फक्त सात वर्षे शिपाईची नोकरी, पगार 40 हजार, आयकर विभागाला मिळाले 100 किलोपेक्षा जास्त सोने-चांदी अन् 13 कोटींची रोकड

Income Tax Raid: सौरभ शर्मा याच्या घरावर छापेमारी झाल्यानंतर माध्यमे त्याच्या घरी पोहचली. त्यानंतर त्याचे आलिशान घर पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. एका माजी शिपाई असलेल्या व्यक्तीचे घर कोट्यधीश व्यक्तीच्या घरापेक्षा अलिशान होते. या घरात मिळालेला पैसा मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या सात मशीन लावाव्या लागल्या होत्या.

फक्त सात वर्षे शिपाईची नोकरी, पगार 40 हजार, आयकर विभागाला मिळाले 100 किलोपेक्षा जास्त सोने-चांदी अन् 13 कोटींची रोकड
सौरभ शर्मा त्याची पत्नी दिव्या
Follow us
| Updated on: Dec 21, 2024 | 6:59 PM

Income Tax Raid: मध्य प्रदेशात आयकर विभागाने छापे टाकले. या छाप्यानंतर राज्याच्या परिवहन विभाग विभागात शिपाई म्हणून नोकरी करणारा सौरभ शर्मा चर्चेत आला आहे. त्याच्या घरुन 2 कोटी 85 लाखांची रोकड मिळाली. त्यानंतर 50 लाखांचे सोने, चांदी आणि हिरे मिळाले. 4 एसयूवी गाड्या मिळाल्या. जंगलात एका कारमध्ये मिळालेले 52 किलो सोने आणि 10 कोटींची रोकडचे धागेदोरे सौरभ शर्मापर्यंत जात आहे. या सौरभ शर्माचा पगार केवळ 40 हजार रुपये होता. त्याने सात वर्ष नोकरी केल्यानंतर एका वर्षापूर्वी व्हिआरएस घेतली.

घरी काय, काय मिळाले

भोपाळच्या रातीबड क्षेत्रात मेंडोराच्या जंगलात बेवारस स्थितीत एक गाडी आयकर विभागाला मिळाली. त्या गाडीत असणाऱ्या दोन बॅगांमध्ये 52 किलो सोने होते. तसेच दहा कोटींची रोकड होती. ही रक्कम कोणाची त्याची अधिकृत माहिती अद्याप मिळाली नाही. परंतु त्याची लिंक आरटीओमध्ये शिपाई म्हणून काम केलेल्या माजी कर्मचारी सौरभ शर्माकडे जात आहे. आयकर विभागाला मिळालेल्या गाडीची नोंदणी चंदनसिंह गौड नावाने झाली आहे. एमपी-07 सीरीज एसयूवीचे मालक चंदन ग्वालियरमधील रहिवाशी आहेत. ते चार वर्षांपासून भोपाळमध्ये राहत आहे. कारवर आरटीओ लिहिले आहे. पोलिसांनी दावा केला की कार मालक चंदन हा सौरभ शर्मा याचे मित्र आहेत. यामुळे जंगलात मिळालेले 40 कोटींचे सोने आणि 10 कोटींची रोकड सौरभ याची असल्याचा संशय आहे.

दोन्ही संशयित फरार

जंगलात मिळालेल्या काळा पैशांची लिंक कोणा कोणासोबत आहे, त्याचा शोध आयकर विभागानेही सुरु केला आहे. फक्त 40 हजार रुपयांची नोकरी करणारा व्यक्तीकडे इतके पैसे कसे येऊ शकतात? हा प्रश्न अधिकाऱ्यांना पडला आहे. पोलीस चंदन आणि सौरभ शर्मा यांचा शोध घेत आहे. परंतु ते फरार आहेत. ते मिळाल्यानंतरच हा पैसा कोणाचा? ते स्पष्ट होऊ शकते.

हे सुद्धा वाचा

आलिशान घर पाहून धक्का

सौरभ शर्मा याच्या घरावर छापेमारी झाल्यानंतर माध्यमे त्याच्या घरी पोहचली. त्यानंतर त्याचे आलिशान घर पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. एका माजी शिपाई असलेल्या व्यक्तीचे घर कोट्यधीश व्यक्तीच्या घरापेक्षा अलिशान होते. या घरात मिळालेला पैसा मोजण्यासाठी नोटा मोजण्याच्या सात मशीन लावाव्या लागल्या होत्या.

हे ही वाचा…

RTO लिहिलेल्या कारमध्ये 52 किलो सोना, 10 कोटींची रोकड, आयकरच्या छाप्यामध्ये काळ्या पैशांचा खुलासा

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.