Pravasi Gujarati Parv 2024 : स्वातंत्र्य काळात गांधी, पटेल तसेच आज मोदी-शाह; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचं मोठं विधान

आपण आधीही प्रवासी गुजराती पर्वाचं आयोजन केलं होतं. आता दुसऱ्यांदा हा सोहळा पार पडतोय. हा सोहळा आपल्याला यशस्वी करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात पुढे जायचे आहे, असं गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले. प्रवासी गुजरात पर्व हा देश आणि विदेशातील महान गुजरातींसाठी मोठी पर्वणी आहे. तसेच त्यांच्यासाठी हे सर्वात मोठं व्यासपीठ आहे. या सोहळ्यात जगातील नामवंत व्यक्ती भाग घेत आहेत. दिग्गज गुजराती एका छताखाली येत आहे.

Pravasi Gujarati Parv 2024 : स्वातंत्र्य काळात गांधी, पटेल तसेच आज मोदी-शाह; मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांचं मोठं विधान
cm bhupendra patelImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Feb 10, 2024 | 12:36 PM

अहमदाबाद | 10 फेब्रुवारी 2024 : टीव्ही9 नेटवर्क आणि असोसिएशन ऑफ इंडियन अमेरिकन्स इन नॉर्थ अमेरिका (AIANA)ने अहमदाबादमध्ये प्रवासी गुजराती पर्वाचं आयोजन केलं आहे. या पर्वानिमित्ताने देशच नव्हे तर जगभरातील नामांकित आणि विविध क्षेत्रातील गुजराती लोक एवटले आहेत. जगभरात विखुरलेले गुजराती लोक पुन्हा एकदा एकाच छताखाली एकत्र आले असून या पर्वाला जल्लोषात सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्या भाषणाने या मुख्य सोहळ्याची सुरुवात झाली. यावेळी मुख्यमंत्री पटेल यांनी टीव्ही9 नेटवर्कचं तोंडभरून कौतुक केलं. तसेच सक्सेसफूल गुजराती हस्तींना एकाच छताखाली आणल्याबद्दल आभारही मानले. तसेच स्वातंत्र्याच्या काळात जसे सरदार पटेल आणि महात्मा गांधी या दोन गुजराती नेत्यांनी देशाला योगदान दिलं, तसंच योगदान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह हे दोन्ही गुजराती नेते देत आहेत, असं मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले.

स्वातंत्र्य काळात दोन गुजराती सरदार पटेल आणि महात्मा गांधी यांनी देशाला मोठं योगदान दिलं. त्यांनी गुजरातचीही शान वाढवली. स्वातंत्र्य काळात जसे पटेल आणि गांधी होते, तसेच आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह आहेत. हे दोन्ही नेतेही देश आणि गुजरातचा लौकीक वाढवत आहेत. आज आपण सर्व एकत्र आलो आहोत, हे त्यांच्या मेहनतीचंच फळ आहे. भारताचा विकास करणं हे महाकठिण काम असल्याचं पूर्वी वाटत होतं. पण एका व्यक्तीने गेल्या 10 वर्षात प्रचंड कामे करून हा समज खोटा ठरवलाच, पण देशाचा गौरवही वाढवला. आता परदेशात जायचं असेल आणि व्हिसा कार्यालयातून पासपोर्ट मिळाला तर पूर्वीपेक्षा आता प्रचंड अभिमान वाटतो. राम मंदिर उभारून देशाचा पुन्हा एकदा गौरव वाढवण्यात आला आहे, असं मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल म्हणाले.

कुणावर अवलंबून नाही हे दाखवलं

आपण जी-20 मधून वसुधैव कुटुंबकमची संस्कृती देशभरात प्रस्थापित करू शकलो आहे. कोरोनाकाळात आपण कुणावर अवलंबून नाही आणि कुणाच्या मार्गावर जाण्याची गरज नाही, हे भारताने दाखवून दिलं आहे. आपणच आपली कोरोनावर मात करणारी लस शोधून काढली. आपला भारत आत्मनिर्भर बनला आहे, असंही मुख्यमंत्री पटेल म्हणाले.

प्रभू रामचंद्रही तसेच आतूर होते

तुम्ही आता जसे भारतात यायला आतूर आहात, तसेच प्रभू राम जेव्हा श्रीलंकेत गेले होते, तेव्हा तेही तुमच्यासारखेच भारतात यायला आतूर झाले होते. विदेशातून येणाऱ्या भारतीयांच्या मनात आजही तिच भावना असते. आपली जन्मभूमी, आपली मातृभूमीवरील निस्सीम प्रेम परदेशातून आलेल्या या भारतीयांमध्ये ठासून भरेललं असल्याचं पाहायला मिळत आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.

मोदींचं व्हिजन स्पष्ट

आता गुजरातमध्ये जे काही होतंय ते वर्ल्ड क्लासच होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं व्हिजन स्पष्ट आहे. आज देश आणि विदेशातील लोक गुजरातमध्ये रणोत्सवाला येतात. 2006मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छमध्ये रण उत्सव सुरू केला. तेव्हापासून देशविदेशातील लोक या उत्सवात सामील होत आहेत. कच्छला त्यामुळे नवी ओळख मिळाली आहे. मोदींच्या व्हिजनमुळेच हे शक्य झाल्याचंही त्यांनी सांगितलं.

शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे
शरणागतीपेक्षा अटक व्हायला हवी होती, कराड प्रकरणात काय म्हणाल्या सुळे.
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?
'आका' गुन्ह्याच्या बाहेर राहतील असे वाटत नाही, काय म्हणाले सुरेश धस?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा निषेध, राज्यातील २,२३९ ग्रामपंचायती बंद.
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी
सरकारी दबावाशिवाय वाल्मिक कराडची चौकशी करा, अनिल देशमुख यांची मागणी.
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस
'... त्याशिवाय या आकाचे अन्य गु्न्हे...,' काय म्हणाले सुरेश धस.
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे
कराड जर निर्दोष आहेत, तर मग पळाले का होते ? - खासदार बजरंग सोनवणे.
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य
राजकीय द्वेषापोटी माझे नाव गोवले जातेय, वाल्मिकी कराड याचे वक्तव्य.
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू
Heart Attack: क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका, जागीच झाला मृ्त्यू.
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा
'ओबीसींना नाहक टार्गेट करु नये, अन्यथा..,' तायवाडे यांनी दिला इशारा.
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी
पदांची पर्वा न करता कारवाई करा, बुलढाणा आक्रोश मोर्चात मागणी.