 29 Sep 2024 11:58 AM (IST)

    पुणे मेट्रोवर अजित पवार काय म्हणाले?

    “26 तारखेला हा कार्यक्रम होणार होता. मात्र पाऊस झाला आणि पुणेकराना त्रास होऊ नये. मी तिकडे आल्यावर आणखी अडचण होऊ नये, म्हणून पंतप्रधान मोदींनी कार्यक्रम रद्द केला. विरोधकांना काही कामं राहिली नाहीत, त्यामुळे काही बोलतात. ही सगळी मेट्रो अंडरग्राउंड व्हावी असं अनिल शिरोळे यांना वाटत होतं. मात्र खर्च जास्त होतं होता. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत वाहतूक कोंडीचा प्रश्न मिटणार नाही” असं अजित पवार म्हणाले.

     

  • 29 Sep 2024 11:56 AM (IST)

    आम्ही हिंदू आहोत, पण…प्रणिती शिंदे

    “आम्ही हिंदू आहोत, मात्र धर्माच्या नावावर कधीही मत मागितलं नाही. मी कामाच्या जोरावर मते मागितली. धर्माच्या नावावर मतं मागितली नाही. कोणत्याही प्रकारची कट्टरता हा अतिरेक असतो. कोणत्याही धर्मात कट्टरता असली तरी तो अतिरेक असतो. लोकसभा निवडणुकीत यांचे लोक द्वेष पसरवत होते. ध्रुवीकरणाच्या रोगाला बळी पडू नका” असं खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या.

  • 29 Sep 2024 11:26 AM (IST)

    सर्व पाहिजे तर मलाच पाहिजे असं छगन भुजबळ सारखे नसावे – मनोज जरांगे पाटील

    “आरक्षण हा राजकीय किंवा वादाचा मुद्दा नाही. सर्व पाहिजे तर मलाच पाहिजे असं छगन भुजबळ सारखे नसावे. आरक्षण म्हणजे शत्रुत्व असा अजेंडा भुजबळ यांनी बांधला आहे. अमित शहा शिर्डी, नागपूरला आले त्यावेळी आम्ही बोललो होतो. अमित शाह आणि फडवणीस यांना मराठ्यांना आरक्षण द्यावे लागेल. धनगर आणि धनगड आदेश काढणार असाल तर मराठा आणि कुणबी एकाच आहेत तो आदेश निवडणुकी अगोदर काढावा” असं मनोज जरांगे पाटील म्हणाले.

  • 29 Sep 2024 11:21 AM (IST)

    हिंदू दहशतवादाच्या विधानावर सुशीलकुमार शिंदे बोलले

    हिंदू दहशतवाद या विधानावर सुशीलकुमार शिंदे यांचे स्पष्टीकरण. मी गृहमंत्री असताना जो रिपोर्ट माझ्याकडे आला तोच मी मांडला होता. मात्र काही लोक याबाबत चकाट्या पिटत बसतात. माझं त्यांना आवाहन आहे की, ‘माझ्याकडे या, बसा, मी तुम्हाला सांगतो नक्की काय होतं ते’

  • 29 Sep 2024 10:55 AM (IST)

    श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या जवळपास एक हजार वर्षांपूर्वीच्या दागिन्यांचे मूल्यांकन करण्यास सुरुवात

    इसवी सन 700 ते 1892 पर्यंतच्या श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या पुरातन अँटिक दागिन्यांचे मूल्यांकन करण्यास झाली सुरुवात… श्री विठ्ठल आणि रुक्मिणी मातेला असलेल्या जवळपास 350 अँटिक दागिन्यांचे मूल्यांकन आरबीआय मान्यता प्राप्त मूल्यांकनकार पुरुषोत्तम काळे यांच्याकडून केले जात आहे… मूल्यांकन झाल्यानंतर सुरक्षेच्या दृष्टीने या सर्व दागिन्यांचा विमा देखील उतरवला जाणार आहे…

