विदर्भ ठरवणार नवं सरकार, शाहांनी दिलं भाजपला मिशन 45 चं टार्गेट

काँग्रेसनंतर विदर्भासाठी भाजपनंही जोरदार तयारी केली आहे. मिशन 45 चा नारा देत अमित शाहा यांनी भाजप समर्थकांना विजयाचा विश्वास दिला आहे. त्यावरचा हा एक खास रिपोर्ट

विदर्भ ठरवणार नवं सरकार, शाहांनी दिलं भाजपला मिशन 45 चं टार्गेट
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 10:40 PM

विदर्भात अमित शाहांनी भाजपला मिशन 45 चं टार्गेट दिलं आहे. जी जागा विदर्भात भाजप गमावेल, ती जागा काँग्रेसच्या खात्यात जाईल. त्यामुळे छोटं लक्ष्य न ठेवता 45 चा नारा अमित शाहा यांनी दिला आहे. यावर विजय वडेट्टीवार म्हणाले की, विदर्भ भाजपच्या हातून गेलाय, मोदी शहा जोडीने कितीही प्रयत्न केले तर काँग्रेस 45 जागा जिंकेल. मोदी शहा जितके वेळ विदर्भात येतील तितके भाजपचे नुकसान होईल. मोदी जिथे गेले तिथे भाजपचं नुकसान झालं नशीब ते नागपूरला नाही आले नाही तर गडकरी हरले असते. मोदी शहा जेव्हा येतात तेव्हा गडकरी गायब असतात भाजपचे पाय खोलात गेले ते आता बाहेर काढू शकत नाही.

भाजपसाठी 2014 च्या विजयात विदर्भाचा मोठा वाटा होता. 62 पैकी 44 जागांवर भाजप जिंकली होती., तर काँग्रेस-राष्ट्रवादी मिळून फक्त 11 जागी विजयी झाले होते. 2019 ला मात्र भाजपला फटका बसून 44 वरुन भाजप 29 वर आली., तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा आकडा 21 वर गेला. विभागनिहाय निकाल बघितल्यास विधानसभेच्या 70 इतक्या सर्वाधिक जागा पश्चिम महाराष्ट्रात आहेत. त्यानंतर विदर्भात 62, मराठवाड्यात 46, ठाणे-कोकण मिळून 39, मुंबईत 36 आणि उत्तर महाराष्ट्रातून 35 आमदार निवडून येतात.

मविआला रोखायचं असेल तर अमित शाहांनी महाराष्ट्र भाजपला एक मंत्र दिला आहे. शाहा म्हणाले की, महाराष्ट्रात भाजपचं पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची मूळ कमकुवत करा. शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या पक्षाच्या बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडा बाहेरच्या लोकांना घेतल्यास आपलं स्थान कमी होईल असं होणार नाही. गेली दहा पंधरा वर्ष भाजपशी जोडले गेलेल्या पदाधिकाऱ्यांना भाजपनं काही दिलं नाही.

फोडफोडडीचं राजकारण योग्य नाही. जनतेच्या मनावर राज्य केलं पाहिजे. ते जमत नसलं की फोडफोडी केली जाते. भाजप कधीकाळी महाराष्ट्रात 10 जागा लढत होती ती आता 160 जागा लढत आहे. हा संभ्रम दूर करण्यासाठी घरोघरी जाऊन केलेलं काम आणि भविष्यात करायची कामे याची माहिती द्यावी लागणार आहे. जनतेला महायुतीकडे परत आणण्याचं काम कार्यकर्त्यांना दिलं आहे.

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.