दिराला I Love you म्हण आणि… दीदीचं ऐकलं नाही; छोट्या बहिणीचं काय झालं?

उत्तर प्रदेशातील नोएडा येथे एक धक्कादायक प्रकरण घडलं आहे. सख्खी बहीणच दुसऱ्या बहिणीच्या जीवावर उठल्याचं आढळून आलं आहे. माझ्या दिराला आय लव यू म्हण नाही तर.... अशी धमकीच मोठ्या बहिणीने छोट्या बहिणीला दिली आहे. त्यामुळे हे प्रकरण पोलिसांत गेलं आहे. विशेष म्हणजे ही छोटी बहीण...

दिराला I Love you म्हण आणि... दीदीचं ऐकलं नाही; छोट्या बहिणीचं काय झालं?
दीदीचं ऐकलं नाही; छोट्या बहिणीचं काय झालं?
Follow us
| Updated on: Sep 26, 2024 | 3:28 PM

साहेब, माझ्या दीदीच्या विरोधात एफआयआर दाखल करून घ्या हो… पोलीस ठाण्यात पोहोचलेल्या एका तरुणीची ही केविलवाणी विनंती होती. तिने तिच्या मोठ्या बहिणीवर गंभीर आरोप केले आहेत. मोठी बहीण आपल्याला जीवे मारण्याची धमकी देत आहे, असा या मुलीचा आरोप होता. कारण काय तर या मुलीने बहिणीच्या दिरासोबत लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे मोठी बहीण छोट्या बहिणीच्या जीवावर उठली. तिला जीवे मारण्याच्या धमक्या सुरू झाल्या. म्हणूनच ही तरुणी थेट पोलीस ठाण्यात आली आणि पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेण्याची गयावया करू लागली.

उत्तर प्रदेशातील नोएडा येथील सेक्टर-63 येथील हे प्रकरण आहे. बुधवारी संध्याकाळी एक तरुणी पोलीस ठाण्यात आली. तिने पोलिसांना तक्रार दिली. आपण मूळचे कन्नौज जिल्ह्यातील असल्याचं तिने सांगितलं. वडिलांच्या निधनानंतर मी आणि माझी आई एकटे पडलो. वडील वारल्यामुळे लग्न झालेल्या बहिणीने मला तिच्याकडे राहायला बोलावलं. आम्ही मायलेकी मोठ्या बहिणीकडे राहायला आलो, ही तरुणी सांगत होती.

मोठी बहीण तिचं लग्न दिराशी लावून देण्याचा प्रयत्न करत असल्याचा या मुलीचा आरोप आहे. माझं कन्नौज येथील एका तरुणावर प्रेम आहे. आम्ही दोन्ही कुटुंबाला न सांगता लग्नही केलं आहे. मला पदवीच्या पुढचंही शिक्षण घ्यायचं आहे. मला माझ्या नवऱ्याने त्याची परवानगीही दिली आहे. काही दिवसांपूर्वी तो नोएडाला येऊन गेला. आता आम्ही दोघं सोबत राहत आहोत. पण मोठ्या बहिणीच्या मनात काही वेगळंच आहे, असं तिचं म्हणणं आहे.

माझं लग्न झालंय

दीदीचा दीर मजदूरी करतो. तरीही ती माझं लग्न त्याच्यासोबत लावू इच्छिते. त्यामुळे मी अत्यंत त्रस्त झाले आहे. मी ही गोष्ट माझ्या नवऱ्याला सांगितली. त्यानंतर मी मोबाईल नंबरही बदलला. बहिणीने मला फोन करून त्रास देऊ नये म्हणून मी हे केलं. पण बहिणीने माझा नंबर शोधलाच. आता ती मला जीवे मारण्याची धमकी देत आहे. दीरासोबत लग्न केलं नाही तर जीवे मारेन असं ती म्हणत आहे, असा आरोप या तरुणीने केला आहे.

वारंवार आय लव यू म्हणायचा

मी आधीपासूनच विवाहित आहे. मी बहिणीला माझ्या लग्नाची गोष्ट सांगितली. पण बहीण माझं लग्न स्वीकारायला तयार नाही. जेव्हा बहीण घरी असायची तेव्हा तिचा दीर मला वारंवार आय लव यू म्हणायचा. मी बहिणीला सांगून त्याचा हा फाजिलपणा रोखायला सांगितला. तेव्हा बहिणीने मला साथ दिली नाही. उलट मीही दीराला आय लव यू म्हणावं असा अजब सल्ला तिने मला दिला, अशी व्यथाही तिने मांडलीय.

पोलीस काय म्हणाले?

पोलिसांनी या प्रकरणावर भाष्य केलं आहे. आम्ही मुलीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे. तिच्या मोठ्या बहिणीची चौकशी केली जाईल. मुलीने केलेले आरोप खरे ठरले तर या मुलीच्या बहिणीच्या विरोधात कठोर कारवाई करू, असं पोलिसांनी सांगितलं.

बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन
बंदी झुगारत कर्जत-जामखेड SRPF केंद्राचं रोहित पवार यांनी केलं उद्घाटन.
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?
'शिवरायाचा पुतळा प्रकरणात तिसऱ्या आरोपीपर्यंत... ,' काय म्हणाले नाईक ?.
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन
हेही नको आणि तेही नको, नवा विचार घेऊन परिवर्तन महाशक्ती आघाडी स्थापन.
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले
मुंबईत काल सरकारचा एकही प्रतिनिधी रस्त्यावर नव्हता, आदित्य बरसले.
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु
कोकणातील तीन विधानसभा जागांवरुन महाविकास आघाडीत रस्सीखेच सुरु.
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट
राऊत यांच्यात हिंमत असेल तर सुप्रीम कोर्टात जाऊन...काय म्हणाले किरीट.
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत
त्यांनी 15 वर्षांची शिक्षा ठोठावली तरी मी थांबणार नाही - संजय राऊत.
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा
खासदार संजय राऊत यांना मानहानी प्रकरणात कोर्टाने सुनावली शिक्षा.
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?
बच्चू कडू यांचं मंत्रालयासमोर भर पावसात आंदोलन, मागण्या नेमक्या काय?.
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी
मुंबईत धुव्वाधार, रेड अलर्ट अन् मुसळधार पावसामुळे सर्व शाळांना सुट्टी.