अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल ही आशा, उद्धव ठाकरे यांचा टोला; शिंदेंना म्हणाले, तुम्हाला त्यांच्या हाताखाली…

उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हा निकाल अकालनीय असल्याचं त्यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठं यश मिळाले असून महाविकासआघाडीचा पराभव झाला आहे.

अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल ही आशा, उद्धव ठाकरे यांचा टोला; शिंदेंना म्हणाले, तुम्हाला त्यांच्या हाताखाली...
Follow us
| Updated on: Nov 23, 2024 | 6:53 PM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली. उद्धव ठाकरे म्हणाले की, ‘तूर्त मी महाराष्ट्रातील जनतेला सांगतो निराश होऊ नका. खचून जाऊ नका. काही लोकांचं म्हणणं आहे हा ईव्हीएमचा विजय आहे. असूही शकतो. पण जनतेला निकाल मान्य असेल तर कुणालाच काही बोलण्याची गरज नाही. पण मान्य नसेल तर आम्ही प्राणपणाने लढत राहू, महाराष्ट्राच्या हितासाठी काम करत राहू. मी वचन देतो आम्ही तुमच्यासोबत आहोत.’

‘लाडकी बहीणचा इम्पॅक्ट असेल तर बाकीच्या गोष्टी उघड होत्या. सोयाबीनला भाव नाही. कापूस खरेदी नाही, महिला असुरक्षित आहेl, या असंख्य गोष्टी आहे. लाडकी बहीण पेक्षा आमच्यासभेला येणाऱ्या महिलांना घर कसं चालवायचं हा प्रश्न होता. महागाई वाढतेय म्हणून मतदान केलं का. हा टोमणा नाही. या वेळी तरी अस्सल भाजपचा मुख्यमंत्री होईल अशी आशा आहे. महाराष्ट्र विकास आघाडी फार प्रामाणिक वागली हे चुकलं की काय असं वाटतं.’

‘२८८ पैकी मोजलेल्या जागा किती आहेत. या जागा किती आहेत. अशाच काही जागा त्यांच्याकडे आहेत. अशी लाट उसळली असं काय काम त्यांनी केलं. ते जिंकले आहेत. पण त्यांचं अभिनंदन करण्यात कद्रूपणा करायचा नाही. मी त्यांचं अभिनंदन करतो. आता निवडणूक आयोगाने स्थगिती दिलेली लाडकी बहीण योजना पूर्ववत करून त्यात २१०० रुपये दर महिन्याला द्यावी, त्यांनी जी आश्वासने दिली ती पूर्ण करावी. निवडणुकीत असा जुमला करावा लागतो असं बोलू नये. त्यांनी शेतकऱ्यांना कर्जमुक्त करावं.’

कोरोना काळात कुटुंबप्रमुखांप्रमाणे माझं ऐकणारा महाराष्ट्र असं वागेल असं वाटत नाहीये. कारण मी जे जे सांगत आलो त्याच तळमळीने मी महाराष्ट्राला मनापासून सांगितलं होतं. महाराष्ट्र असा वागेल असं काही वाटत नाही. काही तरी यात गडबड आहे. काही गोष्टी सेक्युलर असतात. बेकारी आहे, महागाई आहे. सर्वांनाच या गोष्टी सतावत असतात. असे ही उद्धव ठाकरे म्हणाले.

Non Stop LIVE Update
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम
बाप.. बाप होता है, विजयानंतर काय म्हणाले धर्मरावबाबा आत्राम.
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?
साकोलीत नाना पटोले यांचा कसाबसा निसटता विजय, पाहा काय घडले?.
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा
वसईतून भाजपाच्या स्नेहा दुबे विजयी, काय म्हणाल्या...पाहा.
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?
'या' दिग्गज नेत्यांचा दारूण पराभव, कोणाच्या जिव्हारी लागला निकाल?.
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण...
..अन् मुसंडी, भाजप-महायुतीच्या यशाचं क्रेडिट फक्त फडणवीसांना कारण....
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी
माहिममध्ये अमित ठाकरे,सदा सरवणकर पराभूत; ठाकरे गटाच्या उमेदवाराची बाजी.
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'
भावानं परळीचा गड राखला... धनंजय मुंडे म्हणाले, 'माझी बहीण पंकजा...'.
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री
महायुतीच्या विजयनानंतर एकनाथ शिंदे म्हणाले, ही तर लँडस्लाईड व्हिक्ट्री.
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्...
फडणवीस CM होणार? सलग तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या चाणाक्यावर मात अन्....
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर...
कणकवलीत भाजपचा जल्लोष, निलेश राणे म्हणाले, आता अल्लाहू अकबर नाही तर....