  • 29 Sep 2024 10:48 AM (IST)

    सोलापुरात पद्मशाली समाजाच्या अधिवेशनाला सुरुवात

    अधिवेशनाला काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे, काँग्रेस नेते सुशीलकुमार शिंदे तसेच माकपचे माजी आमदार नरसय्या आडम आदी व्यासपीठावर उपस्थित

  • 29 Sep 2024 10:17 AM (IST)

    विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडी ऍक्टिव्ह मोडमध्ये

    विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडी ऍक्टिव्ह मोडमध्ये… उल्हासनगरमध्ये आज निर्धार मेळावा… महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकुर आणि प्रमुख नेते सुजात प्रकाश आंबेडकर यांची उपस्थिती… मेळाव्याआधी शहरभरात बॅनरबाजी करत शक्तिप्रदर्शन…

  • 29 Sep 2024 09:57 AM (IST)

    वंचितचा उल्हासनगरमध्ये निर्धार मेळावा

    विधानसभा निवडणुकीआधी वंचित बहुजन आघाडी अॅक्टिव्ह मोडवर आली आहे. आज उल्हासनगरमध्ये निर्धार मेळाव्याचे आयोजन करत मोठ्या संख्येत कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश होणार  आहे. मात्र जाहीर प्रवेश आणि मेळाव्या आधी उल्हासनगरमध्ये बॅनरबाजी करत वंचित बहुजन आघाडीने शक्तिप्रदर्शन केलं आहे.  वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर आणि प्रमुख नेते सुजात प्रकाश आंबेडकर या मेळाव्यात उपस्थित राहणार आहेत.

  • 29 Sep 2024 09:50 AM (IST)

    ‘ताडोबा’ 2 ऑक्टोबरपासून नियमितपणे सुरू होणार

    पावसामुळे मागील दोन महिन्यांपासून बंद असलेले ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटनासाठी 2 ऑक्टोबरपासून नियमितपणे सुरू होणार आहे. मात्र, ताडोबातील जिप्सी चालकांनी आपल्या प्रलंबित न्याय्य मागण्यांसाठी 1 ऑक्टोबरपासून बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पातील कोर क्षेत्रातील जिप्सीधारकांना 15 वर्षांची मुदतवाढ देण्यात यावी, ‘एक कुटुंब एक रोजगार’ हा नियम तत्काळ रद्द करावा या व इतर मागण्यांसाठी बेमुदत बंदचे हत्यार उपसले आहे.

  • 29 Sep 2024 09:40 AM (IST)

    सोलापूर विमानतळाचं आज ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूर विमानतळाचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्याआधी काँग्रेस आणि भाजपमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यात आरोप प्रत्यारोप सुरु आहेत.  काल खासदार प्रणिती शिंदे यांनी विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे.

  • 29 Sep 2024 09:27 AM (IST)

    हिंगोलीतील विपश्यना केंद्राचं आज भूमिपूजन

    हिंगोलीतील अंतरराष्ट्रीय दर्जाच्या विपश्यना केंद्राचा आज भुमिपूजन सोहळा पार पडणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे ही भूमिपूजन केलं जाणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू भीमरावजी आंबेडकर यांच्या हस्ते संपन्न भूमिपूजन सोहळा होणार आहे. कळमनुरी तालुक्यातील पार्डी-मोड शिवारात संपन्न भूमिपूजन सोहळा होणार आहे. कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्या पुढाकारातून भूमिपूजन सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी 251 बौद्ध भिक्खूंना चिवर दान आमदार संतोष बांगर करणार असल्याची माहिती आहे.

सोलापूर विमानतळाचं आज उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज सोलापूर विमानतळाचे ऑनलाइन पद्धतीने उद्घाटन होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज शिवाजीनगर ते स्वारगेट या मेट्रो मार्गीकेचं देखील ऑनलाईन उद्घाटन आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे ही भूमिपूजन जाणार केलं जाणार आहे. यासोबतच देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.