अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल

| Updated on: Jan 13, 2024 | 2:59 PM

मुकेश अंबानी यांच्या धाकटा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. त्याचा विवाह उद्योगपती वीरेन मर्चंट यांच्या मुलगी राधिका मर्चंट हिच्यासोबत होणार आहे. दोघांचा साखरपुडा आधीच पार पडला आहे. आता त्यांचे प्री वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.

अनंत अंबानी-राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग कार्ड सोशल मीडियावर व्हायरल
Follow us on

Anant Ambani Pre wedding : उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा अनंत अंबानी लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. राधिका मर्चंटसोबत त्याचा साखरपुडा पार पडला आहे. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी पुन्हा एकदा शहनाईचा सूर ऐकू येणार आहे. अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या यांच्या प्री-वेडिंग फंक्शन्सची आमंत्रण पत्रिका समोर आली आहे. अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग फंक्शनची पत्रिकासोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राधिका आणि अनंत अंबानी यांचा साखरपुडा अँटिलियामध्ये पार पडला होता.

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाआधीचं प्री-वेडिंग फंक्शन्स मार्च 2024 मध्ये सुरू होणार आहे. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचे प्री-वेडिंग फंक्शन्स 1 मार्च ते 3 मार्च 2024 या कालावधीत होणार आहेत. सोशल मीडियावर प्री-वेडिंग कार्ड व्हायरल होत आहे. कार्डमध्ये मुकेश आणि नीता यांच्या हाताने लिहिलेली चिठ्ठीही होती. या लग्नपत्रिकेत प्री-वेडिंग फंक्शन कुठे होणार हेही लिहिले आहे.

अनंत अंबानी-राधिकाचे प्री-वेडिंग कार्ड खास का आहे?

मुकेश अंबानी यांचं मूळ गाव जामनगरमध्ये अनंत आणि राधिका यांचं प्री-वेडिंग फंक्शन्स पार पडणार आहे. अनंत आणि राधिकाच्या लग्नाची पत्रिकेत त्याबाबत माहिती दिली गेली आहे. अनंत आणि राधिकाचे प्री-वेडिंग कार्ड खास आहे कारण त्यामध्ये तुम्हाला पृथ्वीवर राहणारे प्राणी आणि वनस्पतींची सुंदर झलक पाहायला मिळणार आहे. या कार्डमध्ये आणखी एक खास गोष्ट दिसली आणि ती म्हणजे नीता आणि मुकेश अंबानी यांचे प्रेम जे त्यांनी हाताने लिहिलेल्या चिठ्ठीतून दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

 

अंबानी कुटुंबातील धाकटी सून कोण आहे?

रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी यांची धाकटी सून सोशल मीडियावर लोकप्रिय आहे. अंबानी कुटुंबात धाकटी सून म्हणून प्रवेश करणारी राधिका ही उद्योगपती वीरेन मर्चंट आणि शैला मर्चंट यांची मुलगी आहे. राधिका मर्चंटचे वडील एनकोर हेल्थकेअरचे सीईओ आहेत आणि त्यांची गणना भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींमध्ये केली जाते. राधिका तिच्या वडिलांच्या एन्कोर हेल्थकेअरच्या संचालक मंडळावर आहे.