Indian Navy rescues hijacked vessels | सध्या भारतीय नौदल लाल समुद्र क्षेत्रात आपला पराक्रम दाखवत आहे. 29 जानेवारीला समुद्री डाकूंपासून इराणी, पाकिस्तानी नागरिकांना वाचवण्यासाठी स्पेशल ऑपरेशन करण्यात आलं. लाल सागर जागतिक व्यापाराच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण आहे. सध्या इथे समुद्री डाकूंकडून सातत्याने हल्ले होत आहेत. सोमालियन समुद्री डाकू व्यापारी जहाजांना लक्ष्य करत आहेत. हौथी बंडखोर मिसाइल्स डागून जहाजांना टार्गेट करत आहेत. अशा धोक्यांचा सामना करण्यासाठी भारत सरकारने आपल्या नौदलाला या भागात तैनात केलं आहे. भारतीय नौदलाने लाल सागर क्षेत्रात 10 पेक्षा अधिक वॉर शिप, ड्रोन्स आणि टेहळणी विमान तैनात केली आहेत.
मागच्या 36 तासात भारतीय नौदलाने दोन यशस्वी रेसक्यु ऑपरेशन्स केली आहेत. INS सुमित्रा युद्धनौकेने मासे पकडणाऱ्या ‘अल नेमी’ जहाजाला वाचवलं. समुद्री डाकूंनी या बोटीच अपहरण केलं होतं. मरीन कमांडो फोर्सने (MARCOS) कोच्चीच्या किनाऱ्यापासून जवळपास 800 मैल अंतरावर एक स्पेशल ऑपरेशन केलं. यात 19 पाकिस्तानी नागरिकांना वाचवलं.
भारतीय नौदलाने लगेच Action घेतली
INS सुमित्रानेच 28 जानेवारीला इराणच्या मासे पकडणाऱ्या ‘ईमान’ जहाजाने पाठवलेल्या संदेशाला प्रतिसाद दिला होता. जहाजाच समुद्री डाकूंनी अपहरण केलं होतं. चालक दलाला बंधक बनवण्यात आलं होतं. INS सुमित्रावरील भारतीय नौदलाने लगेच Action घेतली. मार्कोस कमांडोंनी समुद्री डाकूंना धडा शिकवत 17 इराणी नागरिकांना वाचवलं.
In a coordinated multilateral response to the hijacking of a #SriLankan fishing vessel, the #IndianNavy in collaboration with @SeyDefence & @srilanka_navy successfully intercepted & rescued the hijacked vessel.
Sri Lankan flagged multi-day fishing trawler #LorenzoPutha04, 955 nm… pic.twitter.com/vzQHyntaIw
— SpokespersonNavy (@indiannavy) January 30, 2024
भारतीय कमांडोज थेट जहाजावर उतरले
मार्कोस हे भारतीय नौदलाच एलिट कमांडो युनिट आहे. समुद्रमार्गे होणाऱ्या हल्ल्याला जशास तस उत्तर देण्यासाठी भारतीय नौदलाने 90 च्या दशकात मार्कोस कमांडो युनिटची स्थापना केली. मार्कोस कमांडोजनी वेळोवेळी आपली शक्ती आणि पराक्रम दाखवून दिला आहे. पाकिस्तानकडून वेळोवेळी भारतीय सुरक्षेला धोका निर्माण केला जातो. पण त्याच भारतीय कमांडोजनी पाकिस्तानी नागरिकांचे प्राण वाचवले. याआधी भारतीय नौदलाच्या INS विशाखापट्टणमने हल्ला झालेल्या व्यापारी जहाजांपर्यंत मदत पोहोचवली होती. महिन्याच्या सुरुवातीला 5 जानेवारीला भारतीय नौदलाने जहाजाच्या अपहरणाचा डाव उधळून लावला होता. भारतीय कमांडोज थेट जहाजावर उतरले होते.