पेटी पडली आणि स्फोट झाला, पुलगावात नेमकं काय घडलं?

वर्धा : वर्ध्यातील पुलगाव लष्करी तळावर म्हणजेच देशातील सर्वात मोठ्या शस्त्र भांडारात भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण जखमी झाले आहेत. नेमकं काय घडलं? वर्ध्यातील पुलगाव लष्करी तळावर बॉम्ब निकामी करण्याचे केंद्र आहे. येथे दारुगोळा तळ सुद्धा आहे. तिथे काही मजूर बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु होते. …

, पेटी पडली आणि स्फोट झाला, पुलगावात नेमकं काय घडलं?

वर्धा : वर्ध्यातील पुलगाव लष्करी तळावर म्हणजेच देशातील सर्वात मोठ्या शस्त्र भांडारात भीषण स्फोट झाला. या स्फोटात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला, तर दहाहून अधिक जण जखमी झाले आहेत.

नेमकं काय घडलं?

वर्ध्यातील पुलगाव लष्करी तळावर बॉम्ब निकामी करण्याचे केंद्र आहे. येथे दारुगोळा तळ सुद्धा आहे. तिथे काही मजूर बॉम्ब निकामी करण्याचे काम सुरु होते. त्यावेळी बॉम्ब निकामी करताना स्फोटकांची पेटी हातातून पडली आणि भीषण स्फोट झाला. या स्फोटानंतर त्या ठिकाणी मोठी आग सुद्धा लागली.

मृतांचा आकडा वाढला!

या स्फोटात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला, त्यानंतर जखमींपैकी एकाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा आता 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 10 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीतीही व्यक्त केलेली आहे.

पुलगाव लष्करी तळावर याआधीही स्फोट

पुलगावच्या शस्त्र भांडारला हा पाचवा मोठा स्फोट असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. यापूर्वी १९८०, १९८९, १९९२ आणि २००१ मध्ये मोठे स्फोट झाले होते. त्यावेळीदेखील लोकांना गाव खाली करावे लागले होते. या स्फोटांमध्ये सोनेगाव, पिपरी, आगरगाव, लोणी, नाचणगाव अशी काही गावे खाली करावी लागली होती.

तसेच, दोन वर्षापूर्वी मे 2016 मध्येही इथे स्फोट होऊन 2 अधिकाऱ्यांसह 20 जण ठार झाले होते.  त्यावेळी बंकर फुटल्याने आजूबाजूचे गार्डस मृत्यूमुखी पडले होते.

पुलगाव शस्त्र भांडार नेमकं काय?

  • वर्ध्यातील पुलगाव हे देशातील सर्वात मोठं तर आशियातील दुसऱ्या क्रमाकांचं शस्त्र भांडार आहे
  • पुलगावात दारुगोळा बनवला जातोच, शिवाय मोठा शस्त्रसाठाही ठेवला जातो.
  • बॉम्ब, दारुगोळा अशी मोठी युद्ध सामुग्री इथं साठवली जाते
  • देशाच्या विविध ठिकाणी तयार झालेली स्फोटकं पुलगाव लष्करी तळावर साठवली जातात
  • पुलगावात जवळपास 200 अधिकारी आणि सुमारे 5 हजार स्थानिक कामगार काम करतात
  • पुलगावचा शस्त्रसाठा परिसर किंवा दारुगोळा भांडार हा 28 किमीचा परिसर आहे. त्यामुळे या परिसराला मोठं सुरक्षा कवच असतं.
  • या परिसरात जवानांशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जात नाही.
  • इथे शस्त्रसाठ्यासाठी अनेक बंकर केले जातात, यातील प्रत्येक बंकरमध्ये जवळपास 5 हजार किलोपर्यंतचा शस्त्रसाठा असतो.
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *