टॉयलेटमध्ये कप धुतले अन् त्यातूनच मंत्र्यांसह जिल्हाधिकाऱ्यांना चहा पाजला, Video व्हायरल
एक धक्कादायक घटना समोर आली आहे, एका कार्यक्रमामध्ये टॉयलेटच्या पाण्यानं धुतलेल्या कपात मंत्री आणि अनेक उच्चपदस्त अधिकाऱ्यांना चहा पाजण्यात आला, याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
राजस्थानमध्ये भजनलाल सरकारला सत्तेमध्ये येऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे. सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं जात आहे.यातीलच एक कार्यक्रम पाली जिल्ह्यातल्या एका महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला मंत्र्यांसह, जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त यासारखे मोठे अधिकारी उपस्थित होते. आता या कार्यक्रमातील एक व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे. ज्या कपांमधून मंत्री आणि त्यांच्यासोबत उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना चहा द्यायचा होता ते कप कॉलेजमधील टॉयलेटमध्ये खाली फर्शीवर ठेवून धुण्यात आल्याचं या व्हिडीओमधून दिसून येत आहे.मात्र या व्हिडीओबाबत अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाहीये.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ही घटना राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील आहे, पाली जिल्ह्यातल्या बांगड कॉलेजमध्ये सरकारला एक वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्त एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला प्रभारी मंत्री झाबरसिंह खर्रा यांच्यासह जिल्हाधिकारी एलएन मंत्री आणि आयजी प्रदीप मोहन शर्मा, एसपी चूनाराम जाट यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधींची उपस्थिती होती. गेल्या वर्षभरात सरकारनं कोणती विकास कामं केली? याची माहिती देण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात उपस्थित पाहुण्यांना ज्या कपातून चहा देण्यात येणार होता ते कप टॉयलेटच्या पाण्यानं धुतल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
कॉलेज के टॉयलेट में कप धोया, फिर उसी में मंत्री-कलेक्टर और IG को पिला दी चाय; Video वायरल
यहां पढ़ें पूरी खबर 🔗 https://t.co/G03vn4UWtn #Rajasthan #TV9Card #PaliNews pic.twitter.com/HmyDEQ0zas
— TV9 Bharatvarsh (@TV9Bharatvarsh) December 13, 2024
या कार्यक्रमामध्ये मंत्री झाबरसिंह खर्रा यांनी सरकारच्या कामांची माहिती जनतेला दिली, याच कार्यक्रमातील हा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये कप टॉयलेटमध्ये धुतले जात असल्याचं स्पष्ट दिसून येत आहे. स्थानिकांकडून हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे. मात्र हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर देखील अद्यापही यावर कोणकडूनही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाहीये.