देशात मंकी पॉक्सचा रुग्ण आढळल्याने केंद्राच्या सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी

मंकी पॉक्स साथीच्या आजाराचा पहिला रुग्ण भारतातील चेन्नईत सापडला आहे.त्यांना मध्य पूर्वीतील देशातून प्रवास केल्याचे उघडकीस आले आहे. या आजाराचा विषाणू माकडापासून माणसात आल्याने ही साथ गंभीर असून या आजारावर अद्याप लस निर्माण झालेली नाही.

देशात मंकी पॉक्सचा रुग्ण आढळल्याने केंद्राच्या सर्व राज्यांना मार्गदर्शक सूचना जारी
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 10:57 PM

एवढे दिवस आफ्रीकन देशातून उत्पत्ती झालेला मंकी पॉक्स अर्थात एमपॉक्स आजाराचा भारतात रुग्ण आढळला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. मंकी पॉक्स आजाराचा संशयित रुग्ण चेन्नईत आढळला आहे. त्याला विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. हा आजार वेगाने प्रसारीत होत असल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना मार्गदर्शनपर सूचना जारी केल्या आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने मंकी पॉक्स साथीला इमर्जन्सी म्हणून जाहीर केलेले आहे. त्यातच आता केंद्र सरकारने देशातील सर्व राज्यांना काळजी घेण्याचे आदेश दिले आहेत.

सर्व राज्य सरकारांना मार्गदर्शक सूचना:

मंकी पॉक्सच्या संशयित रुग्णांचे विलगीकरण करावे, सर्व राज्य सरकारांनी नागरिकांमध्ये मंकी पॉक्सविषयी जागरूकता वाढवावी, मंकी पॉक्सविषयीची माहिती,संसर्गाची माध्यमे याविषयी लोकांना जागरूक करावे, प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी राज्य आणि जिल्हास्तरावरील आरोग्य यंत्रणेची पाहणी करुन ती सुसज्ज करावी, रुग्णालयात मंकी पॉक्सचे रुग्ण तसेच संशयित यांच्या विलगीकरणाराच्या, त्याची ने-आण करण्याच्या सुविधा आहेत का?, याची खातरजमा करावी, संशयित रुग्णांचे नमुने विहित प्रयोगशाळांना पाठवण्यात यावेत तसेच पॉजिटीव्ह आढळणाऱ्या रुग्णांचे नमुने ICMR ला जेनोम सिक्वेन्सिंगसाठी पाठवले जावेत, सध्या देशभरात 36 प्रयोगशाळा आणि तीन PCR किट्सना तपासणीसाठी मान्यता देण्यात आलेली आहे.

हा आजार मंकी पॉक्स नावाच्या व्हायरसमुळे होतो. हा व्हायरस स्मॉल पॉक्स या आजाराला कारणीभूत असलेल्या (ज्याला आपण देवी म्हणतो ) व्हायरसच्या जात कुळीतलाच आहे. याच्या व्हायरसचा संसर्ग झाल्यावर शरीरावर चट्टे किंवा पुरळ येतात. एमपॉक्स हा चिकनपॉक्सशी संबंधित नाही. हा एमपॉक्स हा झुनॉटिक डिसीज आहे. हा प्राण्याशी मानवाचा संपर्क आल्याने पसरतो. मध्य आणि पश्चिम आफ्रीकी देशात याची  अधूनमधून येत असते. जागतिक आरोग्य संघटनेने  मंकीपॉक्सची इमर्जन्सी घोषीत केल्यानंतर तीन आठवड्या्नंतर भारतात  एमपॉक्स रुग्ण सापडला आहे. या आजारावर लस उपलब्ध नाही. तसेच हा आजार जरी प्राण्यापासून होत असला तरी नंतर तो माणसापासून माणसात पसरत असल्याने खळबळ उडाली आहे.

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.