मनोरमा खेडकर यांना सिनेस्टाईल अटक, नंतर कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी, नेमका युक्तिवाद काय?

"आरोपी मनोरमा खेडकर या राजकीय प्रभावशील व्यक्ती आहेत. ते फिर्यादींवर दबाव आणू शकतात. तसेच इतर आरोपींना अटक करायची आहे. आरोपींची मुळशी तालुक्यात इतरही ठिकाणीदेखील मोठी जमीन आहे. त्या ठीकाणी त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले आहे का? याचा तपास करायचा आहे. त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी", अशी मागणी सरकारी वकिलांनी आज कोर्टात केली.

मनोरमा खेडकर यांना सिनेस्टाईल अटक, नंतर कोर्टात दोन्ही बाजूने जोरदार खडाजंगी, नेमका युक्तिवाद काय?
Follow us
| Updated on: Jul 18, 2024 | 6:33 PM

वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर या सध्या मोठ्या अडचणीत सापडल्या आहेत. मनोरमा खेडकर यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या व्हिडीओत मनोरमा शेतकऱ्यांना पिस्तूल दाखवत दमदाटी करत असल्याचं स्पष्ट होत आहे. या व्हिडीओवरुन पोलिसांत तक्रार देण्यात आली आहे. याच प्रकरणी मनोरमा खेडकर यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. संबंधित प्रकरण खरंतर एक वर्षांपूर्वीचं आहे. पण पूजा खेडकर यांच्या प्रकरणानंतर आता मनोरमा खेडकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला. यानंतर संबंधित शेतकऱ्यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीच्या आधारावर मनोरमा खेडकर यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी विविध पथकं तैनात केली होती. मनोरमा खेडकर या पोलिसांना सहज सापडत नव्हत्या. अखेर महाडमधील एका लाँजमधून त्यांना अटक करण्यात आली. अतिशय सिनेस्टाईल त्यांना अटक करण्यात आल्यानंतर त्यांना आज दुपारी कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी दोन्ही बाजूने जोरदार युक्तिवाद करण्यात आला. हा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर कोर्टाने मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

तपास अधिकारी काय म्हणाले?

“मनोरमा खेडकर यांना सकाळी सव्वा नऊ वाजता महाडमधून अटक केली आहे. पिस्तूल रिकवर करायची आहे. गुन्ह्यात वापरलेली लँड क्रुझर गाडी ताब्यात घ्यायची आहे. आरोपी प्रभावशील व्यक्ती आहे. त्यामुळे सात दिवसांची पोलीस कोठडी देण्यात यावी”, अशी मागणी तपास अधिकाऱ्यांनी केली.

सरकारी वकील काय म्हणाले?

“कलम वाढ केलेला अर्ज दाखल केला आहे. आरोपींची राजकीय पार्श्वभूमी आहे. सविस्तर तपास करावा लागेल. गरीब शेतकरी लोकांना न्याय द्यावा लागेल म्हणून कोठडी द्यावी. आरोपी राजकीय प्रभावशील व्यक्ती आहेत. ते फिर्यादींवर दबाव आणू शकतात. तसेच इतर आरोपींना अटक करायची आहे. आरोपींची मुळशी तालुक्यात इतरही ठिकाणीदेखील मोठी जमीन आहे. त्या ठीकाणी त्यांनी शेतकऱ्यांना धमकावले आहे का? याचा तपास करायचा आहे. त्यासाठी पोलीस कोठडी मिळावी”, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली.

आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद काय?

“आम्ही जमीन २००६ ला खरेदी केली आहे. पिस्तुलाचे लायसन्स आहे. आतापर्यंत आरोपींवर एकही गुन्हा नाही. कलम 307 काल अचानक ॲड करण्यात आले आहे. त्याआधीचे सर्व सेक्शन बेलेबल आहेत. आम्ही तपासात सहकार्य करु. मीडीया रिपोर्ट्स पाहुन एक वर्षाने तक्रार देण्यात आली आहे. एक वर्षाने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचे कारणही पोलीसांनी दिलेले नाही. एक वर्षापूर्वी खेडकर यांनी या प्रकरणी पौड पोलीस ठाण्याला अर्ज दिला आहे. त्यांचे म्हणणे दिले आहे. या प्रकरणी खेडकर यांच्या तक्रीवरुन फिर्यादी शेतकरी पंढरीनाथ पासलकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे. या गुन्ह्यात पोलिसांनी तपास करुन चार्जशीट दाखल केलं आहे. असं असताना एक वर्षाने पुन्हा त्याच घटनेत खेडकर यांना आरोपी करण्यात आले आहेत”, असा युक्तिवाद आरोपीच्या वकिलांनी केला.

पोलिसांनी खेडकर यांचा व्हायरल व्हिडीओ कोर्टात सादर केला

फिर्यादींवर मीडीया रिपोर्ट्स पाहुन व्हायरल व्हिडीओ पाहुन खेडकर यांच्या विरोधात तक्रार देण्याचे बळ आले. म्हणून त्यांनी एक वर्षाने तक्रार दिली. फिर्यादी पासलकर यांच्यावर दबाव होता म्हणून ते तक्रार देत नव्हते, असं सरकारी वकील म्हणाले. यावेळी पोलिसांनी खेडकर यांचा व्हायरल व्हिडीओ कोर्टात सादर केला. कोर्टाने दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर मनोरमा खेडकर यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Non Stop LIVE Update
आम्हाला या राखीची आण आहे...काही झाले तरी फडणवीस यांची गर्जना...
आम्हाला या राखीची आण आहे...काही झाले तरी फडणवीस यांची गर्जना....
काही लोकांचा शौक असा की माझा...काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
काही लोकांचा शौक असा की माझा...काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो...पहिली झलक तर पहा...
चिंचपोकळीच्या चिंतामणीचा विजय असो...पहिली झलक तर पहा....
मोदी साहेबांनी मोठ्या मनांनी...शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य
मोदी साहेबांनी मोठ्या मनांनी...शिंदे गटाच्या नेत्याचे खळबळजनक वक्तव्य.
इथून पुढे महापुरुषासंदर्भात असा प्रकार झाला...काय म्हणाले मनोज जरांगे
इथून पुढे महापुरुषासंदर्भात असा प्रकार झाला...काय म्हणाले मनोज जरांगे.
तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता
तानाजी सावंत यांनी मीडियाशी बोलणं टाळलं, आधी नको ते बोलून गेले अन् आता.
'दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची...', संजय राऊत या
'दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची...', संजय राऊत या.
‘फडणवीस आमचं शत्रू नाहीत, पण विरोधात जाल तर...’, जरांगेंचा घणाघात
‘फडणवीस आमचं शत्रू नाहीत, पण विरोधात जाल तर...’, जरांगेंचा घणाघात.
मोदींची जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर काय म्हणाले?
मोदींची जाहीर माफी, शिवरायांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेवर काय म्हणाले?.
'त्यांच्या पायावर शंभरवेळा डोकं ठेवायला तयार', शिंदे असं का म्हणाले?
'त्यांच्या पायावर शंभरवेळा डोकं ठेवायला तयार', शिंदे असं का म्हणाले?.